(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
Sanjay Raut Wrote letter to Vice President : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे. सरकार पाडण्यासाठी आलेली ऑफर नाकारल्याने ईडी मार्फत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांवर कारवाई सुरू झाली असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून त्यांनी हा दावा केला आहे. ईडी आणि अन्य तपास यंत्रणांचे अधिकारी आपल्या राजकीय नेत्यांच्या हातातील कळसूत्री बाहुले झाले असल्याचेही संजय राऊत यांनी म्हटले.
सरकार पाडण्यास मदत करा नाहीतर...
संजय राऊत यांनी खळबळजनक दावा करताना म्हटले की, राज्यात मध्यावधी निवडणूक करण्यास मदत करण्यास नाकारले तर तुरुंगात डांबण्याची धमकी देण्यात आली. सरकार पाडण्यासाठी मी महत्त्वाची भूमिका पार पाडावी जेणेकरून मध्यावधी निवडणूका पार पाडल्या जातील. मात्र, मी याला नकार दिला. माझ्या या नकाराची मोठी किंमत चुकवावी लागेल अशी धमकी देखील देण्यात आली होती, असेही संजय राऊत यांनी पत्रात म्हटले. माझ्यासह महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील दोन मंत्री आणि राज्यातील दोन मोठ्या नेत्यांनादेखील पीएमएलए कायद्यानुसार तुरुंगात डांबण्यात येईल अशी धमकी देण्यात आली. त्यानंतर राज्यात मध्यावधी निवडणुका लागू होऊ शकतात असेही राऊत यांनी म्हटले.
मनी लाँड्रिंग प्रकरणात सचिन वाझे माफीचा साक्षीदार होण्यास तयार
Mumbai News : मुंबई महानगरपालिकेवर प्रशासक नेमणार, मंत्री नवाब मलिक यांची माहिती
मुंबई महापालिकेची (Mumbai Muncipal Corporation) मुदत संपत असून कायद्यात बदल करुन प्रशासक नेमला जाणार आहे. राज्यपाल यांच्या चर्चेनंतर हा निर्णय होईल, अशी माहिती मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी दिली आहे.
Pune News : विद्यापीठाच्या आवारात 14 फेब्रुवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं अनावरण
Pune University : पुणे विद्यापीठाच्या (Pune University) आवारात उभा करण्यात आलेल्या सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच अनावरण 14 फेब्रुवारी रोजी करण्यात येईल. यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपस्थितीत राहणार आहेत. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार ऑनलाईन उपस्थितीत राहणार आहेत.
Nashik Breaking: नाशिकच्या सराफ बाजारात महिला चोरांचा सुळसुळाट
नाशिकच्या सराफ बाजारात महिलांचा सुळसुळाट झाल्याचं दिसून येतंय. आज सकाळी भागीरथी ज्वेलर्सच्या दुकानात लहान मुलीसोबत आलेल्या महिलेने सोन्याच्या दागिन्यांचा बॉक्स लांबविला. काही मिनिटात साडेचार लाखांचा मुद्देमाल लंपास करत दोघींनी काढला पळ काढला. चोरीची संपूर्ण घटना सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Government Employees Strike : 23 आणि 24 फेब्रुवारीला सरकारी कर्मचाऱ्यांची संपाची हाक
Government Employees Strike : सरकारी कर्मचाऱ्यांनी ( Government employees) 23 आणि 24 फेब्रुवारीला संपाची हाक दिली आहे. मुख्यमंत्री ठाकरे (cm uddhav thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांना (Ajit Paear) कर्मचाऱ्यांनी पत्र लिहिले आहे. निवृत्तीचं वय 60 वर्षे करावं आणि जुनी पेंशन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे.