Maharashtra Breaking News LIVE Updates : मुंबईत दोघांच्या भांडणात उकळलेले तेल अंगावर सांडून लहान मुलगी आणि वृद्ध भाजले
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE

Background
अकोला पोलिसांनी लुटला धुळवडीचा आनंद
नागरिकांना आपले कर्तव्य बजावून अकोला पोलिसांनी धुलीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आज पोलिस बांधवांसोबत धुळवडीचा आनंद लुटला. या दरम्यान जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यातील पोलीस अधिकारी तसेच पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांच्या शासकीय निवासस्थानी रंगपंचमीचा आनंद पोलिसांनी एन्जाय केला. सोबतचं ढोल-तशाच्या तालावर ठेकाही धरलाय.
नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हिवरकर यांच्यासह दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी नागपूरचे माजी महापौर पांडुरंग हिवरकर यांच्यासह दोघांना नागपूर पोलिसांनी अटक केली आहे...
काल (होळीच्या दिवशी) रामेश्वरी चौक परिसरात कार आणि दुचाकी मध्ये झालेल्या एका अपघातात दुचाकीस्वारावर त्वरित कारवाई करा असा दबाव माजी महापौर पांडुरंग हिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलिसांवर आणला होता...
त्याच मुद्द्यावरून त्यांची पोलिसांसोबत वादावादी झाली होती... हिवरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसोबत धक्काबुक्की करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा कालच अजनी पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आला होता....
त्या प्रकरणी पांडुरंग शिवरकर यांना आज अटक करण्यात आली आहे....
मुंडे बहीण भावात रंगले शाब्दिक युद्ध
बीडमधील मुंडे बहिण भावात आज पुन्हा आरोप प्रत्यारोप पहायला मिळाला. धनंजय मुंडे यांनी दुपारी जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे लोकार्पण केले तर सायंकाळी बीड तालुक्यातील बेलेश्र्वर याठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले. दरम्यान याच निमित्ताने या बहिण भावात शाब्दिक युद्ध रंगले. पाच वर्ष आम्ही सत्तेत होतो प्रत्येक कोन शिला आणि निमंत्रण पत्रिकेवर त्यांचं नाव असायचे आज त्यांनी मोठे पणा दाखवला नाही. मात्र आम्ही नक्की दाखवू, मी बीड जिल्ह्याची बदनामी नाही तर काळजी केली. ते विरोधी पक्षात असताना वेठीस धरायचे असं म्हणत पंकजा मुंडे यांनी भाऊ धनंजय मुंडे यांच्या वर निशाणा साधला आहे.
35 of 22,405 सांगली जिल्ह्यातील वातावरणात बदल
उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना अवकाळी पावसाने दिलासा दिला आहे. आज अचानक सांगली शहरासह मिरज आणि आसपास गावात अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली.. रिमझिम आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस याठिकाणी कोसळला. गेल्या काही दिवसांपासून सांगली जिल्ह्यात उन्हाचा कडाका वाढला आहे.. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक उकाड्याने हैराण केले आहे.. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत असताना शनिवारी सायंकाळच्या सुमारास वातावरणात अचानक बदल झाला.... त्यानंतर सांगली आणि मिरज शहरामध्ये अवकाळी पाऊस चांगलाच बरसला आहे...काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी रिमझिम असा पाऊस पडला आहे...या पावसामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण होऊन, उकाड्याने हैराण झालेल्या सांगलीकरांना थोडासा दिलासा मिळाला आहे....
प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
तेजस मोरेचा वकिलामार्फत विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज-
विषेश सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी त्यांचे स्टिंग ऑपरेशन त्यांच्याकडे अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने केल्याचा केल्याचा आरोप केला होता. प्रवीण चव्हाण यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तेजस मोरेच्या विरोधात तक्रार देखील दाखल केलीय. आज तेजस मोरेनेही त्याच्या वकिलामार्फत वकील प्रवीण चव्हाण यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कट रचल्याची तक्रार दाखल केलीय. प्रवीण चव्हाण हे आपल्या विरोधात कट रचून आपल्यावर खोटे आरोप करत असल्याच तेजस मोरेच्या वकिलांनी दिलेल्या या तक्रार अर्जात म्हटलय. स्वतः तेजस मोरे अद्याप गायब आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
