Maharashtra Covid-19 cases Live Updates : जाणून घ्या राज्यातील कोरोनाची जिल्हानिहाय आकडेवारी
Maharashtra Covid-19 cases Live Updates 30 January 2022 : राज्यातील आजची जिल्हानिहाय कोरोना आकडेवारी अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
Maharashtra Corona Update : राज्यात शनिवारी 27,971 रुग्णांची नोंद, 61 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. शनिवारी राज्यात कोरोनाच्या 27 हजार 971 नव्या रुग्णांची भर पडली असून 61 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 50 हजार 142 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
राज्यात आज 85 ओमायक्रॉनबाधितांची नोंद
राज्यात शनिवारी 85 ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत 3125 ओमायक्रॉनबाधितांची नोंद झाली आहे. त्यापैकी 1674 रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे.
राज्यात आज 61 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद
राज्यात शनिवारी 61 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 1.85 टक्के झाला आहे. राज्यात आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.91 टक्के आहे. सध्या राज्यात 11 लाख 49 हजार 182 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 3,375 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आजपर्यंत 7 कोटी 43 लाख 33 हजार 720 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
आज राज्यात 22,444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आज राज्यात 22,444 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 50 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
पुण्यात आज 3896 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
पुण्यात आज दिवसभरात 3896 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद. सध्या जिल्ह्यात 1239 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 8 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आज 2133 नवे कोरोनाबाधित
मागील 24 तासांत पिंपरी-चिंचवडमध्ये 2133 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 5 रूग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात 500 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज दिवसभरात अकोल्यात 153 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
आज दिवसभरात अकोल्यात 153 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सध्या जिल्ह्यात 1654 कोरोना रूग्णांवर उपचार सुरू आहेत.
नांदेड जिल्ह्यात आज 305 रुग्णांची नोंद
नांदेड जिल्ह्यात आज 305 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 403 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.