Maharashtra Corona Update : राज्यात आज 4141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 4780 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात सध्या 53 हजार 182 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,069 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे.

मुंबई : राज्यात आज 4,141 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 780 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 31 हजार 999 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97 टक्के आहे.
राज्यात आज 145 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 38 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 53 हजार 182 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12,069 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत तर नंदुरबारमध्ये रुग्णसंख्या शून्यावर आहे. राज्यातील एकूण 15 जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (40), नंदूरबार (0), धुळे (8), परभणी (14), हिंगोली (79), नांदेड (39), अमरावती (95), अकोला (17), वाशिम (10), बुलढाणा (41), यवतमाळ (11), वर्धा (6), भंडारा (5), गोंदिया (3), गडचिरोली (24) या पंधरा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.
धुळे, जळगाव, यवतमाळ, भंडारा, गोंदिया या चार जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 22,92,131 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,24, 651 (12.29 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,12,151 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2,526 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 294 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या 24 तासात 294 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 240 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,902 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2877 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2030 दिवसांवर गेला आहे.
राज्यात शनिवारी विक्रमी लसीकरण
कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये महाराष्ट्राने काल (21 ऑगस्ट) पुन्हा एकदा दमदार कामगिरी करत दिवसभरात 10 लाख 96 हजार नागरिकांना लस देण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. एकाच दिवशी सुमारे 11 लाखाच्या आसपास नागरिकांना लसीकरण करून आरोग्य विभागाने केलेल्या कामाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली असून याबद्दल आरोग्य यंत्रणेनेचे कौतुक करीत अभिनंदन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
