एक्स्प्लोर

Mahaparinirvan Diwas : महापरिनिर्वाण दिन: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्याबद्दलच्या 10 महत्त्वाच्या गोष्टी 

Mahaparinirvan Diwas : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते.

Mahaparinirvan Diwas : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्लीमध्ये महापरिनिर्वाण झालं आणि संपूर्ण भारतावर दु:खाचा डोंगर कोसळला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी आणि समाजसुधारक, लेखक, पत्रकार असे व्यक्तिमत्वाचे विविध पैलू आहेत. इतकच नव्हे तर त्यांना 'भारतीय राज्यघटनेचे जनक' म्हणूनही ओळखलं जातं. अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवणारे आंबेडकर हे पहिले भारतीय होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित, स्त्रिया, मजूर यांच्यावरील सामाजिक भेदभावाविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तीमत्वाविषयीच्या दहा गोष्टी जाणून घेऊया. 

1. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी झाला. बाबासाहेबांना एकूण 13 भावंडे होती. त्यांचे वडील रामजी मालोजी सकपाळ सुभेदार होते. 

2. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ नाव आंबवडेकर होते. पण त्यांचे गुरू आणि शिक्षकांनी प्रेमाने त्यांचे आडनाव बदलून 'आंबेडकर' ठेवले.

3. वयाच्या 15 व्या वर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विवाह नऊ वर्षांच्या रमाबाई यांच्यासोबत झाला.

4. दलित समाजातील त्याकाळी मॅट्रिक पास होणारे बाबासाहेब आंबेडकर हे पहिलेच विद्यार्थी ठरले. त्याचबरोबर परदेशात अर्थशास्त्रात डॉक्टरेट करणारे ते पहिले भारतीय होते. 

5. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबईच्या शासकीय विधी महाविद्यालयात दोन वर्षे प्राचार्यपद भूषवले.

6. अल्पसंख्याकांच्या कल्याणाचा विचार न केल्याने आंबेडकरांना संविधान जाळायचे होते. त्यांनी भारतीय राज्यघटनेचे कलम 370 मसुदा तयार करण्यास नकार दिला. कारण त्यांना तो मसुदा भेदभाव करणारा आणि एकतेच्या विरुद्ध आणि अखंडतेच्या तत्त्वांच्या विरुद्ध होता. कलम 370 जम्मू-काश्मीर राज्याला विशेष दर्जा देते.

7. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 1947 मध्ये पहिले कायदा आणि न्याय मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली. महिला हक्क विधेयक फेटाळल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला. मध्य प्रदेश आणि बिहारच्या विभाजनाची कल्पना सर्वप्रथम बाबासाहेब आंबेडकरांनी मांडली होती. त्यानंतर 1912 मध्ये राज्यांची निर्मिती झाली.

8. 1942 मध्ये नवी दिल्ली येथे झालेल्या भारतीय कामगार परिषदेच्या 7 व्या सत्रात आंबेडकरांनी भारतातील कामाचे तास 14 तासांवरून 8 तास केले.

9. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 1935-36 मध्ये 'वेटिंग फॉर अ व्हिसाचे' नावाचे 20 पानांचे आत्मचरित्र लिहिले. हे पुस्तक कोलंबिया विद्यापीठाने पाठ्यपुस्तक म्हणून वापरले आहे.
 
10. आपल्या मृत्यूच्या तीन दिवस आधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हे हस्तलिखित पूर्ण केले. आंबेडकरांना मधुमेहाचा गंभीर आजार होता. 6 डिसेंबर 1956 रोजी त्यांचे दिल्लीतील राहत्या घरी निधन झाले.  

https://twitter.com/dhanaji_surve
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Maharashtra Live Breaking Marathi News: शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
Nagpur Crime: नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर जिल्ह्यातील खापरखेड्यात वर्चस्वाच्या वादातून गँगवार, भर बाजारपेठेत तडीपार गुंडांच्या दोन टोळ्यामध्ये प्राणघातक हल्ला, पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?

व्हिडीओ

BMC Corrupt Officer : कारवाई झालेले २०७ पैकी ११२ अधिकारी सेवेत, प्रकरण काय? | Special Report
Voting Right Sold : मताधिकाराचा लिलाव; जिल्हा बँक निवडणुकीआधी धक्कादायक प्रकार | Special Report
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..
Sanjay Raut PC : संघामध्ये मोदी-शाहांनी आपले चमचे पेरले आहेत,संजय राऊतांचा हल्लाबोल
Balasaheb Fadnavis On Devendra Fadnavis: माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; देवेंद्र फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut on Bankipur By-election Result: कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
कुत्रा-मांजराला उभे केले तरी लोक निवडून देतील, हा अहंकार लोकांनी मोडून काढला; बांकीपूर पोटनिवडणुकीवरून संजय राऊतांचा भाजपवर घणाघात
Sant Nivruttinath Maharaj Palkhi : परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
परंपरेलाच तडा! बैलांऐवजी ट्रॅक्टरने ओढावा लागला संत निवृत्तीनाथांच्या पालखीचा रथ; 8 कोटींच्या रथाचे नुकसान, नेमकं काय घडलं?
Liquor Brands Banned Marathi News: Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Old Monk, RC पासून Bagpiper, McDowell's पर्यंत..., भारतात 5 मद्यांच्या ब्रँडवर बंदी, हादरवणारी 6 कारणं समोर!
Ketan Agrawal Crime Case: सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
सियाने केतनला लोहगडावरुन ढकलल्याचा परिणाम लग्नाच्या बाजारपेठेवर, हायक्लास सोसायटीत नवा ट्रेंड उदयाला आला, नेमकं काय घडलं?
Tukaram Mundhe On Saoji Mutton: सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आता आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
सावजी खाल्ल्यास एक महिना आजारी पडेन, तुकाराम मुंढेंच्या विधानावरुन वादाला फोडणी; आहार तज्ज्ञांनी सत्य सांगितलं!
Bankipur bypoll 2026 Results: भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
भाजपने दगड उभा केला तरी जिंकेल अशा मतदारसंघात प्रशांत किशोर कसे जिंकले? जेन झी आंदोलनाचा पहिला झटका, पराभवाची पाच कारणं
Pune Police : गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
गाडीच्या बोनेटवर बसवून गुन्हेगारांची धिंड काढणाऱ्या पुणे पोलिसांना झटका, राज्य मानवधिकार आयोगाची नोटीस, आयुक्त अमितेश कुमारही गोत्यात
Solapur Adinath Sugar factory: सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
सोलापूरमधील 450 कोटींचा साखर कारखाना 120 कोटींना विकण्याच्या हालचाली, बड्या भाजप नेत्याचा डाव, शरद पवार गटाच्या नेत्याचा आरोप
Embed widget