Video : हादरणारी जमीन, हलणारा फॅन, भूकंपाचा पहिला व्हिडीओ समोर; मराठवाडा, वाशिममध्ये धरणीकंपामुळे भीतीचं वातावरण!
Hingoli Earthquake Video : मराठवाडा आणि विदर्भ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत. सध्या 19 सेकंदांच्या या व्हिडीओतून धरणीकंपाचा अंदाज लावला जात आहे.
हिंगोली : मराठवाडा आणि विदर्भात आज (10 जुलै) भूकंपाचे धक्के बसले आहेत. पहाटे-पहाटे बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्यांमुळे या भागातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार या भूकंपाच्या धक्क्यांत अद्याप जीवितहानी झालेली नाही. परंतू काही महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील काही भागात असाच धरणीकंप झाला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के बसल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच भूकंपाची स्थिती सांगणारा हिंगोली जिल्ह्यातील एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवरून भूकंपाच्या तीव्रतेचा अंदाज लावला जात आहे.
हिंगोलीत पहाटे भूकंपाचे धक्के, धरणीकंप सीसीटीव्हीत कैद (Hingoli Earthquake Video)
हिंगोली जिल्ह्यांमध्ये आज पहाटे 7:15 च्या सुमारास सर्वदूर भूकंपाचा धक्का जाणवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पाचही तालुक्यात या भूकंपाचा धक्का जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. आतापर्यंत या भूकंपामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु या भूकंपामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाला आहे. हिंगोली शहरालासुद्धा या भूकंपाचा धक्का जाणवला असून या भूकंपाचे दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला आहे. सध्या समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज 19 सेकंदांचे आहे. या 19 सेकंदांत धरणीकंप कैद झालेला आहे.
पाहा भूकंपाचा पहिला व्हिडीओ :
भूकंपाचे केंद्रबिंदू आखाडा बाळापूर
हा व्हिडीओ हिंगोलीतील एका रस्त्यावरचा आहे. पहाट असल्यामुळे या रस्त्यावरील सर्व दुकाने बंद दिसतायत. रस्त्यावरही शुकशुकाट आहे. एक-दुसरी दुचाकी येताना दिसतेय. त्यानंतर दोन सेकंदांनी या सीसीटीव्हीतील फुटेज हालताना दिसत आहे. या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवत आहेत. हिंगोलीतील भूकंपाचा केंद्रबिंदू आखाडा बाळापूर हा परिसर असल्याचे सांगण्यात येत आहे.
आणखी एक व्हिडीओ आला समोर
दुसरीकडे याच भूकंपाचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये घरातील छताला लावलेला फॅन भूकंपाच्या धक्क्यांमुळे हालत असलेला पाहायला मिळतोय. मराठवाडा आणि विदर्भात अचानक बसलेल्या या हादऱ्यांमुळे सध्या या भागातील लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. भूकंपाच्या कोणत्याही भागात जीवितहानी झालेली नाही.
वाशिम जिल्ह्यांत दोन भूकंपाचे धक्के
विदर्भातील वाशीम जिल्ह्यातही भूकंपाचे हादरे बसले आहेत. मिळालेल्या माहितानुसार या जिल्ह्यात सकाळी सात वाजून नऊ मिनिटांनी आणि सात वाजून 14 मिनिटांनी अशा एकूण दोन वेळा भूकंपाचे धक्के बसले. अनेक जिल्ह्यांत भूकंपाचे धक्के बसले असले तरी सदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
हेही वाचा :
मोठी बातमी! मराठवाडा, विदर्भात धरणीकंप; परभणी, हिंगोली, नांदेडसह वाशीममध्ये भूकंपाचे धक्के