एक्स्प्लोर
वनविभागाच्या गाडीने घेतला बापलेकीचा बळी, अपघातानंतर चालक बदलण्याचा प्रयत्न
मायाक्कानगर येथे वनक्षेत्रपाल सागर मगर यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे अचानकपणे अनिल गटकुळे यांच्या मोटरसायकलला समोरून धडक देत अक्षरशः 50 फुट फरफटत नेले. यात अनिल गटकुळे आणि त्यांची मुलगी अवनी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी हिमा या गंभीररित्या जखमी झाल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.

सांगली : वनविभागाच्या चारचाकी गाडीने समोरुन येणार्या मोटरसायकलला समोरून धडक दिली. या भीषण अपघातात बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना सांगली-विटा रोडवर घडली. अनिल धर्मादास गटकुळे (वय 35), मुलगी अवनी अनिल गटकुळे (वय 3 वर्षे) अशी मृतकांची नावे आहेत. या घटनेत मुलीची आई गंभीररित्या जखमी झाली आहे.
गटकुळे कुटूंब आटपाडी तालुक्यातील तडवळे गावचे रहिवासी होते. विटा-सांगली रस्त्यावरील मायाक्कानगर येथे हा अपघात घडला. वनक्षेत्रपाल सागर मगर स्वतः चारचाकी गाडी चालवित होते. त्यांचा वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला असून या अपघातप्रकरणी त्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
अपघातानंतर या गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न झाला. या भीषण अपघातावेळी वनविभागाचे वनक्षेत्रपाल सागर मगर हे गाडी चालवत होते. या अपघातानंतर त्यांनी गाडीचा चालक बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु उपस्थित प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी हा प्रयत्न हाणून पाडला.
सांगली येथे वनविभाग व सामाजिक वनीकरण विभागाची बैठक आटपून वनक्षेत्रपाल सागर मगर व काही महिला कर्मचारी अधिकारी या वनविभागाच्या गाडीतून विट्याकडे येत होते. याचवेळी अनिल गटकुळे हे मोटरसायकलवरुन पत्नी हिमा व मुलगी अवनी यांना घेऊन विट्याहून तासगाव तालुक्यातील बोरगाव येथील नातेवाईकांकडे निघाले होते.
दरम्यान मायाक्कानगर येथे वनक्षेत्रपाल सागर मगर यांचा गाडीवरील ताबा सुटला. त्यामुळे अचानकपणे अनिल गटकुळे यांच्या मोटरसायकलला समोरून धडक देत अक्षरशः 50 फुट फरफटत नेले. यात अनिल गटकुळे आणि त्यांची मुलगी अवनी यांचा जागीच मृत्यू झाला. तर पत्नी हिमा या गंभीररित्या जखमी झाल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी सांगलीला हलविण्यात आले आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
बातम्या
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
