Dhule: ओमानच्या समुद्रात मर्चंट नेव्हीचा यश 12 दिवसांपासून बेपत्ता, ध्वजारोहणावरून झालेल्या वादातून घातपाताचा कुटुंबीयांचा संशय
ओमानच्या समुद्रात तब्बल 12 दिवसांपासून बेपत्ता, मर्चंट नेव्हीच्या यश देवरेचा ध्वजारोहण करण्याच्या वादातून घातपात झाल्याचा कुटुंबियांचा संशय

Dhule: धुळे तालुक्यातील देऊर येथील मूळ रहिवासी असलेला आणि मर्चंट नेव्ही (Navy) मध्ये कार्यरत असलेला यश देवरे हा तरुण ओमानच्या सागरात बेपत्ता झाला असून तब्बल बारा दिवस उलटून देखील त्याचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली आहे. तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यश चा शोध लागला नसून कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. सौदी अरेबियातील ओमन येथे गेला असताना दिनांक 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे शेवटचे बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही... तसेच 29 जानेवारीला दुपारी 2 वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाज मधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली. मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यश चा शोध लागला नाही. (Dhule)
नक्की घटना काय घडली होती?
देऊर येथील यश अविनाश देवरे हा तरुण मर्चंट नेव्ही मध्ये असून ठाणे येथील स्वराज सर्विस प्राइवेट लिमिटेड मध्ये तो ओएस पदावर कार्यरत आहे. तो सौदी अरेबियातील ओमन येथे गेला असताना दिनांक 28 जानेवारी रोजी त्याचे आणि कुटुंबीयांचे शेवटचे बोलणे झाले होते, मात्र त्यानंतर त्याच्याशी कुटुंबीयांचा कुठलाही संपर्क झालेला नाही... तसेच 29 जानेवारीला दुपारी 2 वाजता संबंधित जहाज कंपनीने देवरे कुटुंबीयांशी संपर्क साधून यश हा चालत्या जहाज मधून पाय घसरून पडून समुद्रात पडून बेपत्ता झाल्याची माहिती कंपनीने दिली. मात्र तब्बल बारा दिवस उलटून देखील अद्यापही यश चा शोध लागला नसून कुटुंबीयांनी चिंता व्यक्त केली असून याबाबत ठाणे येथील नौपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे. तसेच यशच्या निकटवर्तीयांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेत घडलेला प्रकाराबाबत माहिती देत यश याच्या शोधाबद्दल तात्काळ कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
यश सापडला का? कंपनीकडून उडवाउडवीच!
यश देवरे याच्या कुटुंबीयांनी कंपनीशी संपर्क साधला असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तसेच गेल्या काही दिवसांपासून संपर्क क्रमांक देखील बंद करण्यात आला आहे. यामुळे गेल्या आठवड्यापासून देवरे कुटुंबीय नातलग आणि त्याचे निकटवर्तीय यश च्या शोधात असून एमटी अथेना1 हे जहाज ओमानहून गुजरातच्या अलंग येथे या आठवड्यात येणार होते. मात्र, हे जहाज किती वाजता येईल याची माहिती यंत्रणे कडून दिली जात नसल्याची देवरे कुटुंबियांनी तक्रार केली आहे.तर दुसरीकडे 26 जानेवारी रोजी यश देवरे आणि त्याच्या सोबतच्या काही सहकार्यांनी प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकवला होता यावेळी त्या ठिकाणी झालेल्या वादातून सदर प्रकार घडल्याचा देखील संशय यश देवरे याच्या भावाने व्यक्त केला आहे...
कुटुंबात चिंतेचं वातावरण
यश देवरे हा बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यापासून त्याच्या कुटुंबीयांमध्ये मोठ्या प्रमाणावर चिंतेचे वातावरण पसरले असून त्याच्या आई आणि वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत तर दुसरीकडे यशच्या आईने राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे लाडक्या बहिणीच्या पदरात तिचा मुलगा घालावा अशी भावना साद देखील घातली आहे . यश हा त्यांच्या कुटुंबीयांचा अत्यंत लाडका मुलगा आहे. मुलाला लागलेल्या नोकरीमुळे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती चांगली होईल या अपेक्षेने आई-वडिलांनी त्याला आवडत्या क्षेत्रात पाठवले मात्र तब्बल बारा दिवसानंतर ही मुलाचा शोध यशला शोधण्यात संबंधित यंत्रणेला यश आलेले नाही यामुळे आईच्या काळजाचा तुकडा असणारा यश जोपर्यंत डोळ्यांना दिसत नाही तोपर्यंत या माऊलीचे अश्रू देखील थांबणार नाहीत एकीकडे राज्यात मुख्यमंत्री लाडके बहीण योजना राबविली जात दुसरीकडे या लाडक्या बहिणीची पदरात आपला मुलगा घालण्याची साद राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री ऐकतील का आणि लवकरच यशच्या आईच्या कानावर मुलाच्या आवाजातला आई हा शब्द कधी पडेल हाच खरा प्रश्न आहे.
हेही वाचा:
सोयाबीन खरेदी सुरु करा, लातूरमध्ये ठाकरे गट आक्रमक, टॉवरवर चढत शोले स्टाईलनं आंदोलन सुरु
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
