Dhangar community hunger strike : तोडगा निघणार का? धनगर समाजाच्या मागण्यासंदर्भात आज मुख्यमंत्र्यांसोबत आंदोलकांची बैठक
धनगर समाजाच्या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज (15 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी 2 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
Dhangar community hunger strike in Pandharpur: पंढरपूर येथे सकल धनगर समाजाच्या वतीने सुरु आमरण उपोषण सुरु आहे. या उपोषणावर तोडगा काढण्यासाठी आज (15 सप्टेंबर) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथिगृहावर दुपारी 2 वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या सहा दिवसापासून सुरु असलेल्या या आमरण उपोषणामुळे धनगर समाज संतप्त झाले आहेत.
आजच्या बैठकीला कोण कोण उपस्थित राहणार?
दरम्यान, शासनाकडून काल मंत्री चंद्रकांत पाटील व मंत्री शंभूराजे देसाई या दोघांनी आंदोलकांशी चर्चा केली आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निरोप पोहोचवला आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर आज मुख्यमंत्र्यांनी आंदोलकांसोबत बैठक आयोजित केली आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, शंभूराजे देसाई, अतुल सावे आणि विजय गावित हे मंत्री उपस्थित असणार आहेत. याशिवाय राज्याचे महाधिवक्ते तसेच धनगर समाजाच्या वतीने आमदार गोपीचंद पडळकर, आमदार दत्तामामा भरणे, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आमदार रामभाऊ वडकुते हेही उपस्थित असणार आहेत. धनगर समाजाचे प्रतिनिधी म्हणून अॅड. सुभाष गोफणे, अनिल झोरे, सुभाष मस्के, बिरू कोळेकर ,पंकज देवकते, प्रशांत घोडके ,आदित्य फत्तेपूरकर आणि विठ्ठल पाटील हे या बैठकीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.
अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करावा ही प्रमुख मागणी
आज दुपारी दोन वाजता सह्याद्री अतिथी गृहावर ही बैठक होत असून यासाठी प्रधान सचिव आदिवासी विकास विभाग, इतर मागास बहुजन कल्याण, विभाग ,विधी व न्याय विभाग व गृह विभागाचे सचिव देखील उपस्थित असणार आहेत. या बैठकीचे आयोजन इतर मागास बहुजन कल्याण विभागाकडे असून आज रविवार असला तरी आंदोलनाची तीव्रता लक्षात घेता ही बैठक उद्याच घेण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करण्याची प्रमुख मागणी असून यात अनेक कायदेशीर अडचणी असल्याने या बैठकीसाठी शासनाकडून कायदे तज्ञांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. धनगर बांधवांनी आम्हाला कायदा कळत नाही फक्त प्रमाणपत्र द्या अशी आग्रही मागणी केली आहे. तसेच आम्हाला मंत्री नको मुख्यमंत्र्यांशी चर्चा हवी अशीही मागणी काल केली होती. त्यानंतर आज बैठक आयोजीत केली.
महत्वाच्या बातम्या: