एक्स्प्लोर
सरकार तीन चाकी असलं तरी स्टिअरिंग माझ्याच हाती : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाविकास आघाडीचं सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray Interview ) यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे.
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार हे तीनचाकी सरकार असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातो. यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत आपलं स्पष्ट मत मांडलं आहे. राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टिअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
हे तीन चाकी सरकार आहे असं म्हणतात असं राऊत यांनी विचारलं असता उद्धव ठाकरे म्हणाले की, हे तीन चाकी सरकार आहे, पण ते गरीबांचं वाहन आहे. बुलेट ट्रेन की रिक्षा यात निवड करायची झाली तर मी रिक्षाच निवडेन. मी गरीबांच्या माने उभा राहीन. ही माझी भूमिका मी बदलत नाही. मी मुख्यमंत्री झालो म्हणून मी बुलेट ट्रेनच्या मागे उभा राहीन, असा समज कुणी करून घेऊ नये. माझं मत मी लोकांच्या सोबत असल्याने बुलेट ट्रेन नको असंच आहे. या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय. केंद्रात किती चाकं आहेत. आमचं तर हे तीन पक्षांचं सरकार आहे. केंद्रात किती पक्षाचं सरकार आहे. सांगा ना, मी जेव्हा गेल्या वेळी एनडीएच्या बैठकीला गेलो होतो तेव्हा तर 30-35 चाकं होती. म्हणजे रेल्वेगाडीच होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपाला लगावला.
राष्ट्रवादीला सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांकडून झुकतं माप दिलं जातंय?
राष्ट्रवादीला सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांकडून झुकतं माप दिलं जातंय यासंदर्भात राऊत यांनी प्रश्न केला असता मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, असा त्यांचा (काँग्रेसचा) प्रेमळ आक्षेप सुरुवातीला होता. पण तो गैरसमज मी भेटल्यानंतर दूर झालेला आहे. तो आक्षेप अगदी तीव्र नव्हता. सगळेजण निवडणुका लढवून निवडून येत असतात. जनतेच्या त्यांच्याकडून काही अपेक्षा असतात. आपण जनतेच्या अपेक्षा पूर्ण करु शकत नाही, असं जर कुणाला वाटत असेल तर त्यात चूक आहे अशातला भाग नाही, असं ठाकरे म्हणाले. अशा अपेक्षा व्यक्त करणे गुन्हा नाही. सुरुवातीच्या काळात त्यांच्या मनात असेलही पण माझ्याशी कुणी असे ठामपणाने बोलले नाही की, तुम्ही आम्हाला विचारत नाहीत. माझा पवारसाहेबांशी पण चांगला संवाद आहे. अगदी नित्यनेमाने नाही पण मी कधीतरी सोनियाजींना देखील फोन करत असतो, असं ते म्हणाले.
कालच्या भागात काय म्हणाले मुख्यमंत्री ठाकरे
'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे
... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
'एकच शरद सगळे गारद' ही शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत काल 25 आणि आज 26 जुलैला प्रसारित झाली.
पाहा संपूर्ण मुलाखत
शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या
भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार
पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार
लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार
Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला
शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार
'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
शिक्षण
नाशिक
राजकारण
Advertisement