एक्स्प्लोर

भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार

दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी घेतलेल्या मुलाखत शरद पवार बोलत होते. 'एकच शरद' या मुलाखतीचा आज तिसरा आणि अखेरचा भाग प्रसारित झाला. यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांवर उत्तर दिलं.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. उलट भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत केलेल्या गौप्यस्फोटांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. दैनिक 'सामना'चे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार यांनी घेतलेल्या मुलाखत शरद पवार बोलत होते. 'एकच शरद' या मुलाखतीचा आज तिसरा आणि अखेरचा भाग प्रसारित झाला.

"राष्ट्रवादीने सत्तेसाठी भाजपसोबत कधीच चर्चा केली नाही. शिवसेनेला दूर ठेवून सरकार बनवू असं प्रस्ताव भाजपनेच दिला होता," असं शरद पवार म्हणाले. त्यांनी सांगितलं की, "शिवसेनेला आम्हाला बरोबर घ्यायचं नाही. तुम्ही आम्हाला स्थिर सरकार बनवायला साथ द्या, असं काही भाजप नेते आमच्याशी दोन ते तीन वेळा बोलले होते. पंतप्रधानांनी माझे संबंध चांगले आहेत, त्यामुळे पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा आणि मी संमती देईन, अशी अपेक्षा होती. ही बाब माझ्या कानावर आली. परंतु पंतप्रधानांकडे माझ्याबद्दल किंवा पक्षाबद्दल चुकीची माहिती जाऊ नये, यासाठी मी दिल्लीत जाऊन पतंप्रधानांची भेट घेतील. त्यांना स्पष्ट सांगितलं की आम्ही तुमच्यासोबत येणार नाही, जमलं तर शिवसेनेसोबत जाऊ किंवा विरोधी पक्षात बसू. हे सांगायला जाताना एक गृहस्थ माझ्याशेजारी होते त्यांचं नाव संजय राऊत."

भाजपचं 'ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग याशिवाय महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्र सरकारने सत्तेचा गैरवापर केल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. "भाजपचे लोक महाराष्ट्रातील आघाडी सरकार पाडायचे म्हणतात. सरकार पाडायचे म्हणणाऱ्यांना जनमानसात किती स्थान? आधी म्हणायचे 3 महिन्यांत पाडू, आता म्हणतायत 6 महिन्यात पाडू. भाजपचं 'ऑपरेशन कमळ' म्हणजे सत्तेचा दुरुपयोग आहे. 'ऑपरेशन कमळ'चा महाराष्ट्रात काहीच फरक पडणार नाही," असंही शरद पवार म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी उद्धव ठाकरे यांच्या कामाची पद्धत आमच्यापेक्षा वेगळी आहे. त्यांच्या कामाची पद्धत ही शिवसेनेच्या आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून बघतोय, की आदेश येतो, त्या आदेशाची अंमलबजावणी होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी ज्या विचारांनी वाढलोय, आम्ही वरिष्ठांच्या मताचा आदर करतो, पण वरिष्ठांकडून आदेशच येतो असं नाही. समजा एखाद्याने मत मांडलं तर आम्ही त्यावर चर्चा किंवा विचार करु शकतो. ही आमच्या कामकाजाची पद्धत आहे. शिवसेनेमध्ये नेतृत्त्वाने भूमिका घेतल्यानंतर की त्याच रस्त्याने जायचं आणि अंमलबजावणी करायची, ही पद्धत अगदी लहान-थोरांपासून चालली आहे. याच्याबद्दल माझी तक्रार नाही. आताचं सरकार एकट्याचं नाही तर तिघांचं आहे. या तिघांमध्ये जर दोघांची काही मतं असतील तर ती जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आपण डायलॉग ठेवू अशी आमची सूचना असते. लोकशाही डायलॉग कायम ठेवला तर बिघाडीची चर्चा रंगणार नाही.

प्रियांका गांधीचं घर काढून घेणं क्षुद्रपणाचं राजकारण काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांना दिल्लीचं राहतं निवासस्थान रिकामं करण्यास सांगण्यात आलं आहे. एसपीजी सुरक्षा कमी केल्याने प्रियांका गांधी या घरात राहू शकत नाही, असं कारण देण्यात आलं. याविषयी संजय राऊत यांनी शरद पवारांना विचारलं असता ते म्हणाले की, "हातातील सत्ता विनयाने वापरायची असती. प्रियांका गांधींना घराबाहेर काढण्यामागे सत्तेचा दर्प आहे. त्याचं घर काढून घेणे हा राजकीय क्षुद्रपणा आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 
भाड्याने वाहन लावून देण्याचं आश्वासन, महिलेकडून तब्बल 33 लाखांची फसवणूक, दिंडोशी पोलिसांची मोठी कारवाई, आरोपीला मध्य प्रदेशातून अटक 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget