एक्स्प्लोर

Maharashtra Budget 2026:कोणतीही चालू योजना बंद केली जाणार नाही; देशातील पहिली 1 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र लवकरच पूर्ण करेल; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Budget 2026: अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची वित्तीय तूट 3 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच 2.60 टक्क्यांवर राखण्यात यश आले आहे.

Maharashtra Budget 2026: सरकारने सादर केलेला 7 लाख 69 हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून 'विकसित महाराष्ट्र 2047' चे स्वप्न साकार करणारा एक जाणीवपूर्वक तयार केलेला रोडमॅप आहे," असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. हा अर्थसंकल्प 4 प्रमुख क्षेत्रे आणि 165 उपक्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणारा असून, राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा पाया रचणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अजितदादांच्या पश्चात फडणवीस यांनी अर्थसंकल्प सादर केला. 'लाडकी बहीण योजना' यशस्वीपणे सुरू असून त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद कायम ठेवण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३७ लाख 'लखपती दीदी' तयार झाल्या असून, आगामी काळात आणखी 25 लाख महिलांना या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट सरकारने ठेवलं असल्याचे ते म्हणाले. यंदा 'अलनिनो'चे (El Nino) वर्ष असल्यामुळे पाऊस कमी पडण्याची आणि दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. या आपत्तीचे सौम्यीकरण करण्यासाठी शासनाने आतापासूनच वैरण विकास, पिण्याचे पाणी राखून ठेवणे आणि जलसंधारणाची कामे हाती घेतली आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

शिस्तबद्ध अर्थव्यवस्था

राज्याची अर्थव्यवस्था भक्कम असल्याचे सांगताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्याची वित्तीय तूट 3 टक्क्यांच्या मर्यादेपेक्षा कमी म्हणजेच 2.60 टक्क्यांवर राखण्यात यश आले आहे. तसेच महसूल तूट देखील 1 टक्क्याच्या खाली ठेवण्यात आली आहे. हा अर्थसंकल्प समता आणि समरसतेने काम करण्यासाठी अजित पवार यांना समर्पित करण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.

कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता 

विधानसभा निवडणुकीत शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीच्या आश्वासनाची पूर्तता या अर्थसंकल्पात करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शेती क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवण्यासाठी तंत्रज्ञानाचा, एआयचा (AI) वापर करून उत्पादन खर्च कमी करण्यावर भर देण्यात आला आहे. 'ॲग्रीस्टॅक' आणि 'महाविस्तार' या दोन प्लॅटफॉर्ममुळे शेतकऱ्यांना तज्ञांशिवाय केवळ पिकाचा फोटो काढून परिस्थिती जाणून घेता येईल.

कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात क्रांती

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून 13-14 हजार मेगावॉट वीज निर्मितीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आता दिवसाही वीज उपलब्ध होईल. शेतकऱ्यांच्या मोफत विजेसाठी 32 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून, शेतमजुरांना सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 

शिक्षण आणि युवा पिढीसाठी संधी

त्यांनी सांगितले की, राज्यात 'एज्युसिटी' निर्माण करण्यावर सरकारचा भर आहे. जगातील पहिल्या 100 विद्यापीठांपैकी काही विद्यापीठे महाराष्ट्रात येणार असून, भारतीय विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आता इथेच उपलब्ध होईल. स्टार्ट-अप्सना प्रोत्साहन देण्यासाठी 'फंड ऑफ फंड्स'ची निर्मिती करण्यात आली असून 25 लाखांपर्यंतची कामे त्यांना उपलब्ध करून दिली जातील. खेळ क्षेत्रात 'मिशन लक्ष्यवेध'च्या माध्यमातून खेळाडू घडवले जातील.

पायाभूत सुविधा आणि पर्यावरण

राज्यातील १ हजार गावांना काँक्रीटच्या रस्त्यांनी जोडण्याचा मोठा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जागतिक बँकेच्या सहकार्याने छोट्या शहरांमध्ये ६ हजार कोटी रुपये खर्च करून मलनिस्सारण आणि एसटीपीची (STP) कामे पूर्ण केली जातील. पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी पुढील 7 वर्षांत 300 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून, 33 टक्के वनाच्छादनाचे उद्दिष्ट गाठले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Maharashtra Live blog updates: एमआयएमवर ‘मेहरबानी’, ठाकरे गटाला ‘तुटपुंजा’ निधी; मुंबई महापालिकेच्या 800 कोटींच्या वाटपावर सवाल
Krishnaraaj Mahadik on Nashik IT Company Conversion case: नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
नाशिक धर्मांतर प्रकरणात भाजप युवा मोर्चा आक्रमक, कृष्णराज महाडिकांचं देवेंद्र फडणवीसांना पत्र; म्हणाले, 'महिलांच्या सुरक्षेसाठी...'
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
Gopichand Padalkar on Nashik IT Company conversion Case: हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
हिंदू 2090 पर्यंत अल्पसंख्याक होतील, नाशिकमधील धर्मांतर प्रकरणावरून गोपीचंद पडळकरांचा दावा
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Video: पहिल्यांदा एकमेकांना स्मितहास्य मग हात जोडले अन् नंतर काही काळ गप्पाही रंगल्या; पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?
Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
अमेरिकेनं मारून टाकलेल्या 168 चिमुरड्या लेकींच्या आठवणीतच इराणचे 71 सदस्यीय शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; जेडी व्हान्सही पोहोचणार, ट्रम्पची धमकी, 'वाटाघाटी करण्यासाठी इराण जिवंत'
Earthquake Parbhani and Nanded: मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
मोठी बातमी: परभणी, नांदेड भूकंपाच्या धक्क्यांनी हादरलं, घरावरचे पत्रे हलले, नागरिकांमध्ये घबराट
Beed Crime: गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गोठ्यातून घरी निघाली; चुलत्याने शरीराचे लचके तोडले, अल्पवयीन मुलीचा घटेनंतर जीवन संपवण्याचा प्रयत्न, मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
Kolhapur CPR : सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
कोल्हापुरातील सीपीआरमध्ये वैद्यकीय बिलांच्या मंजुरीसाठी आर्थिक देवाण-घेवाण, हिशेबाची 'ती' डायरी अंगलट; आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांचे अखेर निलंबन
Samruddhi Mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
समृद्धी महामार्गावर नेक्सॉन, इनोव्हा, औरा कारचा विचित्र अपघात, मदतीला धावलेल्या कर्मचाऱ्यांनाही दुखापत, दोन गंभीर, पाच जखमी
Sharad Pawar on Varkari: वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी करतात: शरद पवार
Embed widget