एक्स्प्लोर

'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...

राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची मॅरेथॉन मुलाखत खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाविकास आघाडी, विरोधी पक्ष, कोरोना, लॉकडाऊनसह अनेक महत्वाच्या विषयावर भाष्य केलं

मुंबई : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे या सरकारचे तुम्ही हेडमास्तर आहेत की रिमोट कंट्रोल? या प्रश्नाचे उत्तर खुद्द शरद पवार यांनी दिलं आहे. विरोधकांकडून पवारांवर नेहमी सरकारचे हेडमास्तर आहेत किंवा रिमोट कंट्रोल असल्याची टीका व्हायची. यावर पवार यांनी हेडमास्तर किंवा रिमोट कंट्रोल दोन्ही नसल्याचं स्पष्ट केलं आहे. शरद पवार यांनी ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीत हे स्पष्ट केलं. शिवसेना नेते तथा खासदार आणि सामनाचे संपादक संजय राऊत यांनी त्यांनी मुलाखत घेतली आहे. या मुलाखतीत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील ‘ठाकरे सरकार’ला अजिबात धोका नाही, असंही सांगितलं. तसंच देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांना पवारांनी उत्तरं दिली. ही मुलाखत 11, 12 आणि 13 जुलैला प्रसारित होत आहे. संजय राऊत यांनी तुम्ही हेडमास्तर आहेत की रिमोट कंट्रोल? असा प्रश्न केला असता पवार म्हणाले की, दोन्ही नाही. हेडमास्तर असला तर तो शाळेत असायला हवा. लोकशाहीत सरकार किंवा प्रशासन हे रिमोटने कधी चालत नाही. रिमोट चालतं कुठे? जिथे लोकशाही नाही तिथं! आपण रशियाचं उदाहरण पाहिलं. पुतीन 2036 पर्यंत अध्यक्ष राहणार. ही एकहाती सत्ताच आहे. लोकशाही वगैरे सगळे बाजूलाच केलेले आहे. त्यामुळे आपण म्हणू त्या पद्धतीने सरकार चालवले पाहिजे हा अट्टहास आहे, पण इथे लोकशाही सरकार आहे आणि लोकशाहीचे सरकार रिमोट कंट्रोलने कधी चालू शकत नाही. मलाच ते मान्य नाही. सरकार मुख्यमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळच चालवत आहेत, असं पवार म्हणाले. मुलाखतीत शरद पवार यांनी म्हटलं की, बाळासाहेब ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीत फरक आहे. पण मुख्यमंत्री म्हणून ठाकरे उत्तम काम करीत आहेत, असे प्रमाणपत्र शरद पवारांनी दिले. महाराष्ट्र या कोरोनाच्या संकटातूनही बाहेर पडेल व झेप घेईल, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी झाल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. हा प्रयोग आणखी यशस्वी होऊन या प्रयोगाची फळं महाराष्ट्रातील जनतेला, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या विभागाला मिळताहेत अशी स्थिती आपल्याला नक्कीच बघायला मिळाली असती. पण हे कोरोनाचं संकट आलं हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं, असं पवार म्हणाले. गेले काही महिने राज्य प्रशासन, आणि राज्यकर्ते आणि राज्याची संपूर्ण यंत्रणा फक्त एकाच कामात गुंतलेली आहे, कोरोनाविरुद्ध लढण्याच्या. त्यामुळे बाकीचे सगळे प्रश्न बाजूला राहिले.  तिन्ही पक्ष एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरेंच्या पाठीशी पवार म्हणाले की, कोरोनासारखं एवढं मोठं संकट तीन विचाराचे तीन पक्ष, पण सगळे जण एका विचारानं मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पाठीशी आहेत. त्यांच्या धोरणाच्या पाठीशी आहोत, आणि या परिस्थितीला तोंड देताहेत. लोकांच्या पाठीशी मजबुतीने उभे राहताहेत. हे घडू शकलं याचा अर्थ माझी खात्री आहे, हे एकदिलाने काम सुरू आहे म्हणून घडू शकलं. या तिन्ही पक्षांत यत्किंचितही नाराजी नाही, असं त्यांनी सांगितलं.

महत्त्वाच्या बातम्या

ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
मोठी बातमी : 4 कोटींची लँड क्रुझर, 32 इनोव्हा, 2 फॉर्च्युनर, राज्य सरकारकडून नव्या कोऱ्या 44 गाड्यांच्या खरेदीचा निर्णय!
Contractors: शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
शासनानं तब्बल 96 हजार कोटी थकवले; दहा महिन्यात नऊ कंत्राटदारांनी आयुष्य संपवलं; आता राज्य कंत्राटदार महासंघाचा एल्गार, राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयांवर धडकणार
UPI Payment MDR Charge: केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला
केंद्र सरकारचं महत्त्वाचं पाऊल, UPI व्यवहारावरील शुल्काबाबतचा 'तो' निर्णय फिरवला

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Bharti Nirgude | घरात संकट होतं, पण शेतात तिची हिंमत पिकत होती!
India Alliance Supreme Court Morcha : विरोधकांची 'सुप्रीम' धाव; कुणाकुणावर घाव? | Special Report ABP Majha
Abhijeet Dipke vs Delhi Police : दिपके, पोलीस भिडले; कोण कुणाला नडले? | Special Report ABP Majha
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
MPSC Protest Pune: पुण्यातील तिन्ही आंदोलनं कशी गुंडाळली?; Inside Story

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
'चीन लडाखला केंद्रशासित प्रदेश म्हणून मान्यता देत नाही..' लडाखमधील 28 ठिकाणांवर दावा; गोगरा-हॉट स्प्रिंगचाही समावेश, जिथं 2020 मध्ये दोन्ही देशांच्या सैन्यांमध्ये घनघोर संघर्ष
L Murugan Resignation : मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
मोठी बातमी! मोदींच्या कॅबिनेटमधील मंत्र्याचा राजीनामा, राज्यसभेचे खासदारपदही सोडलं, विरोधकांनी घेरलं असताना दिल्लीत मोठी घडामोड
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
पुण्यात IT अभियंता महिलेनं संपवलं जीवन, चिठ्ठीत लिहला सासरच्याकडून होणारा त्रास; पतीसह 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
ज्ञानेश कुमार माफिया, सिस्टीमचं अपराधीकरण केलं; इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर संजय राऊत कडाडले, सांगितली पुढील रणनीती
Cyberattack on Refrigeration: फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका
फ्रान्समधील शेकडो सुपरमार्केटच्या रेफ्रिजरेशन प्रणालीवर सायबर हल्ला; फ्रीझर तापमान 50 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचून आगीचा भडका, अनेक दुकानांमध्येही आगीचा भडका
Piyush Goyal Vs Rahul Gandhi : 'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
'एकाला मंत्री केलं तर दुसऱ्याला पद्मभूषण दिलं', पीयूष गोयल यांचा राहुल गांधींवर पलटवार; काँग्रेसचा जुना ट्रॅक रेकॉर्डच काढला बाहेर
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
एकनाथ शिंदे नाराज झाल्यास स्फोट होतो, ते नाराज नाहीत; बैठकीच्या अनुपस्थितीवरुन बच्चू कडूंनी सांगितली मन की बात
PM Modi: 'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
'भारत ही लोकशाहीची जननी, शासनाचा उद्देश केवळ सत्तेचा वापर करणे नाही तर..' पीएम मोदी काय काय म्हणाले?
Embed widget