एक्स्प्लोर

सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, नियमित कर्ज भरणाऱ्यांना किमान दीड लाख रुपये द्यावेत : बच्चू कडू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. यावर बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Bacchu Kadu on budget : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. यामध्ये दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफीची घोषणा करण्यात आली आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमाफी योजना’ अंतर्गत ही कर्जमाफी लागू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या योजनेनुसार 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पीक कर्ज थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्यात येणार आहे. यावर प्रहारचे प्रमुख बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देवाभाऊंनी आज कर्जमाफीची घोषणा केली त्यांचे मी आभार मानतो. पण त्यामध्ये काही त्रुटी आहेत. खरं तर पात्र शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली पाहिजे होती असे कडू म्हणाले. 

दुष्काळात होरपळलेल्या चालू कर्जदारांची कर्जमाफी झाली पाहिजे. नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना किमान दीड लाख रुपये दिले पाहिजेत असे कडू म्हणाले. आम्ही कर्जमाफीसाठी मुंबईला गेलो तेव्हा आमच्यावर खूप टीका झाली होती. त्या टीकाकारांना आता उत्तर मिळाला आहे. कर्जमाफीची घोषणा सरकारने केली आहे. कर्जमाफी पासून तारखेपासून दूर जाणाऱ्या सरकारला कर्जमाफीची घोषणा करायला आम्ही भाग पाडले. 14 किंवा 15 तारखेला राजू शेट्टी, अजित नवले, महादेव जानकर, रविकांत तुपकर सह सर्व शेतकरी नेत्यांसोबत बैठक घेणार आणि सरकार समोर कसं जायचं याचा विचार करु असेही कडू यावेळी म्हणाले. 

कर्जमाफी योजना फसवी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची टीका

कर्जमाफी योजना फसवी आहे. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा नाहीच.अटी शर्ती घालून दिलेली कर्जमाफी शेतकरी हिताची नाही असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संदीप जगताप यांनी कर्जमाफी योजनेवर टीका केली. राज्याच्या अर्थसंकल्पात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2 लाख रुपयांपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याची घोषणा केली आहे. मात्र, ही घोषणा फसवी असल्याचे संदीप जगताप म्हणाले. निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करु, अशा घोषणा सरकारने केल्या होत्या. मात्र प्रत्यक्षात अटी शर्ती घालून केवळ 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्यात आली. ती ही 30 सप्टेंबर 2025 पर्यंतची. यामुळं शेतकऱ्यांचा भ्रमनिरास झाला असून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच नाही असेही जगताप म्हणाले.

सरसकट कर्जमाफी करणे गरजेचं, शेतकरी कामगार पक्षाची मागणी

राज्य सरकारनं केलेली कर्जमाफी दुर्दैवी असल्याचे शेतकरी कामगार पक्षाने म्हंटलं आहे. शेतकऱ्यांनी जनावरे विकून कर्ज फेडलेले आहे, म्हणून सरसकट कर्जमाफी अपेक्षित होती. शेतकऱ्यांच्या आत्महत्यामुळं महाराष्ट्राचा मसनवाटा झाला असताना शेतकरी अशा घोषणा करुन शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसणार असतील तर हे निंदनीय आहे. या कर्जमाफी विरोधात आम्ही शेतकऱ्यांसोबत आंदोलन उभं करणार आहोत. सरकारला द्यायचे असेल तर सरसकट कर्जमाफी द्यावी अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाने केली आहे. 

 

 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai MHADA: देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
देशातील सर्वात मोठा पुनर्विकास प्रकल्प, '15 मिनिटांचे शहर' म्हणून नवी ओळख, मोतीलाल नगर पुनर्विकासाचा मास्टरप्लान सादर
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Maharashtra Live blog updates: समृद्धी महामार्गालगत नवनगरे विकसित करण्याचा प्रकल्प बारगळला
Anil Parab : मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
मुंबईत MMRDA च्या टेंडर प्रक्रियेत फिक्सिंगचा आरोप, आठपैकी सहा कंपन्यांना माघार घ्यायला लावली, अनिल परबांचा गंभीर आरोप
Ashok Kharat Court Hearing: अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
अशोक खरातचा जेलमधील मुक्काम वाढला, पाचव्या गुन्ह्यात पाच दिवसांची पोलीस कोठडी, कोर्टात नेमकं काय घडलं?
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

PM Modi UNCUT : काँग्रेसने महिलांच्या अधिकारांची भ्रूणहत्या केली, स्वप्नांचा चक्काचूर केला- मोदी
PM Modi on Women Reservation Bill : काँग्रेसने त्यांचं अस्तित्व गमावलं तुफान हल्लाबोल
PM Modi on Women Reservation Bill : नारीशक्ती विधेयक नामंजूर, पंतप्रधान मोदींनी मागितली माफी
Sanjay Raut PC : 'मोदी हैं तो नामुमकिन हैं' अशी परिस्थिती, राऊतांचा हल्लाबोल
Sharad Ponkshe Nanded Speech : 1 लाख खरात एकत्र केले तर 1 अकबर तयार होईल, शरद पोंक्षे यांचं विधान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
दोरीने हात बांधलेल्या अवस्थेत विहिरीतून सख्ख्या बहिणींचे मृतदेह बाहेर काढले; गावात सन्नाट, पोलीसही चक्रावले
Ravichandran Ashwin: चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
चेन्नईचा सरसेनापती बदलणार? आयपीएलच्या मध्यावरच आर. आश्विनच्या भविष्यवाणीने खळबळ
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
घरच्या मैदानात आरसीबी हरताच कॅप्टन रजत पाटीदारचा संताप अनावर; नेमकं काय म्हणाला?
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
Video: बाॅम्बवर्षावातही माऊलीची नवजात बालकांना वाचवण्याची धडपड, जीवाच्या आकांताने पळापळ, आयसीयूतील रुग्ण रस्त्यावर; इराणी हॉस्पिटलवर अमेरिका-इस्त्रायलच्या नरसंहार हल्ल्याचा सव्वा दोन मिनिटांचा भयावह व्हिडिओ
IPL 2026 Points Table: चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
चेन्नईविरुद्धच्या विजयानंतर गुणतालिकेत हैदराबादची मोठी झेप; ‘हा’ संघ बाहेर पडणार? पाहा कोणता संघ कोणत्या स्थानावर?
Pune Crime News : खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
खळबळजनक! मुठा नदीपात्रात अज्ञात तरुणाचा मृतदेह सापडला, घातपाताचा संशय, पुणे पोलिसांकडून तपास सुरु
Bhandara Crime News: भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
भंडाऱ्यात गो तस्करांची मुजोरी, थेट पोलिसाची कॉलर पकडून धक्काबुक्की अन्...; नेमकं काय घडलं?
Jaykumar Gore : राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
राज्यावर एल निनोचं संकट, उन्हाळ्यात एकच पाण्याचे आवर्तन, उजनी धरणाच्या पाण्याचा काटकसरीने वापर, पालकमंत्री जयकुमार गोरेंचं सोलापूरकरांना आवाहन
Embed widget