एक्स्प्लोर

'मी लॉकडाऊन उघडतो, लोकं मृत्यूमुखी पडली तर जबाबदारी घ्याल का?' : मुख्यमंत्री ठाकरे

राज्यात काही शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाऊन केला जात आहे. यावरुन काहीजण सरकारवर टीका करत आहेत. याविषयी संजय राऊत यांनी मुलाखतीत प्रश्न केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय उत्तर दिलं?

मुंबई : राज्यात काही शहरांमध्ये टप्प्या टप्यात लॉकडाऊन केला जात आहे. यावरुन काहीजण सरकारवर टीका करत आहेत. याविषयी संजय राऊत यांनी मुलाखतीत प्रश्न केला असता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का?, तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाऊनने काय साधलं?, लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का?, लॉकडाऊनने आर्थिक संकट येत आहे, लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला फटका बसला. ठीक आहे बाबा, आम्ही तुम्हाला उघडून देतो. मात्र त्यानंतर दुर्देवाने लोकं मृत्यूमुखी पडले तर तुम्ही घेणार का त्याची जबाबदारी?, असा सवाल त्यांनी केला आहे. जे आज सरकारच्या दारी येऊन बसले आहेत. दार उघडं म्हणून टाहो फोडत आहेत, त्यांना इतकचं सांगेन की दारं उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यावर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का?, असा सवाल देखील त्यांनी लॉकडाऊनवरुन टीका करणाऱ्यांना केला आहे. राऊत यांनी ठाणे, अंबरनाथ, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ यासारख्या मुंबईच्या आजूबाजूच्या शहरांबरोबरच अगदी पिंपरी चिंचवड, चंद्रपूरसारख्या ठिकाणाही पुन्हा लॉकडाउन करावं लागलं आहे. तर अशाप्रकारे परत परत लॉकडाउन करण्याची वेळ का येत आहे?, असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले की, शहरं लॉकडाउन करण्याची वेळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक कटू सत्य आहे की या विषयावर नेमकेपणे सल्ला देणारं आणि बोलणारं जगामध्ये कोणीच नाहीय, असं ते म्हणाले. ... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता करावी ते म्हणाले की, मी असं कधीच म्हणणार नाही की लॉकडाऊन उठवतोय. मी अजिबात असं म्हणणार नाही. पण मी हळूहळू एक एक गोष्टी उघडत चाललो आहे. माझा प्रयत्न असा आहे की एकदा उघडलेली गोष्ट बंद होता कमा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा किंवा नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करुन चालणार नाही. जे केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करतायत त्यांनी आरोग्याची थोडीफार तरी चिंता केली पाहिजे. तसेच जे केवळ आरोग्याची चिंता करत आहेत त्यांनी आजच्या घडीला हे जरी सत्य असलं तरी थोडी आर्थिक चिंता पण करायला हवी. या सर्वाचं तारतम्य ठेऊन विचार केला पाहिजे. ही तारेवरची कसरत आहे. करोनाबरोबर जगायला शिकायचं म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकलं पाहिजे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.  शहरं आणि परिसर कालांतराने संकटातून बाहेर पडतील ठाकरे म्हणाले की, मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरातील प्रादुर्भाव वाढतोय. तुम्ही या विषाणूच्या वागणुकीचा आलेख पाहिला तर एक गोष्ट लक्षात येईल की हा गुणाकार करत जातोय. जिथे पाहिली सुरुवात होते तिथे तो शिखरावर जातो. त्यानंतर तो कर्व्ह फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशीरा सुरु होतो संसर्ग तिथे तो उशीरा शिखरावर जातो. या मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये जिथे उशीरा सुरु झालं आहे तिथे तो उशीराने शिखरावर चालला आहे. त्यामुळे ही शहर आणि परिसर कालांतराने बाहेर पडतील, असा विश्वास देखील मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. शरद पवारांची मुलाखत गाजल्यानंतर सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी घेतलेली ही मुलाखत आज 25 आणि उद्या 26 जुलैला प्रसारित होत आहे. पाहा संपूर्ण मुलाखत शरद पवार यांच्या मुलाखतीतील महत्वाच्या बातम्या भाजपनेच राष्ट्रवादीला सत्तेसाठी विचारणा केली होती, फडणवीसांच्या गौप्यस्फोटांमध्ये तथ्य नाही : शरद पवार पाकिस्तान नाही तर चीन आपला सर्वात मोठा शत्रू : शरद पवार  लॉकडाऊनबाबत कठोर भूमिका घेतली नसती तर न्यूयॉर्कसारखी अवस्था झाली असती : शरद पवार Sharad Pawar | सत्तेचा दर्प चालत नाही, लोक पराभव करतात; शरद पवार यांचा फडणवीस यांना टोला शिवसेना नसती तर भाजपचा आकडा 105 नाही 40-50 असता : शरद पवार 'सरकारचे हेडमास्तर की रिमोट कंट्रोल?', संजय राऊतांच्या प्रश्नावर शरद पवार म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
सीजेपीच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर मनसे आक्रमक, अमित ठाकरेंनी पोलिसांची गाडी अडवली, पोलिसांनाही इशारा
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Panchayat Raj Abhiyan : पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
पुरंदरच्या आडाचीवाडी ग्रामपंचायतीला सर्वोच्च ग्रामपंचायतीचा पुरस्कार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव
Bhandara Crime News:'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!
'वडिलोपार्जित शेतीचा हिस्सा पत्नीला न देता मला द्या' म्हणत जावयाचा सासऱ्यावर प्राणघातक हल्ला; भंडाऱ्याचं मडेघाट हादरलं!

व्हिडीओ

Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!
Maharashtra Drought Central Team : नुकसान आतोनात, कधी मदतीचा हात? केंद्रीय पथकासमोर मांडल्या व्यथा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
राजधानी दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी जेनझीचा अभूतपूर्व एल्गार, शेकडो ताब्यात; नेहा बोरा धावत कॅनाॅट प्लेसपर्यंत पोहोचली, व्हिडिओ शेअर करत धावत्या बसमधील जेलचा कोंडमारा दाखवला
Abhijeet Dipke: 'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
'कोणत्याही बाँडवर आम्ही स्वाक्षरी केलेली नाही त्यामुळे..' अभिजित दिपकेंनी दिल्ली पोलिसांच्या ताब्यातून सुटताच जंतर मंतर 2.0 साठी हुंकार भरला
Share Market : भारतीय शेअर बाजारासाठी वाईट बातमी, विदेशी गुंतवणूकदारांनी विक्रीचं टोक गाठलं,2026 मध्ये 3 लाख कोटी काढून घेतले
भारतीय शेअर बाजाराला हादरवणारी अपडेट, ऑक्टोबरच्या 6 दिवसात FPI नं 44166 कोटींच्या शेअरची विक्री 
Mukul Wasnik: कालपर्यंत ज्यांनी विविध राजकीय पक्षांना फोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना आता स्वतःचे खासदार शाबूत ठेवावे लागतील: मुकुल वासनिक
राजकीय पक्ष फोडणाऱ्यांना स्वत:चे खासदार शाबूत ठेवाण्यासाठी प्रयत्न करावे लागतील, मुकुल वासनिक यांचा भाजपला टोला  
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
आम्हाला म्हणतात, एक वर्ष शांती भंग करू नका, पण शांती भंग करण्याचे काम मोदी शाह करत आहेत, आम्ही आंदोलनातून मागे हटणार नाही; सीजेपीचा एल्गार, पाच मोठे मुद्दे
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
उत्तर कोरियामध्ये घडतं ते भारतात घडतंय, हिटलरचा शेवट कसा झाला, जेव्हा जेव्हा कोणी हुकूमशहा बनण्याचा प्रयत्न केला तेव्हा शेवट चांगला नाही; ध्रुव राठीचा मोदींवर हल्लाबोल
Ashutosh Ranka on PM Modi: आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट करुन टाकला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका
आपल्या महामानवाने स्वत:च्या आईच्या निधनाचाही इव्हेंट केला होता, सीजेपीच्या आशुतोष रांकाची पंतप्रधान मोदींवर बोचरी टीका

Embed widget