Breaking News LIVE :चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ
Breaking News LIVE Updates, 29 July 2021: देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा फक्त एका क्लिकवर...
LIVE

Background
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ
चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत अभूतपूर्व गोंधळ झाला आहे. काँग्रेस-भाजप नगरसेवक एकमेकांना भिडले असून महापौर यांनी काँग्रेस नगरसेवकांना फेकून मारली स्वतः ची नेमप्लेट मारली आहे. मनपाच्या 200 कोटी अंकेक्षण अहवाल आक्षेप व अन्य विषयावर सत्ताधारी भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. दोन्ही गटांमध्ये महापौर टेबल समोर झाली धक्काबुक्की झाली. काँग्रेस नगरसेवक नागरकर यांनी महापौर यांच्यासमोरील टेबल ठोकल्याने वाद वाढला. महापौरांनी विरोधी सदस्यांनी सभागृहाचा अवमान केल्याप्रकरणी प्रशासनाला कारवाईचे निर्देश दिले
कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला, आठ घरांचे किरकोळ नुकसान
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील कळणे मायनिंग परिसरातील डोंगराचा काही भाग खचला आणि भूस्खलन होऊन डोंगराचा काही भाग खाणीत कोसळला. त्यामुळे खाणीतील पाणी व चिखल युक्त माती परिसरातील शेती, लोकवस्तीत आलं. रस्त्यावर चिखल आल्यामुळे कळणे-तळकट मार्ग तूर्तास बंद करण्यात आला आहे. कळणे मायनिंग परिसरात मातीचा काही भाग खचल्यामुळे या ठिकाणच्या 8 ते 10 घरांचे किरकोळ नुकसान झाले आहे. यात एका घराची भिंत कोसळली आहे. तर रस्त्यावर चिखल व शेतीत चिखलाचं साम्राज्य पसरला आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौ-यावर
भाजपचे प्रदेशाध्यक्ष ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात दिल्ली दौऱ्यावर,
तब्बल चार दिवस प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील दिल्लीत असणार,
7, 8, 9, 10 ऑगस्ट असा सलग चार दिवस दिल्ली कार्यक्रम,
नव्या मंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी आणि इतर संघटनात्मक भेटींसाठी दिल्लीत,
दिल्ली दौऱ्यात महाराष्ट्राच्या दृष्टीने काही संघटनात्मक बदलांवर चर्चा होणार का याची उत्सुकता,
या दौऱ्यात चंद्रशेखर बावनकुळे, जयकुमार रावल सोबत असणार आहेत,
किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा, प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा
खोटे आरोप केल्याचं सांगत करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल,
शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात दाखल केला विशेष दिवाणी दावा,
किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते,
त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात , ठाणे कोर्टात १०० कोटींचा विशेष दिवाणी दावा आमदार प्रताप सरनाईक यांनी दाखल केला आहे. ,
रीतसर प्रक्रिया करून हा दावा नुकताच दाखल केला गेला असून सोमय्या यांना आता त्यांनी केलेल्या निराधार आरोपांबाबत कोर्टात उत्तर द्यावे लागणार आहे
प्रताप सरनाईकांचा किरीट सोमय्यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल
प्रताप सरनाईकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या किरीट सोमय्या यांच्या विरोधात 100 कोटींचा दावा दाखल करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी ठाणे कोर्टात विशेष दिवाणी दावा केला आहे. किरीट सोमय्या यांनी खोट्या विधानांबाबत माफी न मागितल्यास त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असे आमदार सरनाईक यांनी जाहीर केले होते. त्यानुसार किरीट सोमय्या यांच्या विरोधात ठाणे कोर्टात 100 कोटींचा विशेष दिवाणी दावा दाखल केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
