APMC Election Result Live Updates : अहमदनगर: जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीत राष्ट्रवादी आणि भाजपला प्रत्येकी 9 जागेवर विजय
APMC Election 2023 : राज्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आज राहिलेल्या काही ठिकाणचे निकाल जाहीर होणार आहेत.
LIVE

Background
Nashik APMC Election : मनमाड बाजार समितीमध्ये आ.सुहास कांदे यांना मोठा धक्का, भुजबळ गटाची एकहाती सत्ता
Nashik APMC Election : मनमाड बाजार समितीसमध्ये भुजबळ गटाने एकहाती सत्ता मिळवली असून सुहास कांदे गटाचा पराभव करण्यात आला आहे. बाजार समिती निवडणुकीत 18 पैकी 14 जागेवर भुजबळ गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर सुहास कांदे यांच्या गटाला अवघी 1 जागेवर समाधान मानावे लागले आहे. व्यापारी गटातून व्यापारी विकास पॅनलला 2 जागा तर हमाल मापारी गटातून अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.
- मनमाड बाजार समितीत आमदार सुहास कांदे यांना मोठा धक्का, 11 पैकी 7 जागेवर महाविकास आघाडी विजयी
- मनमाड बाजार समितीत आ.सुहास कांदे यांना मोठा धक्का..
- सोसायटी गटातून शिवसेना ( उध्दव ठाकरे गट ) जिल्हाप्रमुख गणेश धात्रक विजयी..डॉ.संजय सांगळे यांचा केला पराभव...
- महाविकास आघाडीचे माजी आमदार संजय पवार सोसायटी गटातून विजयी..
- महिला राखीव जागेवरही संगीता कराड व चंद्रकला पाटील विजयी..
- सोसायटी गटातही महाविकास आघाडीची सरशी..
- ११ पैकी ७ जागेवर महाविकास आघाडी विजयी...
- महाविकास आघाडी - ७ शिंदे गट - १ , व्यापारी विकास - २ तर अपक्ष - १
पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत 18 पैकी 18 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा विजय
APMC Election: पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीचे निकालाचे आकडे स्पष्ट
18 पैकी 18 जागांवर शिंदे गटाच्या शिवसेनेचा विजय
रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांचा मोठा विजय
महाविकास आघाडीला एकही जागा मिळवता आली नाही
मनमाड बाजार समितीच्या सात जागांचे निकाल जाहीर..जागेवर महाविकास आघाडीची बाजी
मनमाड बाजार समितीच्या सात जागांचे निकाल जाहीर.
APMC Election: नाशिकच्या अत्यंत चुरशीच्या मनमाड बाजार समिती निवडणुकीत 7 जागांचे निकाल जाहीर झाले असून ग्रामपंचायत गटातील 3 जागेवर महाविकास आघाडीने बाजी मारत शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांना जोरदार धक्का दिला आहे. महाविकास आघाडीच्या या विजयानंतर कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला आहे. शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या गटाला 4 पैकी केवळ 1 जागा मिळाली. आतापर्यंत 7 जागांचे निकाल जाहीर झाले असून महाविकास आघाडी 3 शिंदे गट 1 व्यापारी विकास 2 व अपक्ष 1 असे बलाबल आहे..
प्रतिष्ठेच्या पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीवर राष्ट्रवादीचे बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता, 18 पैकी 12 जागांवर विजय
परभणी जिल्ह्यातील दहा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक पार पडली. मात्र या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा आणि प्रतिष्ठेची निवडणूक झाली होती ती पाथरी कृषी उत्पन्न बाजार समितीची. मागच्या 30 वर्षापासून पाथरीवर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांची सत्ता आहे. ही सत्ता काबीज करण्यासाठी त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते सईद खान यांनी सर्व ताकत पणाला लावली होती. मात्र असा असताना कालआलेल्या निकालांती राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी 18 पैकी 12 जागा जिंकत पुन्हा एकदा या बाजार समितीवर विजय मिळवला तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 6 जागा मिळाल्या आहेत. दरम्यान बाजार समिती विजयानंतर राष्ट्रवादीचे आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या स्थानिक नेत्यांवर घनाघाती टीका केलीय.शिंदेंनी उद्धव ठाकरेंचा पक्ष चोरला त्यांच्या वडिलांचे नाव चोरलं 15 मे च्या आत यांचा फैसला होणार आहे. शिंदे यांनी सरकारी तिजोरीवर डल्ला मारलाय आणि तोच पैसा खाली त्यांच्या चोर कार्यकर्त्यांना देऊन ते निवडणूक लढवत असल्याचा गंभीर आरोप बाबाजानी दुर्राणी यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
