एक्स्प्लोर

मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची काय गरज होती, वकील कशाला ठेवलेत? अजितदादांनी सुप्रिया सुळेंना झापलं

मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची गरज काय होती? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी हे कोर्टात गेले का असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला. 

मुंबई कोर्टाची पायरी कुणामुळे चढावी लागली असा सवाल उपस्थित करताना राष्ट्रवादी  शरद पवारांचा (Sharad Pawar)  रोख अजित पवारांकडे (Ajit Pawar) होता. तसंच मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जावं लागलं अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळेंनी दिली होती. माझा व्हिजन कार्यक्रमात अजित पवारांनी दोघांनाही प्रत्युत्तर दिलंय. मुलीचा वाढदिवस असताना कोर्टात जायची गरज काय होती? असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी विचारला आहे. तसंच सहानुभूती मिळवण्यासाठी हे कोर्टात गेले का असा प्रश्नही अजित पवारांनी उपस्थित केला. 

अजित पवार म्हणाले,   सुप्रिया नेहमी सांगते माझ्या मुलीचा वाढदिवस होता तरी मला कोर्टात जावे लागले.पण वाढदिवस करायचा कोर्टात कशाला गेली? त्यादिवशी कोर्टात नव्हते जायचे किंवा वकिलाला सांगायचे माझ्या मुलीचा वाढदिवस आहे पुढची तारीख दे...हे भावनिक करणे चांगले नाही.. रेवती पण माझी मुलगी आहे पण माझ्या मुलीचा वाढदिवस होता तिथे बसले तिथे तिला यायला सांगितले, असे नका करू, ठीक आहे माझी मत वेगळी तुमची मत वेगळी... मी कोणालाचा कोर्टात जायला सांगितले नाही मी स्वत कोर्टाची पायरी चढली नाही. मी वकिलाला पैसे देतो त्याने माझी बाजू मांडली पाहिजे. 

आपण कोर्टात जाऊन काय करणार?

निवडणूक आयोगाकडे आम्ही पक्ष आणि पक्षचिन्हासाठी गेलो. उद्या आम्ही कोर्टात गेलो,  आपण कोर्टात जाऊन काय करणार? कोर्टात तुमच्यावतीने  वकील भांडणार, आपण फक्त हा वकील काय बोलतो? तो वकील काय बोलतो, कोर्ट काय बोलतो ते बघणार. आपल्याला तिथे काय अधिकार आहेत. सहानुभूती मिळवण्यासाठी कोर्टात गेलात का? असा सवाल अजित पवारांनी केला आहे.  

सुप्रिया सुळेंनी काय पोस्ट केली?

सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेची सुनावणी पार पडली. यावेळी सुप्रिया सुळे यांच्याबरोबर त्यांची मुलगी देखील सर्वोच्च न्यायालयात आली होती. यावेळी सुप्रिया सुळेंनी पोस्ट करत शुभेच्छा दिल्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या,  माझी मुलगी रेवतीचा आज वाढदिवस आहे. नेमकी आजच सुप्रीम कोर्टाची सुनावणी होती. ती देखील आज माझ्यासोबत कोर्टात आली आहे. आम्ही मुली खंबीरपणे उभा राहून संघर्ष करीत आहोत.आम्ही सर्वजणी लढणाऱ्या मुली आहोत, याचा मला सार्थ अभिमान वाटतो. हॅपी बर्थडे रेवती.

हे ही वाचा :

शरद पवारांनी केलेली नक्कल अजितदादांच्या जिव्हारी लागली; म्हणाले, प्रगल्भ नेत्याला असली कृती शोभत नाही

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kankavli Vidhan Sabha : निवडणूक निकालांसाठी प्रशासनाची जय्यत तयारी, कडेकोट सुरक्षा तैनातNashik Vidhan Sabha : दादासाहेब गायकवाड सभागृहात स्ट्राँग  रूमची उभारणी,प्रशासकीय यंत्रणा सज्जBachchu Kadu On MVA Mahavikas Aghadi :युती आघाडीकडून फोन आले, बच्चू कडूंची माहितीVinod Tawade Update : माझी बदनामी करणाऱ्या नेत्यांना कायदेशीर नोटीस पाठवली - विनोद तावडे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sushma Andhare on Eknath Shinde : सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
सहज आठवण करून द्यावी म्हटलं बाकी काही नाही; सुषमा अंधारेंनी निकालापूर्वीच ट्विट करत सीएम शिंदेंना डिवचलं!
10 Naxalites killed in Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
छत्तीसगडमध्ये चकमकीत सुरक्षा दलांकडून 10 नक्षलवाद्यांचा खात्मा; 3 स्वयंचलित शस्त्रे जप्त, चालू वर्षात 207 नक्षली मारले गेले
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
Share Market : शेअर मार्केटमध्ये तेजी, सेन्सेक्स 1 हजार 900 अंकांनी वधारला, एकाच दिवसात गुंतवणूकदारांना 7 लाख कोटींचा फायदा
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
अन्यथा 100 कोटींचा दावा ठोकेन, पैसे वाटपप्रकरणावरुन विनोद तावडेंची राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांना नोटीस
Jitendra Awhad on Ajit Pawar : गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो, वाजंत्री वगैरे घालून फिरतात, बाकी कुठे गुलाबी रंग चालत नाही; अजित पवारांना खोचक टोला!
Maharashtra Assembly Election 2024 : अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
अपक्ष, बंडखोरांना गळाला लावण्यासाठी भाजपने तोंडात साखर असणारी 6 माणसं नेमली, जोरदार फिल्डिंग लावली
Maharashtra Vidhansabha Result: निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
निवडणूक निकालानंतर गुलाल उधळा, पण मिरवणुकीला बंदी; नाशिक पोलिसांचा आदेश जारी
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
... तर जितेंद्र आव्हाडांचा गुलाम म्हणून राहील, बारामतीवरून अमोल मिटकरींचं चॅलेंज 
Embed widget