एक्स्प्लोर

शिर्डी विमानतळाला जंगम मालमत्ता जप्तीचं वॉरंट, थकबाकी वसुलीसाठी काकडी ग्रामपंचायतीकडून कारवाई

Shirdi Airport : शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची बाकी रक्कम न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ प्रशासनास दिले आहे.

शिर्डी : येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे (Shirdi Airport) असलेली थकीत कराची बाकी रक्कम न भरल्याने जंगम मालमत्ता जप्तीचे वॉरंट काकडी ग्रामपंचायतीने विमानतळ प्रशासनास दिले आहे. कोपरगाव (Kopargaon) तालुक्यातील काकडी येथे असलेल्या शिर्डी विमानतळाकडे काकडी ग्रामपंचायतीची (kakadi Grampanchayat) कराची रक्कम सातत्याने पाठपुरावा करुनही मिळत नसल्याने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 अन्वये ही कारवाई करण्यात आली आहे.

ग्रामपंचायतीने महाराष्ट्र विमान विकास प्राधिकरण कंपनी, मुंबई यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, करबाकी भरण्याबाबत सातत्याने दिलेली पत्रे, फेब्रुवारी 2023 मध्ये दिलेले अंतिम स्मरणपत्र, 24 मार्च 2024 रोजी हुकूम नोटीस, 129 प्रमाणे दिलेली करवसुली नोटीस, राष्ट्रीय लोकअदालत नोटीस, ग्रामपंचायतीचा मासिक सभा ठराव देऊनही कर भरणा केलेला नाही. 

अनेकदा बजावली नोटीस 

त्यामुळे आपल्या शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळाकडे असलेली थकीत कराची वसुली करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 124 व कलम 129 अन्वये मिळकतीप्रमाणे मागणी बिले, नोटीस, रिट हुकूम, लोकअदालत नोटीस बजावलेल्या आहेत. थकबाकी वसुली करण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम 129 नुसार खालीलप्रमाणे जंगम मालमत्ता असून सदरील जंगम मालमत्ता कराची थकबाकी न भरल्यामुळे मालमत्तांचे येणे आहे. 

2016 सालापासून विमानतळाकडे थकबाकी

करपात्र जंगम मालमत्ता आरसीसी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर टर्मिनल बिल्डिंग (पोर्च), आरसीसी पद्धतीचे घर पेव्हर ब्लॅक एरिया पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर इंडियन आईल पंप पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर सबस्टेशन बिल्डिंग पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पॉवर (जेनरेटर बिल्डिंग) पहिला मजला, मनोरा तळ घर एटीसी टाबर पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर रनवे पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर जीएसआर वॉटर टैंक पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर वॉल कंपाउंड पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. 1 पहिला मजला, आरसीसी पद्धतीचे घर पार्किंग रस्ता नं. 2 पहिला मजला, पडसर खुली जागा 823.50 एकर जागांवर ग्रामपंचायतीने 2016-17 पासून कर आकारणी केलेली आहे. 8 कोटी 30 लाख रुपये कराची रक्कम ग्रामपंचायत कार्यालयास जमा होत नसल्याने गावच्या सर्वांगीण विकासावर व दैनंदिन कामकाजावर परिणाम होत आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीकरिता जंगम मालमत्ता जप्ती वॉरंट बजावण्यात येत वॉरंटमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आणखी वाचा 

Shirdi News : 'गावाला लागून शिर्डीचे भव्य विमानतळ, मात्र गावात साधी एसटी येत नाही; शिर्डीजवळील काकडी गावकऱ्यांचा आरोप 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Ramtek Constituency : रामटेक मतदारसंघात ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न?Special Reprot Amit Thackeray : आधी अमित ठाकरेंचा प्रचार आता सरवणकरांचा, तीन सेनेंच्या लढाईत कुणाची बाजी?Zero Hour Ek Hai To Safe Hai : एक है तो सेफ है, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा नाराZero Hour Eknath Shinde : माहीमची जागा, एकनाथ शिंदेंकडून एका दगडात दोन 'पक्ष'?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
मला कोणाच्याही नरड्यावर पाय ठेऊन माझं राजकीय अस्तित्व निर्माण करायचं नाही; प्रितम मुंडेंची खंत
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
''उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासण्यापेक्षा पुलावामातील स्फोटकाच्या बॅगा तपासल्या असत्या तर 40 जवान शहीद झाले नसते''
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
शशिकांत शिंदे यांची ताकद वाढली, कोरेगावात शालिनीताई पाटलांचा जाहीर पाठिंबा, महेश शिंदे विश्वासघातकी असल्याची टीका
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
मराठा आरक्षण भेटलच पाहिजे, मोदींच्या पुण्यातील सभेत VVIP रांगेत मराठा युवकाची घोषणाबाजी; पोलीस धावतच आले
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
स्थिर पथकाला हेलिकॉप्टर व विमान तपासणीचा अधिकार; निवडणूक आचारसंहिता काळात काय आहे नियमावली
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
लोकसभेला पाठिंबा देताना भाजपकडे 4 मागण्या केल्या होत्या; बाळा नांदगावकरांचं गौप्यस्फोट, माहीमवरही बोलले
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
त्यांना अल्लाची प्रॉपर्टी ताब्यात घ्यायचीय, वक्फ बोर्ड विधेयकावरुन ओवैसींचा हल्लाबोल; फडणवीसांवरही निशाणा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget