(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Kolhapur Circuit Bench : सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ; मुख्यमंत्र्यांकडून आश्वासन
Kolhapur Circuit Bench : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.
Kolhapur Circuit Bench : कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच स्थापन होण्यासाठी हिवाळी अधिवेशनानंतर मुख्य न्यायमूर्तींची भेट घेऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. कोल्हापूरच्या खंडपीठासाठी लढा देत असलेल्या खंडपीठ कृती समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी रत्नागिरीत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली.
खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक आणि कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. गिरीश खडके व बार कौन्सिल सदस्य ॲड. संग्राम देसाई यांनी मुख्य न्यायमूर्ती यांच्या पत्रानुसार तुम्ही (मुख्यमंत्री) सर्किट बेंच प्रश्नी त्यांची भेट घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. सहा जिल्ह्याचा लढा अंतिम टप्प्यात असल्याचे ते म्हणाले. बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष ॲड. महादेवराव आडगुळे यांनी 37 वर्षांचा लढ्याची आपल्या कारकिर्दीमध्ये यशस्वी सांगता व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली. मुख्यमंत्री शिंदे यांनी सर्किट बेंच लढा आमचा जिव्हाळ्याचा आहे. त्यामुळे अधिवेशन संपताच या प्रश्नी मुख्य न्यायमूर्ती यांच्याशी पत्र व्यवहार करून भेट घेऊ व हा प्रश्न मार्गी लावू, असे आश्वासन दिले.
यावेळी माजी अध्यक्ष ॲड. प्रशांत चिटणीस व पंढरपूरचे बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. भगवान मुळे यांनी मुख्यमंत्र्यांना विठ्ठल रुक्मिणी मूर्ती भेट दिली व तुळशीहार घालून सत्कार केला. खंडपीठ कृती समिती शिष्टमंडळात विजयकुमार ताटे देशमुख, सातारा बार असोसिएशनचे अध्यक्ष शिवाजीराव मर्ढेकर, ॲड. नारायण भांदिगरे, सांगली बारचे अध्यक्ष प्रदीप जाधव, भाऊसाहेब पोवार, रत्नागिरी बारचे अध्यक्ष दिलीप धारिया, मधुकर नाईकनवरे, राहुल बोडके, प्रताप हारुगडे, (सांगली), सचिन पाटील, फारूक मुजावर, सुभाष संकपाळ आदींचा समवेश होता.
इतर महत्वाच्या बातम्या