एक्स्प्लोर

Gyanvapi Masjid Case : ज्ञानवापी मशिद केस प्रकरणी मुस्लिम पक्षकारांना झटका, वाराणसी कोर्टाची मशिदीच्या ASI सर्व्हेला मंजुरी

Gyanvapi Case Update : ज्ञानवापी मशिदीचे सर्वेक्षण करण्यासाठी भारतीय पुरातत्व खात्याला मंजुरी मिळाली आहे.

Gyanvapi Mosque Case : ज्ञानवापी मशिदीच्या प्रकरणी एक मोठी बातमी आली आहे. वाराणसी कोर्टाने मशिदीच्या वजूखाना भागाला सोडून इतर भागात भारतीय पुरातत्व खात्याला सर्व्हे करण्यासाठी मंजुरी दिली आहे. ज्ञानवापी मशीद प्रकरणात हिंदू पक्षकाराचे प्रतिनिधित्व करणारे वकील विष्णू शंकर जैन यांनी सांगितले की, न्यायालयाने भारतीय पुरातत्व खात्याला मशिदीचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी पुरातत्व खातं या पाहणीचा अहवाल 4 ऑगस्ट रोजी जिल्हा न्यायाधीशांना देणार आहे.

ज्ञानवापी प्रकरणी हिंदू पक्षकाराचा अर्ज स्वीकारण्यात आला असून न्यायालयाने वजू टाकी वगळून इतर ठिकाणी सर्वेक्षण करावं असे निर्देश दिले आहेत.

ज्ञानवापी मशीद संकुलात सापडलेल्या शिवलिंगाचे वैज्ञानिक सर्वेक्षण आणि कार्बन डेटिंगला परवानगी देणाऱ्या अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. त्या आधी वाराणसी न्यायालयाने या शिवलिंगाच्या कार्बन डेटिंगला परवानगी नाकारली होती. त्यानंतर हा वाद अलाहाबाद उच्च न्यायालयात पोहोचला. अलाहाबाद न्यायालयाने वाराणसी न्यायालयाचा निकाल बदलला आणि ज्ञानवापीमध्ये सापडलेल्या शिवलिंगाचे कार्बन डेटिंग करण्याची परवानगी दिली. हे शिवलिंग किती जुने आहे याचे वैज्ञानिक सर्वेक्षण करावं असा आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिला होता. ज्ञानवापी मशिदीतील ते शिवलिंग किती जुने आहे हे वैज्ञानिक सर्वेक्षणाद्वारे शोधावे लागेल, ते खरोखर शिवलिंग आहे की आणखी काहीतरी आहे याचाही शोध घेण्याचे आदेश अलाहाबाद न्यायालयाने दिले होते. 

Gyanvapi Masjid Case : काय आहे प्रकरण? 

ऑगस्ट 2021 मध्ये पाच महिलांनी श्रृंगार गौरी पूजेसाठी आणि अन्य धार्मिक बाबींसाठी एक याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेनंतर दिवाणी कोर्टाचे न्या. रवी कुमार दिवाकर यांनी कोर्ट कमिश्नर नियुक्त करून ज्ञानव्यापी मशिदीचे  सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. हिंदू पक्षकारांनी दावा केली की, या सर्वेक्षणादरम्यान मशिदीच्या आवारात शिवलिंग आढळून आले. तर, मुस्लिम पक्षकारांनी सांगितले की हा फवारा आहे. त्यानंतर हिंदू पक्षकारांनी हा भाग सील करण्याची मागणी केली होती. कोर्टाने हा भाग सील करण्याचे आदेश दिले. त्याविरोधात मुस्लिम पक्षकारांनी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?

व्हिडीओ

Bharat Gogawale On Vikas Gogawale : भरतशेठला कुणीही हरवू शकत नाही, मुलाच्या विजयावर प्रतिक्रिया
ZP BJP Result : 731 पैकी 319 कल-निकाल हाती, निकालांमध्ये भाजपची शंभरी
Uddhav Thackeray Special Report : संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना साकडं, ठाकरे पुन्हा विधान परिषदेवर?
Ritu Tawde Special Report : रितू तावडेंच्या 'त्या' वक्तव्यावरुन राजकीय वातावरण तापलं, राऊतांची टीका
Ajit Pawar Accident : अजितदादांच्या अपघाताबाबत डीजीसीए अहवालातून शंकांचं समाधान होणार? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur ZP Election Result: ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
ऐनवेळच्या पक्षांतराने 'विश्वास' गमावला? गोकुळचे माजी अध्यक्ष आबाजी पाटलांच्या मुलाचा दारुण पराभव; तिकडं अरुण डोंगळेंच्या मुलीनं विजय खेचून आणला
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
मोहिते पाटलांसाठी कही खुशी कही गम, माळशिरसमध्ये अर्जुनसिंहांचा जिल्हा परिषदेवर विजय, पण...
Chhatrapati Sambhajinagar ZP Result: अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
अब्दुल सत्तारांचे चिरंजीव जिल्हा परिषदेच्या आखाड्यात विजयी; अंभई गटातून भाजपच्या उमेदवाराला पाडलं
ZP Election Result 2026: भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
भाजप नंबर 1, शिंदे गटही शंभरी पार; जिल्हा परिषदेतील 500 जागांचा चक्रावणारा निकाल, कुणाला किती जागा?
Vaibhavwadi Panchayat Samiti Election Result 2026: वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
वैभववाडी पंचायत समितीवर नितेश राणेंचे वर्चस्व, भाजपने सर्व जागांवर उधळला विजयाचा गुलाल, PHOTO
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
धाराशिवात एका मताने उलटली सत्ता!  ढोकी पंचायत समितीत ठाकरे गटाने भाजपकडून विजय खेचून आणला, फक्त एका मताने भाजपचा पराभव
Satara ZP Election Result 2026 : साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंचा तारळे जिल्हा परिषद गटात विजयाचा झेंडा, मकरंद पाटील यांना तळदेवमध्ये धक्का
साताऱ्यात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेनं खातं उघडलं, शंभूराज देसाईंनी तारळेचा गड जिंकला, लिंबमध्ये भाजप विजयी
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
आम्ही फक्त झेंडाच घ्यायचा का? म्हणत ऐन निवडणुकीत मुश्रीफांची साथ सोडलेल्या शीतल फराकटेंना पराभवाचा धक्का; कागलात मंडलिक गटाचे पानिपत, गगनबावड्यात सतेज पाटलांचे वर्चस्व कायम
Embed widget