एक्स्प्लोर

Railway Fare Slashed: रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! आता रेल्वे प्रवास होणार स्वस्त; वंदे भारतसह इतर रेल्वे तिकीटात 25 टक्क्यांपर्यंत कपात

Railway Fare: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी चांगली बातमी आहे. वंदे भारतसह इतर गाड्यांच्या तिकीटांत 25 टक्क्यांपर्यंत कपात होणार आहे.

Railway Fare Slashed: रेल्वे मंत्रालयाने रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. वंदे भारतसह (Vande Bharat) सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचं भाडं 25 टक्क्यांपर्यंत कमी केलं जाणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचं आरक्षण व्हावं, यासाठी भाड्यात कपात केली जाणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं. रेल्वेचं भाडं आता स्पर्धात्मक पद्धतीने ठरवण्यात येणार आहे.

रेल्वेमधील आरामदायी सुविधांचा वापर प्रवाशांना करता यावा, या  दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. एसी प्रवास सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.

कोणत्या रेल्वे गाड्यांना लागू होणार योजना?

ही योजना एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये अनुभूती आणि व्हिस्टाडोम कोच असणाऱ्या रेल्वेंसह वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या डब्यांमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, मूळ भाड्यावर 25 टक्क्यांपर्यंत सूट लागू केली जाणार आहे. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार (Super fast surcharge), जीएसटी सारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील. 

रेल्वेचा नेमका आदेश काय?

गेल्या 30 दिवसांत ज्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल.

तात्काळ लागू होणार योजना

रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत तात्काळ प्रभावीपणे लागू होणार आहे. अर्थात, ज्यांनी आधीच तिकीट बुक केलं आहे अशा प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही. 

बऱ्याच दिवसांपासून केली जात होती मागणी

वंदे भारतसह इतर सुपरफास्ट एक्स्प्रेसचं तिकीट हे फार जास्त होतं, त्यामुळे तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. त्यासाठीच भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी रेल्वेने तिकीट भाड्याच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.

हेही वाचा:

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा पावसात भिजले! सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल; राजकीय वातावरण बदलणार?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MNS Gudi Padwa Melava Teaser  : मनसेचा गुढीपाडवा मेळाव्याचा टीझर प्रदर्शितKolhapur PolicePC : प्रशांत कोरटकरला कशी केली अटक? पोलिसांनी सांगितला A टू Z कहाणीJob Majha : MPSC मार्फत भरती, नोकरीची संधी? अटी काय?Eknath Shinde Aaditya Thackeray Meet : एकनाथ शिंदे-आदित्य ठाकरे आमने-सामने, बैठकीत काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
नराधम सावत्र बापाचे मुलीशी अश्लील वर्तन, मुलीने चाकूने बापाचे गुप्तांग कापलं, नालासोपाऱ्याच्या रस्त्यावर थरार
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
प्रशांत कोरटकरला अटक, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; पोलिसांनी कसा पकडला?
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
आदित्य ठाकरेंचा हनुवटीवर हात, पापणीही हलेना; शिवसेना फुटीनंतर शिंदेसोबतची पहिली भेट, पाहा चर्चेतले फोटो
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 24 मार्च 2025 | सोमवार
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
लहान भाऊ, सख्खा वैरी! मोठ्या भावाच्या नावावर परस्पर काढलं तब्बल 50 लाखांचं कर्ज; 'या' एका चुकीमुळे करामत उघड
Ulhasnagar : कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
कौटुंबिक वाद मिटवायला आले आणि जावयालाच धुतलं, सासरच्या लोकांच्या हल्ल्यात जावई गंभीर जखमी
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
Video: शिवसेना फुटीनंतर पहिल्यांदाच ठाकरे-शिंदे आमने-सामने; उपमुख्यमंत्री येताच आदित्य यांचा स्वॅग, तोंड फिरवलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
नागपूर बुलडोझर कारवाईला स्टे, फहीम खानच्या आईची न्यायालयात धाव; हायकोर्टाने महापालिकेला फटकारलं
Embed widget