एक्स्प्लोर

Sharad Pawar: शरद पवार पुन्हा पावसात भिजले! सुप्रिया सुळेंची पोस्ट व्हायरल; राजकीय वातावरण बदलणार?

Nashik: शरद पवार आणि पाऊस हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्र 2019 पासून पाहत आहे. सध्या राष्ट्रवादीच्या फुटीनंतर पुन्हा एकदा हे समीकरण महाराष्ट्रात पाहायला मिळाल्यानं चर्चांना उधाण आलं आहे.

Maharashtra NCP Crisis: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे नाशिक (Nashik) जिल्ह्यात असून येवला येथील सभेसाठी (Yeola) ते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. या दरम्यान शरद पवार (Sharad Pawar) पुन्हा एकदा पावसात भिजले असून त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, आता पुन्हा एकदा राज्यातील राजकारणाचं वातावरण बदलणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्याला कारण आहे 2019 मधील शरद पवारांची पावसातील सभा. 2019 च्या सभेत भर पावसात शरद पवार यांनी साताऱ्यात आपलं भाषण सुरु ठेवलं आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणातील अनेक समीकरणं बदलल्याचं म्हटलं जातं.

मुसळधार पावसात मुंबईहून नाशिककडे निघालेल्या शरद पवार यांचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी जोरदार स्वागत केलं. यादरम्यान, पावसाचे दिवस असतानाही दौऱ्यावर निघालेल्या शरद पवार यांचा पावसात भिजलेला एक फोटो त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनी शेअर केला आहे. ‘भाग गए रणछोड सभी, देख अभी खडा हूँ मै, ना थका हूँ, ना हारा हूँ, रण मे अटल खडा हूँ मै' असं कॅप्शन त्यांनी शरद पवारांच्या फोटोला दिलेलं आहे. 'सगळे पळपुटे पळून गेले तरी, मी अजूनही उभा आहे. मी ना थकलोय, ना हरलोय, रणामध्ये अटलपणे उभा आहे' असा अर्थ या ओळींचा होतो. 

खासदार सुप्रिया सुळे यांनी या फोटोतून शरद पवारांची लढाऊ वृत्ती दर्शवली आहे. अजित पवार यांनी केलेल्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अनेक बडे नेते अजित पवार यांच्यासोबत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत काही मोजकेच आमदार आणि नेते उरले आहेत.

राष्ट्रवादीत पडलेल्या फुटीनंतर शरद पवारांनी आपल्या महाराष्ट्रव्यापी दौऱ्याला सुरुवात केली आहे आणि या दौऱ्याची सुरुवात त्यांनी छगन भुजबळ यांच्या मतदारसंधातून केली आहे. शरद पवार यांची नाशिकमधील येवला मतदारसंघात सभा आहे. या दरम्यान ते पुन्हा एकदा पावसात भिजले असून हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. राजकारणात आता कोणतं नवीन समीकरण दिसणार का? अशा चर्चा आता सुरू झाल्या आहेत.

मी अजून म्हातारा झालेलो नाही...

येवल्यातील सभेआधी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे, यावेळी त्यांनी पुन्हा एकदा वयाबाबत टीका करणाऱ्या लोकांना ठणकावलं आहे. मी वयाच्या 82 व्या वर्षीही काम करू शकतो, मी अजून म्हातारा झालेलो नाही, असं म्हणत निवृत्तीचा सल्ला देणाऱ्या अजित पवारांना शरद पवारांनी टोला लगावला आहे. तर जोपर्यंत जीव आहे, तोपर्यंत राष्ट्रवादीला जनमानसात नेणार असल्याचं सांगत 'ना टायर्ड हूँ, ना रिटायर्ड हूँ' अशा शायराना अंदाजात वय झाल्याच्या टीकेला शरद पवार (Sharad Pawar)  यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. 

हेही वाचा:

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole : सत्तारांना पराभूत करण्यासाठी ठाकरेंची भाजपला साद!Ravindra Waikar Jogeshwari  Land Case : वायकर यांच्याविरोधातील जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरण बंदTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 16 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 16 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma and Ritika Sajdeh Baby Boy : रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
रोहित शर्माला पुत्ररत्न, पत्नी रितिकाने दिला गोंडस बाळाला जन्म, कर्णधार पर्थ कसोटीत खेळणार?
Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
मुंबईकरांनो, रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; प्रवासाचं नियोजन करुनच घराबाहेर पडा!
Ravindra Waikar : जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी रवींद्र वायकरांना मोठा दिलासा, प्रकरण बंद; पालिका म्हणते गैरसमजातून गुन्हा दाखल!
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
'शैतान'चा कल्ला, 'स्त्री 2'ची भिती; 2024 मध्ये 'या' चित्रपटांनी बॉक्स ऑफिस गाजवलं, तुम्ही पाहिलेत का?
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
माझ्या विरोधात इच्छुकांची मोठी रांग, मग मीच तुतारीच्या नेत्याला फोन लावून लवकर उमेदवार ठरवायला सांगितलं : धनंजय मुंडे
Sa vs Ind 4th T20 : अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
अबब...! दक्षिण आफ्रिकेत चौथ्या टी-20 सामन्यात संजू आणि तिलक वर्माने घातला विक्रमांचा रतीब
Horoscope Today 16 November 2024 : आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
आज शनिवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा राहील? वाचा आजचे राशीभविष्य
Astrology : आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
आज गजकेसरी योगासह बनले अनेक शुभ योग; मेषसह 4 राशींना होणार अपार धनलाभ, नशिबाला लागणार चार चाँद
Embed widget