(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Satya Pal Malik : मोदी सरकारच्या चुकीमुळं पुलवामा हल्ला, सत्यपाल मलिकांचा मोठा गौप्यस्फोट
Satya Pal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी मोठा गौफ्यस्फोट केला आहे.
Satya Pal Malik : जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक (Satya Pal Malik) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. मोदी सरकारच्या (Modi Govt) चुकीमुळं पुलवामा हल्ला झाल्याचं वक्तव्य सत्यपाल मलिक यांनी केलं आहे. प्रसारमाध्यमाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा गौप्यस्फोट केला आहे. पुलवामा हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra modi) गप्प राहण्याचे निर्देश दिले होते असाही गौप्यस्फोट मलिकांनी केली.
गृह मंत्रालयाने जवानांना विमानं दिली नाहीत
पुलवामामध्ये CRPF च्या 40 जवानांनी विमानाची मागणी केली होती. त्यांना केवळ 5 विमानांची आवश्यकता होती. मात्र, गृह मंत्रालयाने त्यांना विमानं दिली नाहीत. ही चूक केली त्यामुळं 40 जवानांना जीव गमवावा लागला असा खुलासा सत्यपाल मलिक यांनी केला आहे. पुलवामा घटनेनंतर मोदींसोबत बोललो असता त्यांनी गप्प राहण्यास सांगितल्याचं मलिक यांनी सांगितलं. तर अजित डोवाल यांनीही याबाबत मला गप्प राहण्यास सांगत या हल्ल्याचा आरोप पाकिस्तानकडे जाईल आणि याचा फायदा निवडणुकीत होईल, असे सरकारचे धोरण होते असा मोठा गौप्यस्फोट मलिक यांनी केलाय.
राहुल गांधी यांनीही साधला निशाणा
दरम्यान, सत्यपाल मलिक यांच्या या वक्तव्यानं मोठी खळबळ माजली आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना भ्रष्टाचाराबाबत राग नाही असं देखील मलिक म्हणालेत. काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी मलिक यांच्या वक्तव्याचा फोटो ट्विट करत मोदींवर निशाणा साधलाय.
महत्त्वाच्या बातम्या: