Petrol Diesel Prices : नवे इंधन दर जारी; महाराष्ट्रातील 'या' शहरात देशातील सर्वात महाग पेट्रोल
Petrol Diesel Price Today 26 April 2022 : गेल्या अनेक दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. सर्वात महाग पेट्रोल देशात राजस्थानमध्ये विकलं जातंय, तर सर्वात स्वस्त पेट्रोल पोर्टब्लेयरमध्ये मिळतंय.
![Petrol Diesel Prices : नवे इंधन दर जारी; महाराष्ट्रातील 'या' शहरात देशातील सर्वात महाग पेट्रोल Petrol Diesel Price Today 26 April 2022 petrol diesel rate not changed today know latest rate of your city iocl fuel rates crude oil Petrol Diesel Prices : नवे इंधन दर जारी; महाराष्ट्रातील 'या' शहरात देशातील सर्वात महाग पेट्रोल](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/03/28/c053cbf21b7463ca542d092d33dfbf7c_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Petrol Diesel Price Today 26 April 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी (Oil Companies) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) ताजे दर जारी केले आहेत. राष्ट्रीय बाजारात सकाळी 6 वाजता जारी करण्यात आलेल्या इंधनांच्या किमती आजही स्थिर आहेत. दरम्यान, आज सलग विसाव्या दिवशी देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. यापूर्वी देशात 6 एप्रिल रोजी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली होती. तेव्हापासून देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. जाणून घेऊया देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर काय?
पेट्रोलियम मार्केटिंग कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) ने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, देशाच्या आर्थिक राजधानीचं शहर असणाऱ्या मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जातं आहे.
इंडियन ऑईलनं जारी केलेल्या किमतींनुसार, पोर्टब्लेयरमध्ये पेट्रोलची किंमत 91.45 रुपये प्रति लिटर आहे. तर महाराष्ट्रातील परभणीमध्ये पेट्रोल 123.47 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. देशाच्या राजधानीचं शहर असणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोलची किंमत 105.41 रुपये आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्च नंतर सलग 14 वेळा दरवाढ केली होती. गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल 10.20 रुपयांनी महाग झालं होतं. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल आज प्रति बॅरल 100 डॉलरच्या खाली आलं आहे. नायमॅक्स क्रूड प्रति बॅरल 98.98 डॉलवर व्यापार करत आहे, तर प्रति बॅरल 0.44 डॉलरची घसरण झाली आहे. तर, ब्रेंट क्रूड अजूनही प्रति बॅरल 102.44 डॉलरवर व्यापार करत आहे, तर 0.67 डॉलरची घसरण झाली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीमुळे 4 नोव्हेंबर 2021 पासून 21 मार्च 2022 पर्यंत देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. साडेचार महिन्यांनी किमतींमध्ये बदल झाला होता. 6 एप्रिलपर्यंत पेट्रोल 10 रुपये प्रति लिटर महाग झालं आहे. त्यानंतर गेले एकोणवीस दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
देशातील महत्त्वाच्या शहरांचे दर काय?
शहरं | पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) | डिझेलच्या किमती (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 | 104.77 |
दिल्ली | 105.41 | 96.67 |
चेन्नई | 110.85 | 100.94 |
कोलकाता | 115.12 | 99.83 |
हैद्राबाद | 119.49 | 105.49 |
कोलकाता | 115.12 | 96.83 |
बंगळुरू | 111.09 | 94.79 |
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यांतील पेट्रोल-डिझेलचे दर
शहरं | पेट्रोलचे दर (प्रति लिटर) | डिझेलचे दर (प्रति लिटर) |
मुंबई | 120.51 रुपये | 104.77 रुपये |
पुणे | 120.60 रुपये | 103.28 रुपये |
नाशिक | 120.02 रुपये | 102.73 रुपये |
परभणी | 123.51 रुपये | 106.08 रुपये |
औरंगाबाद | 120.63 रुपये | 103.32 रुपये |
कोल्हापूर | 120.64 रुपये | 103.35 रुपये |
नागपूर | 121.03 रुपये | 103.73 रुपये |
पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?
इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.
पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)