एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

लढवय्या नेता हरपला : पर्रिकरांचं शिक्षण, राजकारण, धाडसी निर्णय आणि आजारपण

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17 मार्च) निधन झालं. स्वादुपिंडाच्या कर्करोगाने वयाच्या 63 व्या वर्षी पणजीतल्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

पणजी : गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचं रविवारी (17) रात्री स्वादुपिंडाच्या कर्करोगाच्या दीर्घ आजाराने निधन झालं. पर्रिकर यांच्या निधनामुळे देशाने प्रामाणिक, मनमिळावू आणि सर्वार्थाने मोठा नेता गमावल्याची भावना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्यक्त केली. पर्रिकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. त्यामुळे आज दिल्लीसह इतर सर्व राज्यातील राजधानीमध्ये तिरंगा अर्ध्यावर उतरवण्यात येणार आहे. तर गोव्यात 7 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. जन्म : 13 डिसेंबर 1955 मृत्यू : 17 मार्च 2019 * प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण मराठीतून. * 1978 मध्ये आयआयटी पवई मुंबई येथून इंजिनीअरिंगची पदवी संपादन. * शालेय शिक्षण चालू असतानाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले आणि कालांतराने म्हापसा शहर संघ प्रमुखपदी निवड. * संघाचे कार्य आणि विश्व हिंदू परिषदेच्या कार्यात सहभागी. मातृभक्त, कृषी क्षेत्राची आवड. * पवई आयआयटीमधून इंजिनिअरींगची पदवी संपादन केल्यानंतर गोव्यात स्वतःचा व्यवसाय सुरू केला. * मेधा यांच्याशी विवाह. अभिजात आणि उत्पल दोन पुत्र. * एप्रिल 2002 मध्ये पत्नी मेधा यांचे दुर्दैवी निधन. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर राजकीय हालचालींना वेग, नितीन गडकरी गोव्यात दाखल राजकारण * राममंदिर प्रकरणी संपूर्ण गोव्यात भ्रमंती. जनतेबरोबर संपर्क आणि नंतर भाजपमध्ये प्रवेश. * 1994 मध्ये भाजपची पणजीतून उमेदवारी आणि विजय संपादन. एक अत्यंत शिस्तबद्ध आमदार म्हणून नावलौकिक. काँग्रेस सरकारला सळो की पळो करुन सोडले. * 1999च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा पणजीत भाजपच्या कमळ चिन्हावर विजयी. भाजपचे दहा आमदार विजयी. पर्रिकरांची भाजप विधीमंडळ नेतेपदी निवड. विरोधी पक्षनेतेपद प्राप्त. काँग्रेस सरकारमध्ये फूट पर्रिकरांच्या मदतीने बिगर काँग्रेसचे सरकार सत्तेवर. * 24 ऑक्टोबर 2000 गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी पहिल्यांदा निवड. * 27 फेब्रुवार 2002 अचानक गोवा विधानसभा भंग. पर्रिकरांचा धाडसी निर्णय. नव्याने निवडणुकीस सामोरे गेले. * 5 जून 2002 निवडणुकीनंतर पुन्हा मनोहर पर्रिकर यांच्या नेतृत्वाखाली गोव्यात भाजपचे आघाडी सरकार. दुसऱ्यांदा बनले मुख्यमंत्री. * 29 जानेवारी 2005 पर्रिकर सरकार अल्पमतात. राजकीय संघर्षात मुख्यमंत्रीपद गेले. * जून 2005 चार मतदारसंघात पोटनिवडणुका. केवळ एक जागा भाजपला इतर काँग्रेसला. * जून 2005 मनोहर पर्रीकर बनले गोव्याचे विरोधी पक्षनेते. * 2007 - विधानसभेत 110 मिनिटांचे ऐतिहासिक भाषण. जूनमध्ये विधानसभा निवडणुका. विधानसभा त्रिशंकू. भाजपला 14 जागांवर यश. काँग्रेस 16. इतर बारीक पक्षांच्या मदतीने काँग्रेस सरकार सत्तेवर. * जुलै 2007 – काँग्रेस सरकारमध्ये बंड. घटक पक्षांचा पर्रिकरांना पाठिंबा. पुन्हा मुख्यमंत्री होण्याची शक्यता. सभापतींकडून सत्ताधारी गटातील तीन आमदार अपात्र. सरकार वाचले. विरोधी पक्षनेते मनोहर पर्रिकर एक आक्रमक विरोधी पक्षनेते बनले. पर्रिकरांनी कोट्यवधी रुपयांचा खाण घोटाळा केला उघड. सत्ताधारी काँग्रेसची अडचण वाढली. * 2012 – जानेवारी अखेर मनोहर पर्रिकर यांची संपूर्ण गोवाभर परिवर्तन यात्रा. भाजप राष्ट्रीय अध्यक्ष राजनाथ सिंह, अरुण जेटली यांची उपस्थिती. पणजीत आझाद मैदानावरुन भव्य प्रारंभ. गोव्यात सर्वत्र उदंड प्रतिसाद. * मार्च 2012 – गोव्यात विधानसभा निवडणुका. भाजपला 21 सदस्यांचे पूर्ण बहुमत. विरोधी काँग्रेसचा धुव्वा. मनोहर पर्रिकर यांची भाजप विधीमंडळ नेतेपदी निवड. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले. केंद्रातील यूपीए सरकारशी संघर्ष सुरु. गोव्याची चारही बाजूंनी कोंडी करण्याचा प्रयत्न. पर्रिकरकृत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती सुरु केंद्र सरकारकडून राष्ट्रीय दुखवटा जाहीर, मनोहर पर्रिकरांच्या पार्थिवावर संध्याकाळी 5 वाजता होणार अंत्यंसस्कार

पर्रिकरांचे धाडसी निर्णय * 2 एप्रिल 2012 - गोव्यात पेट्रोलवरील व्हॅट पूर्णतः रद्द. पेट्रोल 12 रुपयांनी स्वस्त. देशभरात ऐतिहासिक निर्णय ठरला. * सप्टेंबर 2012 – गोवा खाण घोटाळा प्रकरणी शाह आयोगाचा अहवाल उघड. 35 हजार कोटी रुपयांचा घोटाळा. पर्रिकरांनी राज्यातील खनिज उत्खनन तात्पुरते बंद केले. केंद्राने खाणींचे पर्यावरण परवाने रद्द केले. खाण व्यवसाय पूर्णतः ठप्प. * ऑक्टोबर 2012 – सर्वोच्च न्यायालयाने खाण व्यवसायावर बंदी आणली. * नोव्हेंबर 2012 – पर्रिकरांनी महिलांसाठी गृहआधार योजना सुरु केली. महिलांना प्रति महिना 1 हजार रुपयांचा महागाई भत्ता. देशभरात निर्णयाचे कौतुक. * नोव्हेंबर 2012 – पर्रिकरकृत लाडली लक्ष्मी योजना जाहीर. 18 वर्षे पूर्ण झालेल्या युवतींना 1 लाख रुपये. अशा योजना करणारे मनोहर पर्रिकर देशातले पहिले मुख्यमंत्री ठरले. पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींचं नाव सर्वात पहिल्यांदा मनोहर पर्रिकरांनी सुचवलं संरक्षणमंत्री, सर्जिकल स्ट्राईक * 2013 – गोव्यात भाजपचे राष्ट्रीय अधिवेशन. नरेंद्र मोदींना भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून निश्चित. भाजपच्या अधिवेशनात पक्षाची प्रचार धुरा मोदींच्या हाती. * नोव्हेंबर 2013 – पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीकडून नरेंद्र मोदी यांच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीवर अखेर शिक्कामोर्तब. * 2014 – लोकसभा निवडणुका. गोव्यात नरेंद्र मोदींची जाहीर सभा. गोव्यातले सर्व रेकॉर्ड ब्रेक. सभेला दोन लाखपेक्षा जास्त समुदाय. लोकसभा निवडणुकीत गोव्यात दोन्ही जागांवर भाजप विजयी. पंतप्रधान नरेंद्र मोदी. * नोव्हेंबर 2014 – पर्रिकरांना केंद्रीय मंत्रिमंडळात सामील होण्याचा पंतप्रधानांचा आग्रह. * 8 नोव्हेंबर 2014 – पर्रिकरांचा गोव्याच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा. लक्ष्मीकांत पार्सेकर नवे मुख्यमंत्री. * 9 नोव्हेंबर 2014 – पर्रिकरांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश. संरक्षण मंत्रालयाचा कारभार बहाल. आपल्या कार्यातून देशवासियांचे लक्ष वेधून घेतले. उरी हल्ल्यानंतरचा सर्जिकल स्ट्राईक पर्रीकारंच्या काळातच झाला. ‘वन रँक वन पेन्शन’ प्रश्न पर्रिकरांनीच सोडवला. * मार्च 2017 मध्ये चारवेळा मुख्यमंत्री बनले. 'सर्जिकल स्ट्राईक' ते 'वन रॅन्क वन पेन्शन योजना', संरक्षण मंत्री असताना मनोहर पर्रिकरांनी घेतलेले मोठे निर्णय आजारपण * 14 फेब्रुवारी 2018 रोजी गंभीर आजारी पडले, स्वादुपिंडाच्या कर्करोग झाल्याचं निदान * मुंबईत दहा दिवसांच्या उपचारानंतर चार महिने अमेरिकेत उपचार * पुन्हा मुंबई, अमेरिकेत उपचार, यानंतर दिल्लीतील एम्समधील उपचारानंतर गोव्यात परतले * दोनापावला इथल्या बंगल्यात उपचार, मात्र तीन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली * 17 मार्च 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता अखेरचा निरोप घेतला. संबंधित बातम्या लढवय्या नेता हरपला, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे निधन गोव्याचे दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचा अल्प परिचय   गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या निधनाने शोककळा, लढवय्या नेत्याला मान्यवरांकडून श्रद्धांजली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

TOP 90 : सकाळच्या 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज :25 नोव्हेंबर  2024 : ABP MajhaRohit Pawar Meets Ajit Pawar : दर्शन घे... काकाचं दर्शन घे, रोहित पवार थेट पाया पडलेAjit Pawar Karad : अजित पवारांची यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतींना आदरांजलीABP Majha Headlines :  9 AM : 25 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar Rohit Pawar Meet Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Video: अजितदादा म्हणाले, ढाण्या थोडक्यात वाचला; रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया, माझे काका...
Maharashtra Weather Update: उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
उत्तर महाराष्ट्रात हुडहुडी!राज्यात थंडीचा जोर वाढणार, IMD चा अंदाज काय?
Maharashtra Politics : प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने;
प्रीतीसंगमावर काका-पुतण्या आमने-सामने; "दर्शन घे दर्शन... काकाचं...", अजित पवारांच्या आग्रहानंतर रोहित पवारांचा वाकून नमस्कार
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
राज्याच्या निवडणूक निकालांनंतर सर्वसामान्यांना मोठा धक्का; CNG च्या दरांत वाढ, कुठे, किती वाढ?
Horoscope Today 25 November 2024 : आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आठवड्याचा पहिला दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
फॉर्म नंबर 17C आणि EVM चा सिरीयल नंबर मॅच होत नाही, माझ्या बायको आणि आईने मला मतदान केलं नाही का? मनसे उमेदवाराचा ईव्हीएम घोटाळ्याचा आरोप
Eknath Shinde: निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
निकालानतंर मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; लवकरच लाडक्या बहि‍णींना 2100 रुपये दरमहा देणार
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री? अजित पवारही 'ओके'; RSS कडूनही ग्रीन सिग्नल, शिंदेंचं काय?
Embed widget