एक्स्प्लोर
कर्नाटकात ट्विस्ट: सर्वात कमी जागा, तरीही जेडीएसचा मुख्यमंत्री?
कर्नाटक विधानसभा निवडणूक निकाल: सर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणूक - बंगळुरु: कर्नाटक विधानसभा निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. सर्वात कमी जागा मिळालेला जनता दल सेक्युलर अर्थात जेडीएस या पक्षाचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता आहे. कारण दुसऱ्या क्रमांकावरील काँग्रेसने तिसऱ्या क्रमांकावरील जेडीएसला पाठिंबा जाहीर केला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने थेट जेडीएसचे नेते कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली आहे. त्याबाबत स्वत: काँग्रेस नेत्या सोनिया गांधी या जेडीएसचे सर्वेसर्वा आणि कुमारस्वामी यांचे वडील एच डी देवेगौडा यांच्याशी बातचीत करणार आहेत. दुपारी 3.30 पर्यंत भाजप सर्वाधिक104 जागांसह पहिल्या क्रमांकावर, काँग्रेस 76 जागांसह दुसऱ्या तर जेडीएस 39 जागांसह तिसऱ्या जागांवर आहे. सध्या ही आघाडी आहे, अंतिम निकाल जाहीर झालेला नाही. मात्र सध्याचे कल पाहाता यामध्ये थोडेच बदल होऊन हाच निकाल अंतिम असू शकतो. भाजपची पळापळी भाजपने दुपारी दोनपर्यंत बहुमताचा 112 चा आकडा पार केला होता. त्यामुळे भाजपने सेलिब्रेशन आणि जल्लोषाला सुरुवात केली होती. येडीयुरप्पा हे मुख्यमंत्री असतील, असं भाजपने आधीच जाहीर केलं होतं. मात्र दुपारी अडीचनंतर चित्र बदलत गेलं आणि भाजपने सेलिब्रेशन आवरतं घेतलं. काँग्रेसच्या प्लॅन बी मुळे भाजपने धावाधाव सुरु केली. भाजप नेते प्रकाश जावडेकर, धर्मेंद्र प्रधान, जे पी नड्डा कर्नाटकाकडे रवाना झाले. त्याआधी त्यांनी भाजप अध्यक्ष अमित शाह यांची भेट घेतली. दुसरीकडे काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, अशोक गेहलोत सकाळपासून बंगलोरमध्येच आहेत. काँग्रेसची प्रतिक्रिया जनतेचा कौल आम्ही स्वीकारतो. सरकार स्थापन करण्यासाठी आमच्याकडे बहुमत नाही. त्यामुळे आम्ही सत्ता स्थापनेसाठी जेडीएसला पाठिंबा जाहीर करतो, असं काँग्रेसने घोषित केलं. येडीयुरप्पा यांची प्रतिक्रिया थोड्याच वेळात अंतिम निकाल येईल, त्यानंतर आम्ही पुढील रणनीती ठरवू, काँग्रेस आणि जेडीएसबद्दल आताच बोलणार नाही, असं भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार येडीयुरप्पा म्हणाले. कोण आहेत कुमारस्वामी? एच. डी. कुमारस्वामी हे जनता दलचे (सेक्युलर) सर्वेसर्वा आणि भारताचे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे सुपुत्र आहेत. हरदानहल्ली देवेगौडा कुमारस्वामी असे 58 वर्षीय कुमारस्वामींचे संपूर्ण नाव आहे. कर्नाटकमध्ये कुमारस्वामी यांना 'कुमारअण्णा' म्हणून ओळखले जाते. कुमारस्वामी यांना राजकारणाचे धडे घरातूनच मिळाले आहेत. जनता दल (सेक्युलर) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या कुमारस्वामी यांनी 3 फेब्रुवारी 2006 ते 9 ऑक्टोबर 2007 या कालावधीत कर्नाटकच्या 18 व्या मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. 1996 साली रामनगरा जिल्ह्यातील कनकापुरा लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून विजयी होत, कुमारस्वामी यांनी राजकारणात प्रवेश केला. मात्र 1998 साली याच मतदारसंघात पुन्हा निवडणुका झाल्या आणि त्यावेळी त्यांचा अत्यंत दारुण पराभव झाला. यावेळी त्यांचा डिपॉझिटही जप्त झाले होते. त्यानंतर 1999 साली सथनौर मतदारसंघातून कुमारस्वामींनी पुन्हा लोकसभा निवडणूक लढवली. मात्र त्यावेळीही ते पराभूत झाले. 2004 साली ते विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यावेळी कुणालाही बहुमत मिळाले नाही. त्यामुळे जेडीएसने काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. त्यावेळी काँग्रेसच्या धरम सिंह यांना मुख्यमंत्री करण्यात आले. पुढे कुमारस्वामी आपले समर्थक आमदार घेऊन सत्तेतून बाहेर पडले. त्यानंतर कुमारस्वामींनी भाजपला सोबत घेत सत्ता स्थापन केली आणि स्वत: मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. मात्र भाजपसोबतची सत्ताही फार काळ टिकली नाही आणि त्या सरकारमधूनही ते बाहेर पडले. खासदार, आमदार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते या संसदीय पदांसोबत त्यांनी जनता दल (सेक्युलर) पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुराही सांभाळली आहे. ते जनता दल (सेक्युलर) पक्षाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष आहेत. कुमारस्वामींनी कोणती पदं भूषवली आहेत? 1996 : 11 व्या लोकसभेत ते निवडून गेले. 2004–08 : कर्नाटक विधानसभेत ते आमदार म्हणून निवडून गेले. फेब्रुवारी 2006 - ऑक्टोबर 2007 : कर्नाटकचे मुख्यमंत्री 2009 : 15 व्या लोकसभेत निवडून गेले. 31 ऑगस्ट 2009 : ग्रामीण विकास समितीचे सदस्या 15 ऑक्टोबर 2009 : अन्न व्यवस्थापन समितीचे सदस्या 31 मे 2013 : कर्नाटक विधानसभेत विरोधी पक्षनेते संबंधित बातम्या स्पेशल रिपोर्ट : कर्नाटकातील सर्वात लक्षवेधी ‘बदामी’ची लढाई ‘इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिन्सचा’ विजय असो : राज ठाकरे राईस मिलचा क्लार्क ते भाजपचा दक्षिणेतील पहिला मुख्यमंत्री कर्नाटक 'काँग्रेसमुक्त', देशातील 21 व्या राज्यातही कमळ फुललं कर्नाटक निवडणूक निकाल 2018 : लिंगायतांनी काँग्रेसला नाकारलं! बेळगाव निवडणूक निकाल 2018 लाईव्ह अपडेट : 18 जागांचे निकाल
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
व्यापार-उद्योग
निवडणूक
व्यापार-उद्योग























