India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता
सध्या देशातील बऱ्याच भागात पावसानं दडी मारल्याचं चित्र दिसत आहे. यावर्षीचा ऑगस्ट महिना हा गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.
![India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता India Weather News India headed for driest August in over 100 years summer crops at risk india rain news India Rain : यंदाचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात कोरडा, एल निनोचा परिणाम; शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/08/19/e324dfa9f9b2bbd17cb9fc80337b0edd1692415812043339_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
India Rain : सध्या देशाच्या काही भागात पाऊस (Rain) पडत आहे, तर काही भागात पावसाची गरज आहे. अनेक ठिकाणी पावसानं उघडीप दिली आहे. त्यामुळं शेतकरी देखील चिंतेत आहेत. दरम्यान यावर्षीचा ऑगस्ट महिना गेल्या 100 वर्षातील सर्वात जास्त कोरडा महिना असल्याचे वृत्त इकोनॉमिक टाइम्स या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. एल निनोच्या (El Nino) प्रभावामुळं पावसाचं प्रमाण कमी झालं आहे. याचा उन्हाळी शेती पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.
यापूर्वी 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात सर्वात कमी पाऊस
दरम्यान, भारतीय हवामान विभागाने यावर्षी ऑगस्ट महिन्यात आठ टक्क्यापर्यंत पावसाची तूट अपेक्षित धरली होती. यापूर्वी सर्वात कमी पाऊस 2005 च्या ऑगस्ट महिन्यात झाला होता. 2005 मध्ये ऑगस्ट महिन्यात 191.2 मिमी (7.5 इंच) इतका पाऊस झाला होता.
पावसाच्या कमतरतेमुळं तांदूळ आणि सोयाबीनला फटका बसण्याची शक्यता
दरम्यान, हवामान विभागाच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाच्या कमतरतेमुळं तांदूळ आणि सोयाबीन यासारख्या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. ज्यामुळं किंमतीत वाढ होऊन महागाई वाढण्याची शकता आहे. भारत एका शतकाहून अधिक काळातील सर्वात कोरड्या ऑगस्टच्या दिशेने वाटचाल करत आहे. एल निनोच्या प्रभावामुळं देशातील अनेक भागात कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्याचे पर्जन्यमान हे 1901 नंतर यावर्षी सर्वात कमी झालं आहे. याचा परिणाम शेती पिकांवर होऊ शकतो. उन्हाळ्यात पेरणी केलेल्या पिकांचे उत्पन्न कमी होण्याची शक्यता आहे. मान्सून हा घटक अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाचा आहे. कारण अकूण पावसाच्या सुमारे 70 टक्के पावसाचे पाणी हे शेती पिकांना दिलं जाते. त्यासाठी नदी, नाले, धरण यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा केला जातो.
ऑगस्टच्या पहिल्या 17 दिवसांत फक्त 90.7 मिमी पावसाची नोंद
यावर्षी देशातील पश्चिम आणि मध्य भागात कमी पावसाची शक्यता आहे. ऑगस्ट महिन्यात सरासरी 180 मिमी (7 इंच) पेक्षा कमी पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. दरम्यान, आतापर्यंतचा पाऊस आणि उर्वरित महिन्यात पावसाचे प्रमाण नेमके कसे असेल तसेच ऑगस्टमधील एकूण पावसाची स्थिती काय असेल याबाबतची माहिती 31 ऑगस्ट किंवा 1 सप्टेंबरला हवामान विभागाकडून देण्यात येणार आहे. भारताला ऑगस्टच्या पहिल्या 17 दिवसांत फक्त 90.7 मिमी (3.6 इंच) पाऊस पडला आहे. हा पाऊस सामान्यपेक्षा जवळपास 40 टक्के कमी आहे. एका महिन्याची सामान्य पावसाची सरासरी ही 254.09 मिमी (10 इंच) आहे.
एल निनोचा प्रभाव
एल निनोमुळं पाण्याचे तापमान मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळं भारतीय उपखंडात सामान्यतः पावसाला अडथळा निर्माण होतो. यावर्षी जून महिन्यात सरासरीपेक्षा 10 टक्के पाऊस कमी झाला आहे. परंतू, जुलैच्या पावसाने चांगला पाऊस झाला होता. भारतातील जवळपास निम्म्या शेतजमिनीला सिंचनाची सोय नसल्यानं पाऊस महत्त्वाचा आहे.
मान्सूनने दमदार सुरुवात झाल्यावर केरळसह दक्षिणेकडील राज्यात 1 जूनपासून भात, मका, कापूस, सोयाबीन, ऊस आणि शेंगदाणे, इतर पिकांसह लागवड करण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी पावसानं चांगलीच ओढ दिल्याचे चित्र दिसत आहे.
या भागात पावसाची शक्यता
पुढील दोन आठवड्यात ईशान्य आणि काही मध्य प्रदेशात मान्सूनचा पाऊस सुधारण्याची अपेक्षा हवामान विभागानं वर्तवली आहे. परंतु वायव्य आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाची उघडीप राहण्याची शक्यता आहे. दरम्यान दरवर्षी ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस होता. या महिन्यात फक्त पाच ते सात दिवस कोरडे असतात, नाहीत बाकीच्या दिवशी चांगला पाऊस होत असतो.
महत्त्वाच्या बातम्या:
Kharif season : मराठवाड्यात पावसाची दडी, 35 लाख हेक्टरवरील खरीपाची पीकं धोक्यात; बळीराजा चिंतेत
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)