बेळगावमधून मोठी बातमी, मनपावर मराठी फलक तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा, केंद्राचे आदेश
बेळगावमध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या अधिक आहे. तिथला भाषिक संघर्ष नवा राहिलेला नाही. मात्र आता बेळगावातील मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे.

बेळगाव : बेळगावमध्ये मराठी भाषिक नागरिकांची संख्या अधिक आहे. तिथला भाषिक संघर्ष नवा राहिलेला नाही. मात्र आता बेळगावातील मराठी भाषिकांसाठी आनंदाची बातमी आहे. बेळगाव महानगरपालिकेवर मराठी फलक लावा तसेच भाषिक कायद्यानुसार मराठी भाषिकांना सुविधा पुरवा असा आदेश केंद्रीय भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांनी बजावला आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, बेळगाव यांनी महानगरपालिकेवर मराठी फलक लावण्यासाठी मनपा आयुक्तांची तसेच जिल्हाधिकारी यांची भेट घेतली होती. पण त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने युवा समितीने थेट केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नखवी तसेच चेन्नई येथील भाषिक अल्पसंख्याक आयुक्तांना पत्र पाठवले होते.
या अर्जाची दखल घेत चेन्नई येथील दक्षिण व पूर्व विभाग भाषिक अल्पसंख्याक कार्यालय, चेन्नईचे सहाय्यक आयुक्त एस शिवकुमार यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहीले आहे. या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, बेळगावात मराठी भाषिकांची संख्या जास्त आहे तसेच 2013 मध्ये धारवाड उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाची माहिती घेत, नव्या महानगरपालिका इमारती वर मराठी फलक लावण्याचे निर्देश दिला आहे या सोबतच घटनेतील कलम 29 नुसार जिथं 15 टक्केपेक्षा जास्त प्रमाणात राहणाऱ्या भाषिकांना त्याना सर्व कागदपत्रे, विविध प्रकारच्या सरकारी सूचना मराठी मध्ये देण्याचे निर्देश मनपा आयुक्तांना दिले आहे.
तरी याची अंमलबजावणी करून भाषिक अल्पसंख्याक कार्यालयाला आणि युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके यांना माहिती देण्याची सूचना दिल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
