Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात भूकंपाचा हाहाकार; 250 लोकांचा मृत्यू, पाकिस्तानपर्यंत हादरा
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात बुधवारी झालेल्या भूकंपाच्या जोरदार धक्क्यामुळे सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.
Afghanistan Earthquake : अफगाणिस्तानात (Afghanistan) बुधवारी झालेल्या भूकंपाच्या (Earthquake) जोरदार धक्क्यामुळे सुमारे 250 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. अफगाणिस्तानच्या राज्य वृत्तसंस्थेने म्हटले आहे की, देशाच्या पूर्व पक्तिका प्रांतात झालेल्या भूकंपात किमान 255 लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, सरकारी बख्तर वृत्तसंस्थेने बुधवारी मृतांची संख्या सांगितली. तसेच बचाव पथके हेलिकॉप्टरने येत असल्याचे सांगितले. पक्तिका प्रांतात 6 रिश्टर स्केलचा भूकंप (Earthquake) झाला असल्याचे समजते.
मृतांची संख्या अडीचशेहून अधिक असण्याची शक्यता
बीबीसीने स्थानिक अधिकाऱ्यांच्या हवाल्याने म्हटले आहे की मृतांची संख्या अडीचशेहून अधिक असू शकते, तर दीडशेहून अधिक लोक जखमी झाले आहेत. दक्षिण-पूर्वेकडील खोस्ट शहरापासून सुमारे 44 किलोमीटर (27 मैल) अंतरावर भूकंप झाला. रॉयटर्सने युरोपियन भूमध्य भूकंप विज्ञान केंद्राच्या हवाल्याने म्हटले आहे की, पाकिस्तान आणि भारतापर्यंत 500 किलोमीटर अंतरापर्यंत भूकंपाचे (Earthquake) धक्के जाणवले.
पाकिस्तानची राजधानी भूकंपाचे (Earthquake) धक्के
अफगाणिस्तानची राजधानी काबूल ते पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादपर्यंत भूकंपाचे (Earthquake) धक्के प्रत्यक्षदर्शींना जाणवल्याचे केंद्राने म्हटले आहे. सरकारचे प्रवक्ते बिलाल करीमी यांनी ट्विट केले की, "दुर्दैवाने, काल रात्री पक्तिका प्रांतातील चार जिल्ह्यांमध्ये झालेल्या तीव्र भूकंपामुळे देशभरातील शेकडो लोक ठार आणि जखमी झाले. याशिवाय डझनभर अनेक घरांचे नुकसान झाले आहे. ते म्हणाले की आम्ही मदत करणार्या एजन्सींना आवाहन करतो की, त्यांनी ताबडतोब लोकांच्या बचाव कार्यासाठी टीम पाठवावी.
इतर महत्त्वाच्या बातम्या
Eknath Shinde : 35 नव्हे तर 40 शिवसेना आमदार माझ्यासोबत, एकनाथ शिंदेंची एबीपी माझाला माहिती
Eknath Shinde : एकनाथ शिंदे गुजरातमध्ये....राजकीय भूकंप महाराष्ट्रात; शिंदेंचे बंड, शिवसेनेची बैठक...काय घडलं दिवसभरात?