Santosh Deshmukh Case : बीडमध्ये पावसाची वाणवा, पण बंदुकीतून हवेत फैरींवर फैरी करणाऱ्या टपरी अन् छपरींचा महापूर! जिल्ह्यात किती हजार जणांकडे शस्त्र परवाना?
बीडमधील गन कल्चरवरून बीडमध्ये नेमके परवाने आहेत तरी किती असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याचा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केला आहे.
Santosh Deshmukh Case :बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर बीड जिल्ह्यामध्ये गन कल्चर किती प्रमाणात फोफावलं आहे याचा आता दिवसागणिक उलगडा होत चालला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गेल्या काही दिवसांपासून बीडमध्ये सुरू असलेलं गन कल्चर समोर आणताना परवानाधारक नसतानाही बेधडकपणे बंदुकीचं सोशल मीडियामधून कोणत्या उद्दातीकरण आणि दहशत करण्याच्या पद्धतीचा पर्दाफाश केला आहे.
सुशील वाल्मिक कराड
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2024
ह्याच्या नावावर कुठलाही शास्त्र परवाना नाही pic.twitter.com/pplNtuT9ha
लोकांमध्ये कोणत्या पद्धतीने दहशत माजवली जात आहे याचाच पुरावा देण्याचा प्रयत्न दमानिया यांनी केला आहे. बीडमध्ये विरोधकांकडून बीडचा बिहार झाला आहे असा आरोप होत असून त्यामध्ये कुठेतरी तथ्य असल्याचे दिसून येत आहे. बीडमधील गन कल्चरवरून बीडमध्ये नेमके परवाने आहेत तरी किती असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान बीडमध्ये सर्वाधिक शस्त्र परवाने असल्याचा दावा सुद्धा अंजली दमानिया यांनी केला आहे.
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यावर बंदुकीचा सलाम दिला असे मला सांगण्यात आले आहे
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2024
आज सकाळी पोस्ट केलेले बाळासाहेब सोनवणे pic.twitter.com/0geJGOiiiW
बीड जिल्ह्यात किती जणांकडे शस्त्र परवाना
अंजली दमानिया यांनी केलेल्या दाव्यानुसार परभणी अमरावती या ठिकाणी सर्वात जास्त परवाने दिल्याचे म्हटलं आहे. दरम्यान बीड जिल्ह्यामध्ये तब्बल 1 हजार 281 जणांकडे शस्त्र परवाना आहे. दरम्यान, परवाना देताना सर्व प्रकारची शहानिशा करूनच परवाना दिला जातो. यावेळी गुन्हेगारी पार्श्वभूमी सुद्धा तपासली जाते. मात्र बीड जिल्ह्यामध्ये टपरी पोरं सुद्धा ज्या पद्धतीने बंदूक कमरेला लावून फिरत आहेत त्यावरून पोलिसांनी खेळण्यातील बंदूक दिल्याप्रमाणे परवाने दिले आहेत का? असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. बीडमध्ये भुरट्यांवर कारवाई सुरु केली असून दोन दिवसापूर्वी कैलास फडला अटक केली आहे. त्याचाही हवेत गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
मार्किंग केलेली व्यक्ती माणिक फड धनंजय मुंडे समर्थक
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2024
मला कळवण्यात आले आहे की हे ,,,, हाप्ते गोळा कारणे, गरीब लोकांना त्रास देणे ही कामे परळी लगत गाव आहे तिथे करतात. एसपी नवनीत कावत यांनी तपासून घ्यावे pic.twitter.com/CNmgEhqjhE
परवाना देण्यामध्ये कोणाचे लागेबांधे नाहीत ना?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात सर्वाधिक आरोप होत असलेला आणि पवनचक्की प्रकरणातील आरोपी असलेला खंडणीखोर वाल्मिक कराडच्यामुलाकडे सुद्धा बंदूक असल्याचे फोटो दमानिया यांनी सोशल मीडियामध्ये पोस्ट केला आहे. यामध्ये सुद्धा त्याच्याकडे परवाना नाही, पण कमरेला बंदूक दिसून येत आहे. त्यामुळे बीडमध्ये असे अवैध गनधारी आहेत तरी किती? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परवाना देण्यामध्ये कोणाचे लागेबांधे नाहीत ना? असा सुद्धा प्रश्न निर्माण झाला आहे. जो जिल्हा मागास समजला जातो, पोट भरण्यासाठी ऊस तोड करण्यासाठी राज्यभर फिरावं लागतं त्या जिल्ह्यामध्ये गन कल्चर पाहून मात्र अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
पिस्तूलंच पिस्तुलं
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) December 27, 2024
डिगोळआबा गावचा सरपंच याचे नाव जयप्रकाश सोनवणे उर्फ बाळासाहेब सोनवणे असे आहे.
मला कळवण्यात आले आहे की ह्यांच्यावर
खंडणी अपहरण असे अनेक प्रकारचे गंभीर गुन्हे आहेत. SP नवनीत कावत यांनी गुन्हे अहेत की नाही याची खात्री करावी आणि गुन्हा नोंदवावा pic.twitter.com/YC1YIEMwz4
इतर महत्वाच्या बातम्या