Pakistan on Manmohan Singh : पाकिस्तानमधील गाहमध्ये जन्म, पण भारताच्या 'अर्थक्रांती'चे शिल्पकार अन् पीएमही झाले; झेलमचा सुपूत्र मनमोहन सिंग यांच्या निधनावर पाकिस्तान काय म्हणाला?
पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी अलीकडेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले होते.
Manmohan Singh : भारताचे माजी पंतप्रधान, जागतिक किर्तीचे अर्थतज्ज्ञ अन् भारताच्या अर्थक्रांतीचे शिल्पकार डॉ.मनमोहन सिंग यांचे वयाच्या 92 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले. मनमोहन सिंग यांनी एम्समध्ये अखेरचा श्वास घेतला. फाळणीपूर्वी सध्या पाकिस्तानात असलेल्या गाहमध्ये जन्मलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनाने पाकिस्तानींना सुद्धा दु:ख झाले आहे. पाकिस्तानला झेलमच्या सुपुत्राची नेहमी आठवण राहील, असे ते म्हणतात.
इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील
पाकिस्तानचे माजी मंत्री आणि पीटीआय नेते फवाद चौधरी म्हणाले की, डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन ही खरोखरच अत्यंत दुःखद बातमी आहे. ते म्हणाले की, भारत आज जे आर्थिक स्थैर्य अनुभवत आहे ते डॉ. मनमोहन सिंग यांच्या दूरदर्शी धोरणांचे परिणाम आहे. ते म्हणाले की डॉ. सिंग यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम भागातील गाह गावात झाला होता जो आता पाकिस्तानी पंजाबमधील चकवाल भागात येतो. डॉ. सिंग हे झेलमचे सुपुत्र होते आणि इथल्या लोकांसाठी ते नेहमीच प्रेरणास्त्रोत राहतील. पाकिस्तानी विश्लेषक कमर चीमा म्हणाले की, डॉ.मनमोहन सिंग यांचे भारतासाठी सर्वात मोठे योगदान म्हणजे अमेरिकेसोबतचा अणुकरार. यामुळे भारताचे आण्विक वेगळेपण संपुष्टात आले आणि त्याला अणुतंत्रज्ञानात प्रवेश मिळाला. अणुचाचण्यांनंतर लादलेले निर्बंधही संपले. तेव्हापासून भारत-अमेरिकेतील संबंध कायम नवीन उंचीवर गेले आहेत. भारत NPT चा सदस्य नाही आणि तरीही अमेरिकेने नवी दिल्लीशी नागरी अणु करारावर स्वाक्षरी केली. याचे संपूर्ण श्रेय मनमोहन सिंग यांना जाते.
मनमोहन यांनी भारताला दिली आघाडी, पाकिस्तान अजूनही मागे
कमर चीमा म्हणाले की, पाकिस्तानने याला विरोध केला पण आजपर्यंत त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. आजही पाकिस्तानकडे या अण्वस्त्र तंत्रज्ञानाचा वापर नाही. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अमेरिकेचे भारतासोबतचे परराष्ट्र संबंध अतिशय घट्ट झाले. आज भारत जबाबदार अणुशक्ती आहे असे म्हटले जाते. यामुळे भारत पाश्चिमात्य देश आणि जपानसोबत संरक्षण तंत्रज्ञान सहज शेअर करत आहे. कमर चीमा म्हणाले की, मनमोहन यांची पाकिस्तानबाबत कठोर भूमिका होती आणि पंतप्रधान असताना ते कधीही आले नाहीत. पाकिस्तानी विश्लेषकाने सांगितले की, जेव्हा भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले तेव्हा त्यांनी पुन्हा चर्चा सुरू केली होती. पाकिस्तानी सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये माजी परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांनी डॉ. सिंग यांच्याशी संबंधित घटना शेअर केली आहे. यात कुरेशी म्हणत आहेत की, 90 च्या दशकात मी डॉ. सिंग यांच्या घरी भारतात गेलो होतो, तेव्हा त्यांच्या पत्नीने चहा बनवला होता आणि मनमोहन सिंग यांनी स्वत: चहा आणला होता. पाकिस्तानी तज्ज्ञही डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे प्रशंसक होते.
'पाकिस्तानकडे मनमोहन सिंग नाहीत'
पाकिस्तानच्या फेडरल बोर्ड ऑफ रेव्हेन्यूचे माजी अध्यक्ष शब्बर झैदी यांनी अलीकडेच डॉ. मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते की, पाकिस्तानचा विध्वंस कोणत्याही सैनिकाने किंवा राजकारण्याने केला नाही तर त्या आर्थिक तज्ज्ञांनी केला आहे, ज्यांनी आपल्या नोकऱ्या वाचवण्यासाठी, फायद्यासाठी हुकूमशहांच्या अल्पकालीन धोरणांचा अवलंब केला. ते गंभीर नव्हते. मनमोहन सिंग आमच्याकडे नव्हते. डॉ.मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी झाला.
झेलमचे सुपूत्र भागातील लोकांसाठी प्रेरणास्थान
इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) पक्षाचे नेते फवाद चौधरी यांनी भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनाबद्दल त्यांना श्रद्धांजली वाहिली. फवाद चौधरी यांनी ट्विटरवर लिहिले की, 'डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाची बातमी ऐकून दुःख झाले. आज भारत जे आर्थिक स्थैर्य अनुभवत आहे ते मुख्यत्वे त्यांच्या दूरदर्शी धोरणांमुळे आहे, 'त्यांचा जन्म झेलमच्या गाह गावात झाला, जो आता पंजाब (पाकिस्तान) मध्ये येतो. झेलमचे पुत्र डॉ. सिंग हे या भागातील लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या