(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ABP News Network : एबीपी समूहाची शताब्दी; सर्व प्रकारच्या माध्यमात यशस्वी वाटचाल
ABP News Network : देशातील माध्यम समूहांतील आघाडीच्या एबीपी समूहाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने आज कोलकात्यात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.
ABP News Network : देशातील माध्यम समूहांतील आघाडीच्या एबीपी समूहाने 100 वर्ष पूर्ण केली आहेत. या निमित्ताने आज कोलकात्यात विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. आनंदबाझार पत्रिकेच्या 100 वर्षांच्या निष्पक्ष आणि गौरवशाली परंपरेचा आढावा या कार्यक्रमात घेण्यात येणार आहे. 1922 मध्ये कोलकात्यात बंगाली भाषेत आनंद बाजार पत्रिका हे वृत्तपत्र सुरु झालं. स्वातंत्र्यपूर्व काळापासून देशाच्या पत्रकारितेच्या इतिहासात आनंद बाजार पत्रिकेचं मोठं योगदान आहे. गेल्या 100 वर्षांत एबीपी समूहानं आपल्या पत्रकारितेचा ठसा भारतीय वृत्तपत्रसृष्टीत उमटवलाच, पण त्यापुढे जात इलेक्ट्रॉनिक माध्यमात पाऊल टाकत देशातील आघाडीच्या समूहांत स्थान मिळवलं आहे. हिंदी आणि विविध प्रादेशिक भाषांमधील वृत्तवाहिन्या आणि डिजिटल माध्यमांद्वारे एबीपीने पत्रकारितेला नवा आयाम दिला आहे.
"अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच लढा देऊ" एबीपी समूहाचे मुख्य संपादक, अतिदेव सरकार
या संदर्भात एबीपी समूहाचे मुख्य संपादक, अतिदेव सरकार यांनी एबीपीचा आजवरचा पूर्ण प्रवास आणि पुढची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी ते म्हणाले, "एबीपी सर्वसामान्यांसाठी काम करतं. त्यांच्या शासकांसाठी नाही. मीडिया आणि पब्लिशिंगमध्ये आम्ही 100 वर्ष पूर्ण केले आहेत. 1922 मध्ये जर्मन लोकशाही खूप अडचणीत होती. आर्थिक व्यवस्था बिकट होती. मार्चमध्ये महात्मा गांधींना नॉन कॉर्पोरेशन मूव्हमेंटसाठी अटक करण्यात आली होती. 25 वर्षानंतर जेव्हा आनंद बाजार पत्रिकेला 25 वर्ष पूर्ण झाल्यानंतर भारत स्वतंत्र झाला. तेव्हा आनंद बाजार पत्रिका जनतेचा आवाज बनला."
पुढे ते म्हणाले की, "1972 मध्ये वर्तमानपत्रांसाठी खूप कठीण काळ होता. शीत युद्ध संपल्यानंतर आता एबीपी टिव्ही माध्यमातसुद्धा आपले वर्चस्व निर्माण करायला सुरुवात केली होती. मुख्य संपादकांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही परिस्थितीत झुकणार नाही आणि अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यासाठी नेहमीच लढा देऊ."
गेल्या 25 वर्षांत आम्ही अनेक नवीन गोष्टी सुरु केल्या. आता एबीपी 300 मिलियन लोकांपर्यंत पोहोचलं आहे. मग ते प्रिंट, डिजीटल किंवा टिव्हीचे माध्यम असो. ध्रुवीकरण खूप वेगाने वाढतंय. न्यूज मिडीयाच्या स्वरूपात देखील खूप बदलाव आले आहेत. प्रिंटींग प्रेसपासून सुरुवात करत आता आम्ही उत्तर प्रदेशच्या छोट्याशा गावापर्यंतसुद्धा पोहोचलो आहोत. जिथे एक व्यक्ती स्मार्टफोनच्या माध्यमातून बातम्या वाचतो. जग वेगाने पुढे जात आहे त्याचबरोबर आम्हीसुद्धा आमच्या कामाचा वेग वाढवत आहोत. आम्ही स्वतंत्र पत्रकारिता जनतेच्या हितासाठी करत राहू. लोकांपर्यंत बातम्या पोहोचविण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करू. एबीपीमध्ये आम्ही हे मानतो की, जनता आणि प्रेक्षकच हेच आमचे प्रमुख आहेत. आणि लोक आमची शक्ती आहे. "
नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन काय म्हणाले?
तर, नोबेल विजेते अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन यांनी देशाच्या हितासाठी आपले मुद्दे समोर ठेवत म्हटले आहे की, "त्यावेळी वृत्तपत्रात देशाची परिस्थिती आणि धोक्याच्या संदर्भात अनेक गोष्टी लिहिल्या जात होत्या. आता 100 वर्ष पूर्ण झाली आहेत. तेव्हापासून आतापर्यंत खूप काही बदल झाले आहेत. स्वातंत्र्याच्या वेळी ज्या काही आमच्या इच्छा, अपेक्षा होत्या त्या बऱ्यापैकी पूर्ण झाल्या आहेत. परंतु, अजूनही बराच पल्ला गाठायचा आहे."
पुढे ते म्हणाले की, आपल्या देशांत समस्यांची कमतरता नाहीये. गरिबी, आरोग्य सेवा, आदराची कमतरता अशा अनेक समस्या आहेत. या समस्या आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळतात. या सर्व मुद्द्यांवर आनंद बाजार पत्रिका नेहमीच आपले विचार मांडत आलेला आहे. हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण होतेय. देशात सर्वधर्म समभाव असायला हवा. हिंदू मुस्लिम ऐक्याची भावना जी व्हायला हवी होती ती अजूनही होत नाहीये. यामधील दरी वाढतच चालली आहे. अशा मुद्द्यांवर आनंद बााजार पत्रिकेमध्ये प्रामुख्याने लक्ष केंद्रित करत लिहिले जात आहे. " असं म्हणत त्यांनी यावेळी देशाच्या हिताचे मुद्दे मांडले आहेत.