धक्कादायक! वाघाचे 4 तुकडे करुन तलावाजवळ फेकले; वन विभाग घटनास्थळी, समोर आलं धक्कादायक कारण
वाघाची शिकार करून त्याचे दोन तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक बाब भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन विभागाच्या हद्दीतील झंझेरीया बिटात आज उघडकीस आली.
भंडारा : धाराशिवच्या पायथ्याला गेल्या काही दिवसांपूर्वी वाघाचे (Tiger) दर्शन झाल्याने येथील भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, देशातील वाघांची संख्या आणि त्यांचे महत्त्व या दोन्ही बाबींचा विचार लक्षात घेता वाघाला पकडण्याची परवानगी सहजासहजी वन विभागाकडून देण्यात येत नाही. विशेष म्हणजे नरभक्षक वाघाला ठार करण्याचीही परवानगी सरकारकडून दिली जात नाही. त्यासाठी, न्यायालयाकडून विशेष परवानगी घ्यावी लागते. मात्र, विदर्भातील जंगल परसरात गेल्या 10 दिवसांत दोन वाघांची शिकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. 8 दिवसांपूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर, भंडाऱ्यात (Bhandara) आज सकाळी एका वाघाचे दोन तुकडे करुन त्याची शिकार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
वाघाची शिकार करून त्याचे दोन तुकडे करून जंगलात फेकल्याची धक्कादायक बाब भंडारा जिल्ह्यातील तुमसर वन विभागाच्या हद्दीतील झंझेरीया बिटात आज उघडकीस आली. विजेच्या प्रवाहानं या वाघाची शिकार करून दोन तुकडे केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या वनाधिकारी घटनास्थळावर पोहचले असून उत्तरीय तपासणीनंतर वाघाच्या मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल, असं वनाधिकाऱ्यांनी सांगितलं. दरम्यान, याअगोदर 8 दिवसांपूर्वी तुमसर वन विभागाच्या लेंडेझरी परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला होता, त्यानंतर 8 दिवसांतच आणखी एका वाघाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच, वन विभागतही अलर्ट मोडवर आहे.
विजेच्या तारेला स्पर्श होऊन वाघाचा मृत्यू
शेतातील पिकांच्या संरक्षणासाठी लावलेल्या वीज प्रवाहातील तारांमध्ये अडकल्यानं वाघाचा मृत्यू झाला. मात्र, प्रकरण अंगलट येऊन कारवाई होईल, या भीतीनं मृत वाघाचं धारदार शस्त्रानं अक्षरशः कापून चार तुकडे केले. त्यानंतर चारही तुकडे गावालगतच्या तीन तलाव परिसरातील झांजरिया बिटातील कक्ष क्रमांक ७४ बी आर एफ मध्ये फेकलेत. ही घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर वनपरिक्षेत्रात सकाळी उघडकीस आली आणि वन विभागात एकचं खळबळ उडाली. घटनेचं गांभीर्य ओळखून उपवनसंरक्षक राहुल गवई यांच्यासह वन कर्मचारी घटनास्थळी पोहचले. यावेळी घटनेचं गांभीर्य ओळखून वन विभागानं आरोपीचा माग काढण्यासाठी डॉग स्कॉडला पाचारण करण्यात आलं होतं. यावेळी पशू वैद्यकीय अधिकारी डॉ बारापात्रे यांनी मृत वाघाचं शवविच्छेदन करून विसेरा उत्तरिय तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. मृत वाघाचं शव घटनास्थळी दहन करण्यात आलं.
चंद्रपूर शहरालगतही वाघाचे दर्शन
यवतमाळच्या जंगलातील वाघ धाराशिवच्या पायथ्याला दिसून आल्याने वन विभागाचे लक्ष तिकडे लागले आहे. तर, चंद्रपूर शहरालगतच्या नांदगाव खुल्या कोळसा खाणीतही वाघाचा वावर असल्याचे बोलले जात होते. दरम्यान या परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा भला मोठा वाघ कैद झाला आहे. बूम बॅरिअरजवळ तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकाला हा वाघ दिसला होता. नांदगाव खाणीच्या आवारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही हा वाघ झाला कैद असून कोळसा खाण क्षेत्रात वाघ असल्याची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघिणीला जेरबंद करण्याचा निर्णय घेतलाय.
हेही वाचा
धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला