एक्स्प्लोर

धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नाही, भुजबळांची भूमिका स्पष्ट; मनोज जरांगेंनाही लगावला टोला

छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे सांगत, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटल्याची माहिती दिली.

मुंबई : राज्यात बीडमधील सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) यांच्या हत्येचा मुद्दा प्रचंड गाजत असून जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून सरकारवर आणखी दबाव वाढला जात आहे. बीड जिल्ह्यातील आमदार, खासदार हे बीडचे नेते व कॅबिनेटमंत्री धनंजय मुंडेंचा राजीनामा मागत आहेत. विशेष म्हणजे माजी खासदार छत्रपती संभाजीराजे आणि नरेंद्र पाटील यांच्याकडून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितला जात आहे. मात्र, राष्ट्रवादीत मंत्रीपदाची संधी न मिळालेले ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आहे.धनंजय मुंडेंचा राजीनामा मागणं योग्य नसल्याचंही भुजबळांनी म्हटलं. तसेच, यावेळी, नाव न घेता मनोज जरांगे यांनी धनंजय मुंडेंवर (Dhananjay munde)  केलेल्या टीकेवरुनही पलटवार केला आहे. 

छगन भुजबळ यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, मंत्रिपद न मिळाल्याने आपण नाराज नसल्याचे सांगत, मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटलो, नायगाव येथे त्यांची भेट झाली. त्यावेळी, नायगाव येथील डेव्हलपमेंटबाबत माझी चर्चा झाली, अशी माहिती त्यांनी दिली. मंत्रिपदाबाबत बोलताना देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केली. मला मंत्री व्हायचं आहे, म्हणून कुणाचा बळी द्यावा असं माझ्या मनात येण शक्य नाही. बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चौकशी करणार आणि दोषींवर कारवाई करणार. त्यामुळे, त्याआधीच धनंजय मुंडे यांचा राजीनामा का मागत आहोत?, असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. तर, जोपर्यंत कन्फर्म होतं नाही, तोपर्यंत राजीनामा घेणं योग्य नाही. तेलगी प्रकरणात माझ्यावर आरोप झाला आणि माझा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळे, माझे उपमुख्यमंत्री पद गेल, परंतु सीबीआय चौकशीत माझं नावसुद्धा आलं नाही, असे उदाहरणही भुजबळ यांनी दिले. 

जरांगेंच्या टीकेवर भुजबळांचे उत्तर

भुजबळ यांनी मनोज जरांगे यांच्यावरही टीका केली. जरांगे यांनी धनंजय मुंडेंना थेट धमकी देत मंत्री धनंजय मुंडेंना राज्यात फिरू देणार नाही, असे म्हटले होते. त्यावर बोलताना, इथं लोकशाही आहे, ठोकशाही नाही. जरांगे यांचं उपोषण सोडवायला चारपाच वेळा मुंडे गेले होते, ते एकमेकांना ओळखतात, असे उत्तर छगन भुजबळ यांनी दिले.

भुजबळांची माणिकराव कोकाटेंवर टीका 

मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा संस्थापक आहे, शरद पवारांसोबत पक्ष स्थापन केला आहे. कोकाटे उपरे आहेत, 5 वर्षापूर्वी ते राष्ट्रवादीत नव्हते. शरद पवारांना मी बोललो ते घ्यायला तयार नव्हते, परंतु मी आग्रह केला म्हणून त्यांनी घेतला. तुम्ही काल आलात तुम्हाला काय करायचं आहे? पक्ष आणि मी बघून घेईल, असेही भुजबळ यांनी म्हटले. 

 

हेही वाचा

 इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Navi Mumbai First Mango Price : वाशिमच्या APMC मध्ये केसर आंब्याची पहिली पेटी दाखल, भाव किती?All Party Leader Meet Governer Mumbai : सर्वपक्षीय नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट,काय मागणी केली?Dr Ravi Godse On HMPV virus : एचएममपीव्हीची व्हायरस नेमका काय आहे? डॉ. रवी गोडसेंनी सविस्तर सांगितलंABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 06 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange Patil : इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
इकडं सरपंच संतोष देशमुखांसाठी आक्रमक होताच मनोज जरांगे पाटलांचे कट्टर विरोधक एकवटले! तिकडं बीडमध्ये 24 तासात तीन गुन्हे दाखल
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
संतोष देशमुख प्रकरणी शरद पवारांचे मुख्यमंत्र्याना निवेदन; बजरंग सोनवणे, संदीप क्षीरसागरसह सुरेश धसांना सुरक्षा देण्याची मागणी
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
HMPV व्हायरसबाबत महत्त्वाची अपडेट, भारतातील लहान मुलांना कितपत धोका, व्हायरस महामारीचं रुप घेणार?
Sucess Story: आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
आता आमचो आंबाच नाय ड्रॅगन पण! नोकरीचा नाद सोडून गावी परतला, 35 गुंठ्यात ड्रॅगनफ्रूटमधून तरुण कमावतोय..
What is Human Metapneumovirus In India : भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
भारतात एन्ट्री केलीच, एचएमपीव्ही व्हायरस किती खतरनाक? लक्षणे अन् उपाय काय? आपल्याला पडलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे!
Human Metapneumovirus : भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
भारतात एकाच दिवसात HMVP व्हायरस बाधित दुसरा रुग्ण सापडला, महाराष्ट्र सरकार अलर्ट मोडवर!
Nandurbar News : मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
मोठी बातमी : 23 वर्षीय दिपाली चित्तेला भोसकलं, तरुणीच्या मृत्यूने महाराष्ट्र हादरला
Beed Crime: संतोष देशमुख प्रकरणात सीआयडीच्या मोठ्या हालचाली, वाल्मिक कराडला मकोका लागणार?
मोठी बातमी: वाल्मिक कराडला मोक्का लागणार? सीआयडीच्या हालचालींना वेग
Embed widget