एक्स्प्लोर

Movie Review : कसा आहे 'Operation Valentine'? वाचा रिव्ह्यु

Movie Review : बॉलीवूचा ऑपरेशन व्हॅलेंटाईन (Operation Valentine) हा नवा कोरा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

Movie Review : बॉलीवूचा ऑपरेशन व्हॅलेंटाईन (Operation Valentine) हा नवा कोरा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे. काश्मीरमध्ये 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा येखे जो हल्ला झाला होता आणि त्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेलल्या एअर स्ट्राईकविषयी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. 

चित्रपटाची गोष्ट

विंग कमांडर अर्जन देवची भूमिका तेलगू स्टार वरुण राजने साकारली आहे. प्रोजेक्ट वज्रमध्ये त्याने त्याचा मित्र कबीर यावा गमावलं, ज्याचा तो अजूनही त्रास सहन करत आहे. तो त्याच्या मनाप्रमाणे वागणारा आहे, त्यामुळे त्याचं दररोज त्याची पत्नी  विंग कमांडर अहाना गिलसोबत भांडण होतं. मिस वर्ल्ड 2017 ची विजेती मानुषी  छिल्लरने ही भूमिका निभावली आहे. याच दरम्यान 2019 मध्ये पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या एअरस्ट्राइक ऑपरेशनची कथा पुढे चालवली आहे. ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर एअर स्ट्राईक देखील दाखवण्यात आलं आहे. 

कसा आहे चित्रपट

चित्रपटाच्या गोष्टीविषयी सांगायचे झाले तर हा चित्रपट 2019 च्या पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर करण्यात आलेल्या एअरस्ट्राईक ऑपरेशनवर आधारित आहे. पण चित्रपट फक्त 2-3 गोष्टींवर जास्त फोकस करतोय. पात्रांच्या वैयक्तिक आयुष्यावर आणि दुसरं त्यांच्या भूतकाळातील घटनांवर. विंग कमांडर अर्जुन हा चित्रपटातील जवळपास 70 टक्के वेळ हा  प्रोजेक्ट वज्रमध्ये हरवलेला त्याचा मित्र कबीर आठवताना दिसेल. यानंतर अर्जुन 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'चा एक भाग बनतो जो भारतीय लष्करावरील हल्ल्यानंतर पाकिस्तानवर हवाई हल्ला करणार आहे.चित्रपटातील दहशतवादाशी निगडित मुद्दे अगदीच जुजबी वाटले. तसेच गोष्ट उभारण्यात फार कमकुवतपणा दिसला. या चित्रपटात कधीही काहीही घडत असल्याचं तुम्हाला वाटू शकतं. 

दिग्दर्शन आणि  VFX

जर आपण चित्रपटातील VFX आणि ग्राफिक्सबद्दल सांगायचं झालं तर कोणत्याही व्हिडिओ गेमचे ग्राफिक्स यापेक्षा चांगले असतील.  VFX चा दर्जा अजिबात समाधानकारक नाही. चित्रपटाचे बजेट 40 ते 50 कोटींच्या दरम्यान होते. दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर चित्रपटाचे दिग्दर्शन आणि छायांकन उत्तम आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंह हाडा यांनी केले आहे.

अभिनय

विंग कमांडर अर्जुन देवच्या भूमिकेत तेलगू स्टार वरुण तेज आणि विंग कमांडर आहना गिलच्या भूमिकेत मिस वर्ल्ड 2017 मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत आहे. मानुषीचे हे टॉलिवूड डेब्यू आहे. चित्रपटात दोन्ही कलाकार हे जोडपं दाखवलं आहे. दोन्ही कलाकरांनी त्यांच्या अभिनयात 100 टक्के दिलेत.  वायुसेनेच्या विंग कमांडरच्या भूमिकेसाठी मानुषी तितकीची मजबूत वाटत नाही पण तिने तिचा अभिनय उत्तमरित्या निभावला आहे. तसेच  वरुण तेजने या चित्रपटात विंग कमांडर तसेच टेस्ट पायलटची भूमिका अत्यंत चांगल्या पद्धतीने साकारली आहे. 

म्युझिक

चित्रपटाच्या पार्श्वसंगीताबद्दल बोलायचे झाले तर संगीत फारसे चांगले नाही पण ठीक आहे. चित्रपटात 2 गाणी आहेत आणि दोन्ही गाणी आपापल्या जागी चांगली आहेत. एकंदरीत हा चित्रपट एरियल-ॲक्शन ड्रामा करण्याचा एक चांगला प्रयत्न म्हणता येईल.

Rating - 5 पैकी 2.5 स्टार्स.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Ajit Pawar on Anna Bansode : आण्णाला रात्री 2 वाजता गुपचूप तिकीट दिलं, कौतुक करता करता गुपितच फोडलं!ABP Majha Marathi News Headlines 1 PM TOP Headlines 1PM 26 March 2025 दुपारी १ च्या हेडलाईन्सAnna Bansode Vidhansabha Deputy Speaker: अण्णा बनसोडे विधानसभा उपाध्यक्षपदी,प्रस्ताव एकमताने समंतNagpur : नागपूरच्या हिंसाचारात दशक्रियेसाठी आलेल्या कुटुंबातील 10 जणांना अटक

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
पुरातत्व खात्याकडे संरक्षित स्मारक म्हणून वाघ्या कुत्र्याचे स्मारक नाही, कोणताही ऐतिहासिक संदर्भ नाही : संभाजीराजे
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
मोठी बातमी! महाराष्ट्रात इलेक्ट्रिक वाहने टॅक्स फ्री, मुख्यमंत्र्‍यांचे विधानसभेत सूतोवाच; मंत्र्‍यांनाही EV कार
Warren Buffett : भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
भारतात सोनं लाखाच्या घरात, पण जगातील अब्जाधीश वाॅरेन बफे सोन्यामध्ये गुंतवणूक का पसंत करत नाहीत?
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
अभिनेत्री प्राजक्ता माळीचा महिन्याचा खर्च किती? स्वतःच सांगितली रक्कम
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
डोनाल्ड ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण घरची सून जगप्रसिद्ध 'टायगर'सोबत अफेअरमध्ये अडकली! पोस्ट शेअर करत म्हणाला..
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Video : आई वाचवं मला! चार वर्षांपूर्वी लव्ह मॅरेज, दहा लाख देतोस की नाही? बायकोनं नवऱ्याला खोली बंद करून चोपलं; हतबल नवऱ्याची आईकडे मदतीसाठी याचना
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Bhaskar Jadhav : विरोधी पक्षनेते पदासाठी दुपारपर्यंत संयम ठेवेन, सरकारला अल्टिमेटम
Santosh Deshmukh Case & Walmik Karad: संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्यासाठी उज्ज्वल निकमांचा पहिला युक्तिवाद, विष्णू चाटेचं नाव घेत म्हणाले...
Embed widget