Navratri 2024 Travel: नवरात्र 5 वा दिवस, मोक्ष देणाऱ्या..इच्छा पूर्ण करणाऱ्या देवी स्कंदमातेचं एक चमत्कारिक मंदिर, जाणून घ्या अद्भूत मंदिराबद्दल
Navratri 2024 Travel: दुर्गा देवीच्या या रुपाला एकाग्रतेची देवीही म्हणतात. आजच्या दिवशी भाविक स्कंदमातेच्या मंदिरात जाऊन देवीसमोर नतमस्तक होतात, आणि सुख-समृद्धीची कामना करतात.
Navratri 2024 Travel: सध्या संपूर्ण देशभरात देवीचा जागर सुरू आहे, नवरात्रोत्सवाचा आजचा पाचवा दिवस आहे. या दिवशी, मोक्ष देणाऱ्या, भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणाऱ्या दुर्गा देवीचे पाचवे रूप देवी स्कंदमातेची पूजा केली जाते. दुर्गा देवीच्या या रुपाला एकाग्रतेची देवी देखील म्हणतात. आजच्या दिवशी अनेक लोक देवीच्या मंदिरात जाऊन देवीसमोर नतमस्तक होतात, आणि सुख-समृद्धीची कामना करतात. देवी दुर्गामातेच्या स्कंदमाता रूपाची मंदिरं कोठे आहेत? काय आहे यामागील भाविकांची श्रद्धा आणि इतिहास जाणून घ्या
स्कंदमाता देवीचे मंदिर कोठे आहे?
स्कंदमाता देवीचे मंदिर वाराणसीच्या जगतपुरा भागात असलेल्या बागेश्वरी देवी मातेच्या मंदिराच्या संकुलात आहे, जिथे आज भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. धार्मिक मान्यतेनुसार, काशीखंड आणि देवी पुराणात देवीच्या या रूपाचा उल्लेख आहे. जर तुम्हीही देवीच्या मंदिरात जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्हीही देवीच्या दरबारात जाऊन तिच्याकडे सुख-समृद्धीची कामना करू शकता. नवरात्रीच्या दिवसात मंदिर परिसराबाबत बोलायचे झाले तर गर्दीमुळे कोणतीही घटना घडू नये म्हणून आजच्या दिवशी पोलीस प्रशासनही पूर्ण सतर्कतेने तैनात असते.
वाईट शक्तींपासून रक्षण करणारी...
असे मानले जाते की, एकदा देवासुर नावाच्या राक्षसाने वाराणसीमध्ये संत आणि सामान्य लोकांवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. यावर देवी स्कंदमातेने त्या राक्षसाचा नाश केला. या घटनेनंतर येथे मातेची पूजा होऊ लागली. असे मानले जाते की, येथे देवी निवास करते आणि काशीचे वाईट शक्तींपासून संरक्षण करते.
एकाग्रतेची देवी स्कंदमाता
देवीच्या मंदिरात तशी दररोज भाविकांची वर्दळ पाहायला मिळते, मात्र नवरात्रीच्या दिवसांत देवीच्या मंदिरातील गर्दी पाहण्यासारखी असते. मंदिराबाबत अशी श्रद्धा आहे की, देवीला खऱ्या आणि एकाग्र मनाने एखादी गोष्ट मागितली तर देवी नक्कीच पूर्ण करते. भक्तांच्या श्रद्धेनुसार, देवीच्या केवळ दर्शनाने भक्तांची वाईट कर्मही दूर होतात. देवीला प्रसाद म्हणून लाल चुनरी, सिंदूर, बांगड्या आणि नारळ अर्पण केले जातात.
मंदिरात जाण्यासाठी सर्वोत्तम वेळ
सकाळी 6:30 ते रात्री 09:00
मंदिर दुपारी 12:00 ते 04:00 पर्यंत बंद असते
परंतु नवरात्रीच्या दिवसात मंदिर दिवसभर खुले असते
स्कंदमाता देवी मंदिरात कसे जायचे?
जवळचे विमानतळ - वाराणसी विमानतळ (सुमारे 25 किमी.)
जवळचे रेल्वे स्टेशन - कँट रेल्वे स्टेशन (वाराणसी जंक्शन - 5 किमी.)
जवळचा रस्ता - राष्ट्रीय महामार्ग-19, पूर्वांचल द्रुतगती मार्ग किंवा बस सेवा
जवळचा रस्ता - राष्ट्रीय महामार्ग-19, पूर्वांचल द्रुतगती मार्ग किंवा बस सेवा
हेही वाचा>>>
Navratri 2024 Travel: नवरात्रीचा 4 दिवस, कुष्मांडा देवीचे एक अद्भूत मंदिर, जिथे साक्षात पिंडीच्या रूपात देवी विराजमान, पिंडीतून सतत वाहणाऱ्या पाण्याचे रहस्य काय?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )