एक्स्प्लोर

Mental Health Tips : कम्फर्ट झोनमधून बाहेर पडाल तरच पुढे जाल; 'या' टिप्स ठरतील उपयोगी

Mental Health Tips : करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. बरेच लोक नवीन काम करण्यास टाळाटाळ करतात.

Mental Health Tips : कम्फर्ट झोन ही अशी परिस्थिती आहे ज्यामध्ये एखादी व्यक्ती एकाच क्षेत्राखाली किंवा एकच काम करते. त्या क्षेत्रातून बाहेर येण्यासाठी किंवा नवीन काम शिकण्याची या लोकांना भीती वाटते. ती व्यक्ती नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्नही करत नाही. उदाहरणार्थ घ्यायचं झाल्यास, जर एखादी व्यक्ती एकाच कंपनीत अनेक एकाच कंपनीत वर्षानुवर्षे काम करत असेल, तर त्यांना तिथे सुरक्षित वाटू लागते. तसेच, दुसऱ्या ठिकाणी काम करताना त्यांना भीती वाटते. अशा परिस्थितीत ते स्वत:ला एका मर्यादेत ठेवतात. पण, हा कम्फर्ट झोन तुमच्या वैयक्तिक प्रोग्रेसमध्ये मोठा अडथळा आहे. म्हणून, तुम्ही स्वतःला काहीतरी नवीन शिकण्याची संधी द्यावी आणि या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं गरजेचं आहे. सुरुवातीला तुम्हाला यात काही अडचण येऊ शकतात पण तुमच्या भविष्यासाठी हा मार्ग चांगला असतो. अशा परिस्थितीत, या टिप्स तुम्हाला कम्फर्ट झोनमधून बाहेर पडण्यास मदत करू शकतात.

तुमचा कम्फर्ट झोन ओळखा

स्वतःबद्दल विचार करा. सर्वात आधी, तुमचा कम्फर्ट झोन कोणता आहे? तुम्हाला कोणते काम सर्वात सोयीचे वाटते? हे जाणून घेणं आणि ती कामे किंवा दैनंदिन दिनचर्या ओळखणं महत्त्वाचं आहे. 

ध्येय निश्चित करा 

तुमच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी तुमचे ध्येय जाणून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे तुमचे ध्येय निश्चित करा. काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. 

भीतीचा सामना करा

कम्फर्ट झोनमधून बाहेर पडणं हे आव्हानात्मक असू शकतं. पण, या भीतीचा सामना करणं गरजेचं आहे. तुमच्या मार्गात येणाऱ्या प्रत्येक आव्हानाला आणि समस्येला न घाबरता सामोरे जा. यासाठी अनेक नकारात्मक विचार मनात येतील ते काढून टाका. स्वत:वर संशय न घेता स्वत:वरचा आत्मविश्वास कायम ठेवा.

छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा 

यासाठी सर्वात आधी छोट्या-छोट्या निर्णयांपासून सुरुवात करा. काही छोटी ध्येय निश्चित करा. जसे की, वाचन, योगासन, व्यायाम असे छोटे निर्णय घेण्याची सवय लावा. यामुळे मोठा निर्णय घेताना फारसा त्रास होणार नाही. 

सकारात्मक आणि ग्रोथ माईंड सेट ठेवा 

कम्फर्ट झोनमध्ये राहून तुम्ही तुमच्या करिअरमध्ये प्रगती करू शकत नाही. त्यासाठी यातून बाहेर पडावे लागेल. त्यासाठी काहीतरी नवीन शिकून स्वत:चा विकास करण्याची इच्छा असली पाहिजे आणि त्या गोष्टीबद्दल उत्साही राहा. 

महत्त्वाच्या बातम्या :

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

Fitness Tips : वर्किंग महिलांनी व्यस्त दिनश्चर्येतून 'अशी' घ्या आरोग्याची काळजी; फॉलो करा सोप्या टिप्स

महत्त्वाच्या बातम्या

Women Health: IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
IVF उपचारात एकावेळी एकच भ्रूण प्रत्यारोपित करण्यावर भर, आई-बाळाची सुरक्षितता महत्त्वाची, तज्ज्ञ सांगतात...
Beauty Tips: सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
सौंदर्योपचार निवडताना सोशल मीडियावरील माहितीवर अवलंबून राहू नका! त्वचारोगतज्ज्ञांची महत्त्वाची माहिती...
Hindu Religion : जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
जोडवी नेहमी पायाच्या दुसऱ्याच बोटात का घालतात? सोन्याऐवजी चांदीची जोडवी घालण्यामागे 'हे' आहे खरं कारण...
Bisleri water FSSAI: मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी
मोठी बातमी: बिस्लेरी कंपनीच्या पाण्यात आढळला कॅन्सरला कारणीभूत ठरणारा घटक, FSSAI कडून खटला चालवण्यास मंजुरी

व्हिडीओ

Pune Shivajinagar Court Incident: पुण्यात गोळीबार, हल्लेखोर किती? कसं घडलं? प्रत्यक्षदर्शी म्हणाले..
Kurla Phoenix Mall Madrasa Reality Check Mumbai News: मारहाण करणारी मुलं कुठून आली? कुर्ल्यातील 'त्या' मदरशाचा रियालिटी चेक
Anjali Ambedkar vs Sharad Pawar : 'बी टीम'वरून पलटवार 'वंचित'च्या टार्गेटवर पवार Special Report
Devendra Fadnavis Koyna Dam Water : मुंबईसाठी कोयनेचं पाणी,पाठिंबा आणि गाऱ्हाणी Special Report
Sanjay Raut : प्रकाश आबिटकर हे देखील त्यावेळी परत येऊ इच्छित होते, संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; वेळ ठरली, दिसला की तोडला, 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
भावाच्या मृतदेहासमोर शपथ, शुभमचा बदला, मंदार टार्गेटवर; 2025 मधील नेमकं प्रकरण काय?
Pune Mayor Flex: 'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
'भाऊ फ्लेक्स काढा' मोहिमेत महापौर मंजुषा नागपुरेंनाच घरचा आहेर; फोटो शेअर करत पालिकेनं विचारलं 'ड्रेनेजची तसदी समजू शकतो, फ्लेक्सची का?', पुण्यात कारवाईला वेग
Shivajinagar Court Mangesh Kiwale Case: आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
आधी वाटलं किरकोळ वाद, नंतर रक्तबंबाळ होऊन तो हळूहळू चालत आला अन् पडला, हल्ल्यानंतरचे ते चार शब्द बोलले...; प्रत्यक्षदर्शीने सांगितला मंदार किवळेसोबतचा थरार
Yogesh Kadam on Pune Mandar Kiwale Case: मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
मंदार किवळे प्रकरणावर गृहराज्य मंत्र्यांचं भाष्य; म्हणाले 'पोलिसांचा धाक काय असतो, हे दाखवून द्या', मुलं कुठून आली त्यांची पार्श्वभूमीही मागवली
Pune Shivajinagar Court Mandhar Kiwale Case: शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
शुभमच्या सख्ख्या भावानेच मंदारवरील हल्ल्याचा कट रचला; पुण्यातील किवळेप्रकरणी सगळ्यात मोठा ट्विस्ट
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं, चांदीच्या दरात 8000 रुपयांची घसरण
Gold Rate : सोने चांदीच्या दरात आज मोठी घसरण, MCX वर सोने 1 लाख 20 हजार रुपयांच्या खाली पोहोचलं
Donald Trump : अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
अमेरिकेचा भारतासह एकूण 14 देशांवर नव्यानं 25 टक्के टॅरिफ लादण्याचा इशारा, अखेर भारतानं ठाम प्रत्युत्तर दिलं...
Pune Bopdev Accident : पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
पुण्याच्या बोपदेव घाटातून उतारानं येणारा टेम्पो काळ बनून आला, तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू, दोन जण जखमी 
Embed widget