Health Tips : घशात सूज आणि खवखव जाणवत असल्यास, 'हे' प्रभावी घरगुती उपाय करा
Health Tips : बदलत्या ऋतूमध्ये घसा खवखवणे किंवा दुखणे ही समस्या वाढते, ज्यामुळे त्रास होतो. तथापि, या घरगुती उपायांनी तुम्ही घशातील सूज आणि खवखव लक्षणीयरीत्या कमी करू शकता.
Health Tips : अचानक कडक उष्णतेनंतर हवामान झपाट्याने बदलते आणि नंतर कधी कधी वादळ आणि पाऊस पडतो. त्याचा आरोग्यावरही परिणाम होतो. कडक उन्हाळ्यात थंड पाणी पिणे आणि पावसात आईस्क्रीम खाल्ल्याने घशात सूज आणि दुखणे होते. काही लोकांसाठी हा त्रास इतका वाढतो की त्यामुळे तापही येतो. सर्दी-खोकला पावसाळ्यात आणि उन्हाळ्यात सर्वाधिक असतो, त्याचा परिणाम घशावर होतो. कधीकधी घशात ऍलर्जी देखील होते, ज्यामुळे खाण्या-पिण्यात त्रास होतो. तुम्हालाही अशी समस्या जास्त असेल तर नेहमी औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपायांचा अवलंब करा. यामुळे घसा खवखवणे आणि संसर्गापासून आराम मिळेल.
घसा खवखवणे घरगुती उपाय
1. मिठाच्या पाण्याने गुरळ्या करा : घसा दुखणे, सूज येणे किंवा दुखणे दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्याने गुरळ्या कराव्या. यामुळे घशाला खूप आराम मिळतो. गुरळ्यांसाठी पाणी थोडे कोमट असावे.
2. कोमट पाण्याने सूज दूर होईल : घशात सूज असेल तर कोमट पाणी प्यावे. थंड पाण्याने ही समस्या वाढू शकते. कोमट पाणी प्यायल्याने संसर्ग हळूहळू कमी होतो. तुम्हाला हवे असल्यास पाण्यात थोडी हळदही टाकू शकता. त्यामुळे सूज कमी होईल.
3. मधामुळे मिळेल आराम : घसा खवखवणे किंवा कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन असल्यास मधाचे सेवन करावे. मधामध्ये अँटिबायोटिक गुणधर्म असतात जे घसादुखी, खोकला आणि सर्दीपासून आराम देतात. मधामुळे घसा खवखवणे आणि सूज यांमध्येही आराम मिळतो.
4. हळदीचे दूध प्या : घसा खवखवणे आणि दुखत असल्यास रात्री हळदीचे दूध प्यावे. हळदीमध्ये अँटीबायोटिक आणि अँटीसेप्टिक घटक असतात जे जळजळ आणि वेदना कमी करतात. हळद घशासाठी फायदेशीर आहे.
5. आले खावे : घसादुखी किंवा सर्दी खोकला झाल्यास आल्याचा वापर करा. आल्यामध्ये शक्तिशाली औषधी गुणधर्म असतात. घसादुखीपासून सुटका मिळवण्यासाठी आल्याचा तुकडा किसून एक ग्लास पाण्यात टाकून उकळा. 5 मिनिटे उकळल्यानंतर ते पाणी गाळून कोमट प्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :
- Summer Skin Care : त्वचा सुंदर आणि चमकदार बनवण्यासाठी घरीच बनवा 'हे' स्क्रब
- Health Tips : जेवल्यानंतर लगेच करु नका 'ही' चूक, आरोग्यावर होईल वाईट परिणाम
- Health Tips : व्यायाम केल्यानंतर लगेच चुकूनही करु नका 'या' गोष्टी, होईल नुकसान
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )