एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Case Ujjwal Nikam : संतोष देशमुखांच्या हत्याप्रकरणाचा खटला उज्ज्वल निकम लढवणार

मुंबई: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणात महाराष्ट्र सरकारतर्फे ज्येष्ठ विधिज्ञ उज्वल निकम (Ujjwal Nikam) यांची विशेष सरकारी वकील म्हणून, तर अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे (Balasaheb Kolhe) यांची सहाय्यक विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीच्या आदेशाची प्रत सोशल मीडियावर शेअर करत याबाबत माहिती दिली. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्यादृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट मानली जात आहे. संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि मस्साजोगच्या गावकऱ्यांनी सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची मागणी लावून धरण्यात आली होती. या मागणीला अखेर यश आले आहे. 

उज्ज्वल निकम हे महाराष्ट्रातील अत्यंत नावाजलेले वकील आहेत. त्यांनी मुंबई बॉम्बस्फोट खटल्यासारख्या महत्त्वाचे खटले लढवले आहेत. मुंबईवरील 26/11 हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाब याला फासावर लटकवण्यात उज्ज्वल निकम यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्यामुळे उज्ज्वल निकम हे हायप्रोफाईल वकील म्हणून ओळखले जातात. संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या खटल्यात त्यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाल्याने वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

केज तालुक्यातील आवादा कंपनीकडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून संतोष देशमुख यांची 9 डिसेंबरला निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. यामध्ये विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि त्यांच्या साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती. तर या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा वाल्मिक कराड याने पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले होते. या सगळ्यांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. वाल्मिक कराड हा राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता असल्याने वादंग निर्माण झाला होता. या प्रकरणात देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटी नेमून तपासाचे आदेश दिले होते. मात्र, संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचा तपास निष्पक्ष होण्यासाठी धनंजय मुंडे यांनी मंत्रि‍पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी होत आहे.

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
ABP Premium

व्हिडीओ

Election Commission PC : राज्यात महानगर पालिका निवडणुका जाहीर, 15 जानेवारीला मतदान, 16 ला मतमोजणी
Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Madhuri Elephant : अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
अखेर ठरलं! नांदणी मठाची माधुरी हत्तीण परत येणार; आरोग्यासंदर्भातील समाधानकारक अहवाल सादर, वनताराचे संवर्धन केंद्र बांधण्यासही परवानगी
Samruddhi highway accident: समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
समृद्धी महामार्गावर कारचा टायर फुटला, कल्याणमधील कुटुंबावर काळाचा घाला, अपघातापूर्वीचा व्हिडीओ व्हायरल
Amravati Crime News: भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
भर बाजारात टोळक्याने एकाला चाकूने भोसकले, घटनेनं अमरावती शहर हादरलं, नेमकं काय घडलं?
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
शॉकींग! एक कोटीच्या इन्शुरन्साठी स्वतःचा ‘मृत्यू’; लिफ्ट मागणाऱ्या वृद्धाचा जिवंत जाळून खून, उलगडलं सत्य
Jalgaon : नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
नऊ वर्षांची चिमुकली तीन दिवसांपासून रहस्यमयरित्या बेपत्ता, गावाबाहेर शाळेचे दप्तर आढळलं; चाळीसगावातील घटना
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
थेट मुंबई उच्च न्यायालयाच्या दारात एकानं स्वत:ला पेट्रोलनं पेटवून घेतलं, तब्बल 60 टक्के भाजल्याची भीती
BMC Election 2026: मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीची तारीख ठरली, आता राज-उद्धव ठाकरे 'ती' महत्त्वाची घोषणा करणार
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
बिहारमध्ये दणकून आपटल्यानंतर प्रशांत किशोर पुन्हा चकवा देण्याच्या तयारीत? थेट दिल्ली गाठत कोणाशी केली 'मन की बात'??
Embed widget