Ganesh Chaturthi Recipes : बाप्पाच्या नैवेद्यासाठी घरच्या घरी बनवा स्वादिष्ट खव्याचे मोदक; खाणारेही म्हणतील वाह, क्या बात है
लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व तयारी झाली आहे. मात्र, बाप्पाला गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो.
Ganesh Chaturthi 2022 Mawa Modak Recipe : लाडक्या 'बाप्पा'च्या अगमनाला अवघे काही दिवस बाकी राहिले आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे. लाडक्या गणपती बाप्पाच्या स्वागताची सध्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. सर्व तयारी झाली आहे. मात्र, बाप्पाला गोडाचा नैवद्य काय द्यावा, असा प्रश्न नेहमी पडतो. बाप्पाला आवडणाऱ्या मोदकांचा जर तुम्ही प्रसादासाठी विचार करत असाल तर जाणून घ्या खव्याचा मोदक कसा तयार करायचा.
खव्याचा मोदक करण्यासाठी साहित्य काय?
खावा (मावा)- 400 ग्रॅम
साखर- 1/4 कप
इलायचीची पावडर -1/4 चमचा
केसर- चिमुटभर
खव्याचे मोदक तयार करण्याची कृती काय?:
खवा मोदक करण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घ्या...
पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये खवा आणि साखर टाका
खवा आणि साखर व्यवस्थित मिसळा
खवा आणि साखरेचं मिश्रण व्यवस्थित झाल्यानंतर त्यामध्ये केसर टाका
या मिश्रणाला घट्ट होईपर्यंत व्यवस्थित शिजवा..
त्यानंतर यामध्ये इलायचीची पावडर टाका आणि मिक्स करुन घ्या..
थोड्यावेळानंतर गॅस बंद करा..
मिश्रण थंड झाल्यानंतर त्याला मोदकाच्या साच्यामध्ये टाका अथवा हाताने मोदकाचा आकार द्या.
तुमचे चविष्ट खवा मोदक तयार झाले.
जाणून घ्या चॉकलेट मोदकाची रेसिपी...
चॉकलेट मोदकासाठी लागणारे साहित्य
डार्क चॉकलेट - 250 ग्राम
खवलेला नारळ - 100 ग्राम
बदाम - 7-8 बदाम
काजू - 5-6 काजू
पिस्ता - 4-5 पिस्ता
कंडेंस्ड दूध - 50 ग्राम
तूप - 1 चमचा
चॉकलेट मोदकाची कृती
- चॉकलेट मोदक बनवण्यासाठी सगळ्यात आधी डार्क चॉकलेट तूपामध्ये वितळून घ्यावे. चॉकलेट वितळण्यासाठी तव्यावर पाणी टाकून त्यावर एक ताट ठेऊन चॉकलेट वितळावे.
- त्यानंतर दुसऱ्या भांड्यात काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळ एकत्र करावा.
- काजू, बदाम, पिस्ता आणि खवलेला नारळात कंडेंस्ड दूध टाकून छान मिश्रण तयार करून घ्यावे.
- मिश्रणात चॉकलेट टाकून ते थंड होण्यास ठेवावे.
- त्यानंतर ते मिश्रण मोदकाच्या साच्यात टाकून छान मोदक बनवावेत.
बाप्पाचं आगमन यंदा कधी होणार?
यंदा 31 ऑगस्ट 2022 रोजी म्हणजेच (बुधवारी) बाप्पाचं आगमन होणार आहे. कोरोना काळानंतर यावर्षी सगळेच सण, उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरे केले जात आहेत. त्यामुळे आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यासाठी गणेश भक्तांमध्येही मोठ्या प्रमाणात उत्साह पाहायला मिळतो आहे.
आणखी वाचा -
Ganesh Chaturthi 2022 Chocolate Modak : बाप्पाचं स्वागत करा चॉकलेट मोदकाने; जाणून घ्या कृती...
Ganeshotsav 2022 : महाराष्ट्रातली सर्वात उंच गणेशमूर्ती 'मुंबईच्या महाराजा'ची, परशुराम रुपी मूर्तीची उंची तब्बल...
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )