एक्स्प्लोर

Holi 2023: होळीमध्ये गोड अन् तळलेले पदार्थ खाऊन अॅसिडिटी झालीय? मग हा घरगुती उपाय नक्की करा

अॅसिड रिफ्लक्सच्या लक्षणांसाठी अनेक नैसर्गिक घरगुती उपचार आहेत, त्यापैकी बरेच आपल्या स्वयंपाकघरात असण्याची शक्यता आहे.

Holi 2023: रंगांचा सण होळी आला असून या काळात कुटुंबीय आणि मित्रांसोबत होळी खेळण्‍यासह तळलेले तसेच गोड पदार्थ (गुजियासारखी मिठाई) आणि पेय यांचा मोठया प्रमाणात आस्‍वाद घेतला जातो. पण अशा सणादरम्‍यान हवेहवेशे वाटणाऱ्या खाद्यपदार्थांचे अतिप्रमाणात सेवन केल्‍यास तुमच्‍या पचनशक्‍तीवर परिणाम होऊ शकतो.

कमी वेळेत जास्त खाणे किंवा तळलेले पदार्थ किंवा मिठाई खाल्ल्याने पोटात अॅसिडिटी सारख्या अपचनाच्या समस्या उद्भवू शकतात. अॅसिडिटी रिफ्लक्‍स म्‍हणून देखील ओळखली जाणारी ही स्थिती पोटात मोठ्या प्रमाणात अॅसिड निर्माण झाल्‍यामुळे उद्भवते. अन्‍ननलिकेमध्‍ये हे खाद्यपदार्थ परतत असल्‍याने अॅसिडिटी होते. यामुळे छातीमध्‍ये असह्य जळजळ होऊ शकते, घशामध्‍ये आंबट चव जाणवू शकते. पचन, मळमळ आणि बद्धकोष्ठता ही देखील अॅसिड रिफ्लक्सची इतर सामान्य लक्षणे आहेत.

डॉ. केयुर शेठ, कन्‍सल्‍टन्टच गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेपॅटोलॉजिस्ट, मुंबई म्हणाले की, "तब्बल 30 टक्‍के भारतीयांना वारंवार छातीत जळजळ, पोटात गोळा येणे आणि मळमळ होण्याची लक्षणे जाणवतात. ही सामान्यत: अॅसिड रिफ्लक्स किंवा गॅस्ट्रोएसोफेगल रिफ्लक्स आजाराची लक्षणे आहेत, जे जीईआरडी म्हणून ओळखली जाते आणि त्‍यामुळे लक्षणीय अस्वस्थता येऊ शकते. सुदैवाने, जीवनशैली व आहारातील बदल आणि अँटासिड्स सारख्या औषधांसह अनेक उपाय त्‍वरित किंवा दीर्घकाळापर्यंत आराम देतात."

अॅबॉट इंडियाचे मेडिकल अफेअर्स डायरेक्‍टर डॉ. जेजो करणकुमार म्‍हणाले, "अनारोग्‍यकारक आहार व जीवनशैली सवयींमुळे भारतातील अधिकाधिक व्‍यक्‍तींना अॅसिडीटीचा त्रास होत आहे. संतुलित आहाराचे सेवन करत अॅसिडीटीमध्‍ये सुधारणा करता येऊ शकते. तसेच झटपट थंड करणारे अँटासिड्स देखील जलद आणि प्रभावी आरामासाठी एक पर्याय असू शकतात. पोटातील अॅसिडीटीशी संबंधित अस्वस्थता कमी केल्याने व्‍यक्‍तींना त्‍यांचा उर्वरित दिवस उत्तम व्यतित करण्यास आणि निरोगी, परिपूर्ण जीवनाचा भाग म्हणून ज्या गोष्टींचा आनंद मिळतो त्या करत राहण्यास मदत होऊ शकते."

यंदा होळीला अॅसिडीटीवर नियंत्रण मिळविण्‍यासाठी पालन करता येऊ शकतील असे काही उपाय पुढीलप्रमाणे:

अॅसिड रिफ्लक्सच्या लक्षणांसाठी अनेक नैसर्गिक घरगुती उपचार आहेत - त्यापैकी बरेच आपल्या स्वयंपाकघरात असण्याची शक्यता आहे. हे उपचार पुढीलप्रमाणे:

  • तुळशी (तुळशीची पाने) - पाने धुवून चघळा किंवा एक कप पाण्‍यात पाने उकळवून काढा बनवा, गरम व सुखदायक चहा म्हणून सेवन करा.
  • सौफ (बडीशेप) - बडीशेप काही तास पाण्यात भिजत ठेवा आणि जेवणानंतर खा किंवा थेट बिया चावून खा.
  • गूळ - थोडा गूळ थंड पाण्यात भिजवून ते प्या किंवा जेवणानंतर थोडासा तुकडा खा.
  • बदाम - दिवसभर मूठभर सुके बदाम केळ्यांसोबत सेवन करा.  

दीर्घकाळापर्यंत आराम देणारा उपाय

अॅसिडीटीपासून दीर्घकाळपर्यंत आराम मिळवण्‍याकरिता तुम्‍ही ओव्‍हर-द-काऊंटर उपलब्‍ध असलेले अँटासिड्स घेऊ शकता. यामुळे तुम्‍ही घरी, कामाच्‍या ठिकाणी, चालता-फिरता पोटातील अॅसिड निष्‍प्रभ होत अॅसिडीटी्या लक्षणांपासून आराम मिळवू शकता. आज हे चघळण्यायोग्य टॅब्लेटपासून द्रव-आधारित जेल सिरपपर्यंत, संत्रा, पुदीना आणि मिश्र फळांसारख्या चवदार फ्लेवर्समध्ये व सोप्या स्वरूपात उपलब्ध आहेत.

वारंवार होणाऱ्या अॅसिडीटीसाठी प्रतिबंधात्‍मक उपायांचा अवलंब

पोटातील अॅसिडीटीचे व्‍यवस्‍थापन कसे करावे हे माहित असण्‍यासोबत विशेषत: वारंवार अॅसिडीटी होत असल्‍यास त्‍यावर कशाप्रकारे प्रतिबंध ठेवावा हे देखील माहित असणे महत्त्वाचे आहे. काही जीवनशैली व आहारविषयक सूचना आहेत, ज्‍यांचे तुम्‍ही वर्षभर या स्थितीवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी पालन करू शकता.

तळलेले पदार्थ व फॅट-युक्‍त मिठाई आणि मसालेदार पदार्थ (विविध प्रकारचे चाट, सब्जी किंवा गरम मसाला असलेल्या भाज्या) यांसह विशेषतः अॅसिड रिफ्लक्स होण्याची शक्यता असलेले पदार्थ टाळा. यामध्ये फिरणी आणि दही वड्यापासून होळीच्या वेळी सेवन केल्‍या जाणाऱ्या खास पदार्थांचा समावेश आहे.

लक्षणांवर नियंत्रण ठेवण्‍यासाठी ट्रिगर्स लक्षात ठेवा

  • खाण्‍याच्‍या बाबतीत वेळेचे पालन करा, ज्‍यामध्‍ये सणाचा आनंद घेत असताना विलंब होऊ शकतो. तुमचा आहार आणि झोपण्‍याच्‍या वेळेमध्‍ये किमान एक तासाचे अंतर ठेवा.
  • जेवणानंतर घट्ट कपडे घालणे टाळा.
  • उत्तमरित्‍या हायड्रेटेड राहा आणि सातत्‍याने पुरेशी झोप घ्‍या व दररोज व्‍यायाम करा.  
  • अॅसिडिटीचा उपाय न केल्यास आपल्याला खूप अस्वस्थ वाटते. सुदैवाने, लक्षणे कमी करण्यासाठी काही सोप्या टिप्सचा अवलंब करता येऊ शकतो. घरगुती उपचार, अँटासिड उपाय आणि जीवनशैली व आहाराच्या उपायांनी जलद आणि दीर्घकाळ आराम मिळू शकतो.

लक्षणे कायम राहिल्यास किंवा तुम्हाला वारंवार अॅसिडिटीचा त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadanvis : मला वाटलं जितेंद्र आव्हाडांना जेलमध्ये टाकायचय..फडणवीस भर सभागृहात असं का म्हणाले?ABP Majha Marathi News Headlines 6 PM TOP Headlines 6PM 26 March 2025Uddhav Thackeray Video | उद्धव ठाकरे हरामखोर कुणाला म्हणाले? राम कदम यांची प्रतिक्रियाUddhav Thackeray : हरामखोर आहेत ते...उद्धव ठाकरेंचारोख कुणावर? पाहा संपूर्ण व्हिडीओ ABP MAJHA

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश; बीडच्या महिलांसंदर्भातील अहवाल सादर
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
कल्याणमधील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने फिरुन टाकायचा दरोडे, 10 किलो सोनं अन् चकमकीचा थरार
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
रमजान ईदसाठी घराची साफसफाई; कुलरचा शॉक लागून सख्ख्या जावांचा मृत्यू, गावावर शोककळा
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
‘गद्दार’वरून उत्तर प्रदेशातही वाद पेटला, खासदाराच्या घरावर हल्ला; दगडफेकीत अनेक पोलिसांची डोकी फुटली!
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
संभाजीराजेंनी इतिहास समजून घ्यावा, मगच...; वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरुन इतिहास अभ्यासक सोनवणींचा सल्ला
Kunal Kamra : पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
पीएम मोदी म्हणाले ‘टीका भारतीय लोकशाहीचा आत्मा, पण...! ‘गद्दारी’वरून सुरु झालेला राजकीय विडंबनाचा वाद आता अमेरिकेत पोहोचला!
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
ही उद्धव ठाकरेंची फसवणूक, शिवसैनिकांचा विश्वासघात; स्नेहल जगतापांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने नेते संतप्त
Embed widget