एक्स्प्लोर

डोळे आलेल्या व्यक्तीकडे पाहिल्यावर डोळे येत नाहीत, पाहा काय म्हणाले डॉ अविनाश भोंडवे

Conjunctivitis: डोळे आलेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला डोळे येतील, असा अनेकांचा गैरसमज आहे.

Conjunctivitis: मागील काही दिवसांपासून राज्यात साथीच्या रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखा आजारासोबत डोळ्याच्या आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे दिसत आहे. डोळे आलेलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर आपल्याला डोळे येतील, असा अनेकांचा गैरसमज आहे. डॉ अविनाश भोंडवे यांनी डोळे आलेल्या व्यक्तीच्या डोळ्यात पाहिल्यानंतर डोळे येत नाहीत, असे स्पष्ट शब्दात सांगितले. डोळे आलेल्या माणसांकडे बघितले की आपल्याला डोळे येतात असं नाही. त्यांनी ज्या ठिकाणी हात लावला आहे, तिथे आपण हात लावला आणि मग त्याच हाताने जर आपल्या डोळ्यांना स्पर्श केला तर डोळे येऊ शकतात. डोळे आले की डोळे चुरचुरतात, आग होणे, पाणी येणे, प्रकाशाकडे बघता न येणे अशा गोष्टी होतात. पण 5 दिवसांत बरं वाटायला लागतं. आयड्रॉप वापरण्याची गरज पडेलच असं नाही. डॉक्टरांचा सल्ला घेऊन मग औषधे घ्यावीत, असे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले.  डोळे वरचेवर स्वच्छ पाण्याने धुतल्यास आणि स्वच्छ कपड्याने साफ करत राहिल्यास औषध वापरायची गरज पडत नाही, असेही भोंडवे यांनी सांगितले.

मागील काही दिवसांपासून राज्यात साथीच्या रोगाच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. थंडी, ताप, खोकला, अंगदुखी यासारखा आजाराने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांना व्हायरल इन्फेक्शन झाल्याचे दिसत आहे. व्हायरल इन्फोक्शन म्हणजे ताप सर्दी खोकला होणे होय. अशा प्रकारचे रुग्ण जास्त प्रमाणात बघायला मिळत आहेत. पण अशावेळी घाबरुन जाऊ नका, असे आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. ते म्हणाले की, ताप, सर्दी, खोकला असलेल्या रुग्णांचे प्रमाण 15-20 टक्के  इतके आहे. डेंग्यूच्या रुग्णांमध्ये तितकी वाढ नाही. 50 रुग्णांमध्ये 10 रुग्णांना डेंग्यू आहे. मात्र डोळे येण्याची साथ आलेली आहे. माझ्याकडे येणाऱ्या रुग्णांमध्ये 15 टक्के रुग्णांना डोळे आल्याचं बघायला मिळतेय, असे डॉक्टर अविनाश भोंडवे यांनी सांगितले. सध्या वातावरणामुळे हे बदल बघायला मिळत आहेत. स्वच्छतेचे पालन करणे, हात पाय स्वच्छ धुण्यासह स्वत:च्या आरोग्याची काळजी घेतल्यास साथीच्या आजारावर मात करता येईल.

सध्या असं बघायला मिळतंय की दिवसा ताप येतो. रात्रीपर्यंत उतरतो आणि पुन्हा संध्याकाळी ताप येतो. असं झालं तर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घ्यावेत. व्हायरल सध्या गोळ्यांनी नीट होऊ शकते, त्यासाठी अँटीबायोटिक घ्यायची गरज नाही. कोणताही साथीचा आजार झाल्यास पाच दिवसात बर वाटते, त्यामुळे घाबरून जायची गरज नाही, असे अविनाश भोंडवे यांनी सांगितले. 

काय आहेत लक्षणे? 
दिवसात २ वेळेला ताप येणे
बारीक थंडी 
खोकला 

खबरदारी कशी घ्यावी?  
मास्क वापरणे 
स्वच्छता राखणे 
डॉक्टरचा सल्ला घेणे 
गरम पाण्याने गुळण्या करणे

Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )

Calculate The Age Through Age Calculator

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Cancer : फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
फक्त सिगारेट-दारूच नाही, तर तुमच्या 'या' 5 छोट्या सवयींमुळेही वाढू शकतो कॅन्सरचा धोका; तज्ज्ञांचा इशारा
चुकीची जीवनशैली देते कर्करोगास आमंत्रण, Cancer चे जोखीम घटक कोणते? 
चुकीची जीवनशैली देते कर्करोगास आमंत्रण, Cancer चे जोखीम घटक कोणते? 
Health: मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध: अल्झायमर, मधुमेह आणि सीजीएम यांच्‍यामधील समान दुवा
मेंदू आणि रक्‍तातील ग्लुकोजचा संबंध: अल्झायमर, मधुमेह आणि सीजीएम यांच्‍यामधील समान दुवा
न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे काय? मेंदू अन् मज्जासंस्थावर होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं..
न्यूरोलॉजिकल समस्या म्हणजे काय? मेंदू अन् मज्जासंस्थावर होतो परिणाम; जाणून घ्या लक्षणं..

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Pawar and Ajit Pawar: राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेते शरद पवारांना विरोध करतायत, आमदारांनाही धमकावलं? रोहित पवारांचा खळबळनजक दावा
राष्ट्रवादीतील स्वत:चं महत्त्व टिकवण्यासाठी काही नेत्यांचा शरद पवारांना विरोध, आमदारांना धमकावलं? रोहित पवारांचा खळबळजनक दावा
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
जुन्या चित्रपटस्टाईलने मामा भाच्याचे अपहरण, राजस्थानहून पार्सल आल्याचा बनाव; 3 तासांत आरोपी गजाआड
Rohit Pawar: राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
राज्य सरकारने अजितदादा अन् माझी केस थांबवायला सांगितली, पण ईडीला दिल्लीतून सूचना आल्या अन्... रोहित पवारांचा खळबळजनक आरोप
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
कराडमध्ये खळबळजनक घटना, प्रेम संबधातून 45 वर्षीय प्रियकराचा; प्रेयसीकडून कुऱ्हाडीने वार, महिलेस अटक
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Embed widget