Health: स्वतःबद्दल वाईट गोष्टी ऐकून चिडचिड, राग येतो का? 'या' मानसिक आजाराला बळी तर पडला नाही ना? जाणून घ्या..
Health: या आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वतःला सर्वोत्तम समजते. त्यांना नेहमी त्यांची स्तुती ऐकायची असते. जर तुम्ही देखील या लक्षणांना बळी पडत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे.
![Health: स्वतःबद्दल वाईट गोष्टी ऐकून चिडचिड, राग येतो का? 'या' मानसिक आजाराला बळी तर पडला नाही ना? जाणून घ्या.. Health lifestyle get angry when you hear bad things about yourself you a victim of Narcissist Personality Disorder mental illness marathi news Health: स्वतःबद्दल वाईट गोष्टी ऐकून चिडचिड, राग येतो का? 'या' मानसिक आजाराला बळी तर पडला नाही ना? जाणून घ्या..](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/10/30/9ab1cef13af76a29fb2f1a3e7c224ffa1730260639975381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health: प्रत्येक मनुष्यामध्ये चांगले आणि वाईट दोन्ही गुण असतात. तसेच प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. तसं पाहायला गेलं तर स्वत:ची स्तुती ऐकायला तसं प्रत्येकालाच आवडतं. म्हणूनच संपूर्ण जगाने त्यांची स्तुती करावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे लोक तुमच्याबद्दल चांगले आणि वाईट दोन्ही बोलतात. पण जेव्हा लोक तुमची प्रशंसा करतात तेव्हा तुम्हाला खूप चांगले वाटते. पण जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुम्ही चिडचिड करता. त्यामुळे तुम्ही भांडण करू लागता. अशा परिस्थितीत, बरेच लोक स्वत: ला सर्वोत्तम समजतात. जर तुम्ही देखील या लक्षणांना बळी पडत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. स्वतःला श्रेष्ठ समजणे आणि स्वत:बद्दल वाईट ऐकल्यावर भांडण करणे. ही मानसिक विकाराची लक्षणं आहेत. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते, म्हणून या आजाराविषयी सविस्तर जाणून घेऊया-
जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुम्ही चिडचिड करता?
जर कोणी तुमच्याबद्दल वाईट बोलले तर तुम्ही चिडचिड करता. त्यामुळे त्यांच्यात भांडणे सुरू होतात. अशावेळी, बरेच लोक स्वत: ला सर्वोत्तम समजतात. जर तुम्ही देखील या लक्षणांना बळी पडत असाल तर तुम्हाला सतर्क राहण्याची गरज आहे. स्वतःला श्रेष्ठ समजणे आणि स्वत:बद्दल वाईट ऐकल्यावर भांडण करणे. ही लक्षणे मानसिक विकाराचे लक्षण आहेत. यावर योग्य वेळी उपचार न केल्यास ते तुमच्यासाठी प्राणघातक ठरू शकते, म्हणून चला या आजाराविषयी सविस्तर जाणून घेऊया
नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डर म्हणजे काय?
‘नार्सिसिझम’ आजार ही एक मानसिक समस्या आहे, ज्याला नार्सिस्टिक पर्सनॅलिटी डिसऑर्डर (NPD) असे म्हणतात. हे पर्सनॅलिटी डिसऑर्डरच्या अनेक प्रकारांपैकी एक आहे. या आजाराने ग्रस्त व्यक्ती स्वतःला सर्वोत्तम समजते. त्यांना नेहमी त्यांची स्तुती ऐकायची असते. त्यामुळे अशा लोकांना सामान्य नातेसंबंध बनवण्यात खूप समस्या येऊ लागतात. असे लोक इतरांशी भावनिक नाते निर्माण करू शकत नाहीत. आत्ममग्न राहणे ही अशा लोकांची प्राथमिकता असते.
नार्सिसिस्ट पर्सनॅलिटी डिसऑर्डरचा उपचार
- दररोज ध्यान करा.
- स्वतःच्या चांगल्या वाईटाचे मूल्यमापन करा.
- इतरांशी स्वतःची तुलना करणे थांबवा.
- स्वतःला सर्वोत्कृष्ट समजणे थांबवा.
- स्वतःची खूप प्रशंसा करणे नेहमी टाळा.
- डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा>>>
Diwali 2024: सावधान! सणासुदीत तुम्ही भेसळयुक्त मिठाई तर खात नाही ना? मिठाईतील भेसळ कशी ओळखाल? घरीच करा चाचणी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)