Health Care Tips : जास्त पाणीही शरीरासाठी अपायकारक; बळावू शकतात गंभीर आजार
आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते.
Water Intoxication : आपल्या शरीरात 70 टक्के पाणी असते. त्यामुळे दिवसभरात योग्यप्रमाणात पाणी पित राहावे. पण पाणी जास्त प्यायल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. पाणी प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते पण जास्त पाणी प्यायल्याने ओवरहाइड्रेशनचा त्रास तुम्हाला होऊ शकतो.
पाणी जास्त प्यायल्याने किडनीचा त्रास होऊ शकतो. जेव्हा आपण जास्त पाणी पितो, तेव्हा आर्जिनिन वॅसोप्रेसिनचा प्लाज्मा स्तर कमी होतो. याचा थेट परिणाम किडनीवर होतो. त्यामुळे पाणी योग्य प्रमाणात प्यावे. शरीर ओवरहाइड्रेशन झाले तर सोडियमचे प्रमाण देखील कमी होते. त्यामुळे मेंदूला सूज येऊ शकते. मेंदूला परिणाम झाल्याने विचार करण्याची क्षमता देखील कमी होते.
यकृत- iron (लोह) चे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने देखील ओवरहाइड्रेशन होते. iron (लोह) चे प्रमाण जास्त असलेले पाणी प्यायल्याने यकृतासंबंधित आजार होऊ शकतात.
हृदय- जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेलियर होऊ शकते. जास्त प्यायल्याने शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते ज्याचा दबाव हृदयांच्या नसांवर निर्माण होतो. जास्त दबावाने हार्ट फेलियर होऊ शकते. त्यामुले योग्य प्रमाणात पाणी प्यावे.
तांब्याच्या भांड्यातून पाणी पिण्याचे अनेक फायदे
तांब हे पोट, लिव्हर आणि किडनीला डिटॉक्स करते. तांब्याच्या भांड्यांमध्ये ठेवलेले पाणी प्यायल्याने बॅक्टिरिया मरतात. तसेच तांब पाणी शुद्ध करते. त्यामुळे पोटामध्ये कधीही अल्सर किंवा इफेक्शन होत नाही.अनेक लोकांना सांधे दुखीचा त्रास होतो. तांब्यामध्ये असणारे अॅंटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज सांधे दुखीपासून आराम देतात. तांब्यामध्ये असणारे अॅंटी- ऑक्सीडेंट्स चेहऱ्यावरील फाइन लाइन्स आणि सुर्कुत्या घालवते.
सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर 3 ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.
Health Care Tips : सकाळी उठल्यावर पाणी पिणं आरोग्यासाठी ठरतं फायदेशीर; काय आहे कारण?
Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )