Health Tips : 'इंटरमिटेंट फास्टिंग' करण्याचा योग्य मार्ग कोणता? जाणून घ्या वजन कसं कमी कराल?
Intermittent Fasting : 16/8 इंटरमिटेंट फास्टिंग करणे ही एक अतिशय लोकप्रिय इंटरमिटेंट फास्टिंग पद्धत आहे.

Intermittent Fasting : भूक नियंत्रित केल्याने वजन नियंत्रित करण्यास मदत होते हे आपल्यापैकी जवळपास सर्वांनाच माहीत आहे. यासाठी 'इंटरमिटेंट फास्टिंग' करणे ही एक प्रभावी पद्धत आहे. यामध्ये तुम्ही काही तास उपवास केला जातो, नंतर अन्नाचं सेवन केलं जातं. आणि हे चक्र पुन्हा सुरु राहतं. उपवासामुळे आपले हार्मोन्स कमी होतात आणि चयापचय वाढते. हळूहळू वजन नियंत्रित ठेवण्यास मदत होते. या पद्धतीमुळे आहार आणि कॅलरीजचे प्रमाण नियंत्रित करून वजन कमी होण्यास मदत होते. इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे नेमकं काय आणि ते कसं केलं जातं? या संदर्भात अधिक माहिती जाणून घ्या.
इंटरमिटेंट फास्टिंग करण्याचे अनेक प्रकार आहेत.
16/8 प्रकार
16/8 इंटरमिटेंट फास्टिंग करणे ही एक अतिशय लोकप्रिय इंटरमिटेंट फास्टिंग पद्धत आहे. याचा अर्थ असा की, तुम्ही 16 तास उपवास करता आणि 8 तास खाऊ शकता. तुम्हाला 16 तासांच्या उपवासात अन्नाचं सेवन करण्याची गरज लागत नाही. फक्त पाणी, चहा, कॉफी किंवा लिंबूपाणी यांसारखे द्रवपदार्थ घेतले जाऊ शकतात. हे चक्र दररोज किंवा आठवड्यातून काही दिवस रिपीट केले जाऊ शकते. 16 तास उपवास केल्याने शरीरातील केटोसिस वाढते ज्यामुळे वजन कमी होते.
5:2 प्रकार
5:2 म्हणजे तुम्ही आठवड्याचे 5 दिवस सामान्य अन्नाचं सेवन करू शकता. यामध्ये तुम्हाला 2 दिवस उपवास करावा लागेल. 5 दिवस तुम्ही तुमच्या आवडीचे अन्न खाऊ शकता, यामध्ये कोणतेही बंधन नाही. पण 2 दिवस तुम्हाला भाज्या, दूध आणि डाळी यांसारखे कमी कॅलरीजचे अन्न खावे लागेल. 2 दिवस उपवास करताना, तुम्हाला 500-600 कॅलरीज खाव्या लागतात. यामध्ये तुम्हाला अधिकाधिक पाण्याचे सेवन करावे लागेल. ही दिनचर्या आठवड्यातून 2 दिवस किंवा आठवड्यातून 1 दिवस देखील केली जाऊ शकते. चयापचय 5:2 ने वाढतो आणि वजन नियंत्रित राहते.
पर्यायी दिवसाचा उपवास :
यामध्ये एका दिवशी भोजन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी उपवास केला जातो. उपवास न ठेवण्याचे दिवस वेगवेगळे आहेत. यामध्ये एक दिवस उपवास आणि दुसऱ्या दिवशी सामान्य आहार घेतला जातो. उपवासाच्या दिवशी, 500-600 कॅलरीज पर्यंतचे अन्न वापरले जाते. उपवास नसलेल्या दिवशी सामान्य अन्न खाऊ शकता. हा दिनक्रम आठवडाभर किंवा महिनाभर चालू ठेवता येतो. हे उपासमार हार्मोन्स नियंत्रित करते आणि वजन कमी करण्यास मदत करते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
