एक्स्प्लोर

Kon Honar Crorepati : मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता खेळणार 'कोण होणार करोडपती'; मांडणार शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात ललिता जाधव शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा मांडणार आहेत.

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती' (Kon Honar Crorepati) हा कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रम अनेकांसाठी स्वप्नपूर्तीचा मंच ठरतो आहे. 'कोण होणार करोडपती'च्या आगामी भागात ललिता जाधव (Lalita Jadhav) शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा मांडणार आहेत. 

भारत देश हा कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो. शेतकरी संपूर्ण देशाला अन्न देतो पण त्याच्या घरचं ताट पंचपक्क्वनाने कधीच भरत नाही. कर्जाच्या जाळ्यात अडकलेला शेतकरी शेवटी आत्महत्या करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा शेवट करतो. परंतु त्या शेतकऱ्याच्या मागे त्याच्या कुटुंबाचे हाल होत असतात. अतिशय हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याचं कुटुंब आपला उदरनिर्वाह करत असतो. 

स्वतःच्या पतीने आत्महत्या केली असल्याने 'कोण होणार करोडपती' या मंचावरून जळगावच्या ललिता जाधव सगळ्यांना सांगू इच्छितात की, 'आत्महत्या हा मार्ग नाही तर ती अजून एक मोठी अडचण आहे'. मुलांच्या शैक्षणिक खर्चासाठी ललिता 'कोण होणार करोडपती' या खेळात सहभागी झाल्या आहेत.

ललिता जाधव शेतकर्‍यांच्या कुटुंबाची व्यथा मांडणार

जळगावच्या ललिता जाधव 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. कारण त्यांना मुलांच्या शिक्षणासाठी पैसे साठवायचे आहेत. ललिता या अंगणवाडी शिक्षिका आहेत. या आधी त्या सेविका म्हणून काम करत. पण त्यांना स्वतःची प्रगती करायची होती. म्हणून त्यांनी लग्नानंतर अजून शिक्षण घ्यायचे ठरवले. परंतु घरची परिस्थिती बेताची असल्याने कधी ओवाळणीतून किंवा अजून कुठून  जर पैसे भेट म्हणून मिळाले तर ते पैसे त्या जपून ठेवत आणि  लागतील तसे ते पैसे शिक्षणासाठी वापरत. असे करून त्यांनी एम.ए.  केले आणि त्या शिक्षिका  झाल्या. 

ललिता यांचे लग्न एका सर्वसाधारण शेतकरी कुटुंबात झाले. त्यामुळे सासरी देखील पैशाची अडचण कायम असायची. कधी हवामान साथ देत नाही तर कधी पिकाला हवा तो भाव मिळत नाही. म्हणून कायम हातात जेमतेम पैसा असे. या सगळ्या मुळे कर्ज घेण्याची  वेळ आली पण आता ते कर्ज फेडणार कसे. फेडण्याचा काही मार्ग दिसला नाही म्हणून ललिता यांच्या पतीने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केली आणि ललिता आणि मुलांना सोडून निघून गेले. त्यानंतरचा खडतर प्रवास ललिता यांनी एकटीने केला. 'कोण होणार करोडपती' या कार्यक्रमात येऊन त्या त्यांच्या मुलांचं भविष्य सुधारू इच्छितात त्याचबरोबर शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उद्देश आहे. 

कुठे पाहता येणार? सोनी मराठी (सोम-शनि रात्री 9 वाजता), सोनी लिव्ह ॲप

संबंधित बातम्या

Kon Honar Crorepati : 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर भारती दबडेने केली आयुष्यातली पहिली कमाई; रंगला ज्ञान आणि मनोरंजनाचा अद्भुत खेळ!

Kon Honar Crorepati : ज्येष्ठ लेखिका आणि समाजसेविका सुधा मूर्ती येणार 'कोण होणार करोडपती'च्या मंचावर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 14 May 2024Vare Nivadnukiche Superfast News 08 PM: लोकसभा निवडणुकीच्या बातम्या: वारे निवडणुकीचे : 14 May 2024Jayant Patil Majha Vision Full : जळजळीत प्रश्नांवर खणखणीत उत्तरं; जयंत पाटील Majha Vision ExclusiveTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 07 PM : 14 May 2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
IPL 2024 : प्लेऑफ सामन्यांची तिकीट विक्री सुरू, किंमत किती, खरेदी कसं कराल? 
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
पुण्यावरुन बीडला मतदानाला जाताना अपघात, जागेवरच मृत्यू, पंकजा मुंडेंनी घेतली कुटुंबियांची भेट
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
टी20 विश्वचषकाचे नियम समोर, उपांत्य फेरीच्या सामन्यासाठी मोठी घोषणा
Jayant Patil : बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
बारामतीत दुसर्‍यांची प्रतिष्ठा पणाला, सुप्रियाताईंचा 100 टक्के विजय होणार : जयंत पाटील
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
चेन्नईचा पराभव निश्चित, 18 मे-आरसीबी अन् विराट कोहलीचं खास कनेक्शन, पाहा आकडेवारी  
Jayant Patil : पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
पवार साहेबांनी सुप्रिया सुळे सोडून नेहमी इतरांना संधी दिली, पुत्रप्रेम आणि पुत्रीप्रेम हा आरोप खोटा : जयंत पाटील
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
मी एकटा, तुम्ही तिघे, मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आदित्य ठाकरेंचं चॅलेंज, म्हणाले 'या' 3 प्रश्नांवर चर्चा करु 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
पावसामुळे आरसीबीचा 'खेळ' खल्लास होणार? CSK ला होणार मोठा फायदा 
Embed widget