Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : सूरज-अभिजीतचा झापुक झूपक तर जान्हवी निक्कीचा धाडक जलवा, अंकिता-धनंजयची विनोदी शैली; बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेची धमाकेदार सुरुवात
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनाले सोहळ्याला धमाकेदार सुरुवात झाली. यामध्ये टॉप 6 स्पर्धकांच्या डान्स फरफॉम्सने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Bigg Boss Marathi Season 5 Grand Finale : तब्बल दोन वर्षांची प्रतीक्षा संपत बिग बॉस मराठीच्या (Bigg Boss Marathi New Season) पाचव्या सीझनला सुरुवात झाली. 28 जुलै रोजी एकूण 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर आता बिग बॉस मराठीच्या ग्रँड फिनालेला सुरुवात झाली असून टॉप 6 स्पर्धकांची विशेष शैली पाहायला मिळाली. रितेश देशमुखच्या (Ritiesh Deshmukh) जबरदस्त एन्ट्रीने या सोहळ्याची सुरुवात झाली.
दरम्यान बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनच्या टॉप 6 स्पर्धकांनी धमाकेदार परफॉर्मन्सही दिला. अभिजीत आणि सूरज या दोघांनीही झापुक झूपूकवर दमदार डान्स केला. तसेच घरातील दोन धाकड गर्ल निक्की आणि जान्हवी यांचाही हटके अंदाज पाहायला मिळाला.
रितेशने मागितली प्रेक्षकांची माफी
दरम्यान यंदाचा बिग बॉसचा होस्ट म्हणून रितेश देशमुखने भूमिका बजावली. पण त्याच्या शुटींगमुळे त्याला शेवटचे दोन आठवडे भाऊच्या धक्क्यावर हजेरी लावता आली नाही. त्याबद्दल रितेशने प्रेक्षकांची माफी देखील मागितली. त्याचं शुटींग हे वर्षाभरापूर्वीच ठरलं होतं, असंही रितेशने यावेळी सांगितलं. त्यामुळे बिग बॉसच्या टीमनेही त्यांची ही विनंती मान्य केली. त्यामुळे बिग बॉसनेही रितेश भाऊंचे आभार मानले आहेत.
बिग बॉस मराठीचा पाचवा सीझन
28 जुलैपासून बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनला सुरुवात झाली होती. एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश केला होता. पुरुषोत्तम दादा पाटील, योगिता चव्हाण, निखिल दामले, इरिना रुडाकोव्हा, घन:श्याम दरवडे, वैभव चव्हाण, पंढरीनाथ कांबळे, वर्षा उसगांवकर, अरबाज पटेल, धनंजय पोवार, अंकिता वालावलकर, निक्की तांबोळी, जान्हवी किल्लेकर, अभिजीत सावंत, सूरज चव्हाण, आर्या जाधव या स्पर्धकांनी 28 जुलै रोजी बिग बॉसच्या घरात एन्ट्री केली. त्यानंतर संग्रामने वाईल्ड कार्ड एन्ट्री घेतली. पण यातील एक एक करुन 10 स्पर्धक एलिमिनेट होत गेले.
बिग बॉसचा खेळ 70 दिवसांतच संपला
दरम्यान बिग बॉस हा खेळ 100 दिवसांचा असतो. याआधीही बिग बॉस मराठीचे जे चार सीझन झाले, तो खेळही 100 दिवसांचाच होता. पण यंदा हा खेळ फक्त 70 दिवसच ठेवण्यात आला. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बिग बॉस हिंदीच्या 18 व्या सीझनला सुरुवात होत आहे. त्याचमुळे मराठीच्या सीझनने लवकर निरोप घेतला असल्याचं म्हटलं जातंय.
View this post on Instagram