एक्स्प्लोर
'ही' मराठी अभिनेत्री नवऱ्यासोबत करतेय सेंद्रिय शेती, महिन्याला अवघ्या 2000 रुपयांत चालवते संसार
Mrunmayee Deshpande : मराठी सिनेसृष्टीतील नामांकीत अभिनेत्री मृण्मयी देशपांडे नेहमीच चर्चेत असते.
Marathi Actress Mrunmayee Deshpande Become Farmer
1/9

शेतीमुळे आमचा बराचसा खर्च कमी झालाय आणि शिवाय सेंद्रीय अन्न आम्हाला खायला मिळतंय, याचा आनंद मृण्मयी देशपांडेनं चाहत्यांसोबत शेअर केला आहे.
2/9

मृण्मयी देशपांडे आणि तिच्या नवऱ्यानं शहरी जीवनाच्या दगदगीपासून दूर गावात शेती विकत घेतली आणि आता ते तिथे शेती करतात. मृण्मयीनं स्ट्रॉबेरीची काही रोपं लावली आहेत, त्यासोबतच इतरही काही झाडं तिनं लावली आहेत.
3/9

मृण्मयीनं शेतात दोन कुत्रेही पाळले आहेत. त्यासोबतच आता कोंबड्याही पाळल्या असून पुढे एक गायही घेण्याचा विचार असल्याचं मृण्मयी सांगते.
4/9

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीमध्ये मृण्मयीनं शेतकरी म्हणून आयुष्य जगताना तिच्या आयुष्यात झालेल्या बदलांबाबत सांगितलं.
5/9

मृण्मयी आणि स्वप्नीलनं नुकतीच एका ऑनलाईनला पोर्टलला मुलाखत दिली. यावेळी तिनं शेतकरी म्हणून जगताना त्यांच्या बदललेल्या आर्थिक आयुष्यावर भाष्य केलं. तिला महिन्याचा येणारा खर्च तर अभिनेत्री म्हणून कपड्यांवर होणारा वार्षिक याबाबत तर मृण्मयीनं दिलेलं उत्तर ऐकून पायाखालची जमिनच सरकली.
6/9

मृण्मयीनं बोलताना सांगितलं की, "शेतीमध्ये आल्यानंतर आमचा जो खर्च आहे तो आठवड्याचा 500-600 रुपये आणि महिन्याचा खर्च 2000 रुपयात आम्ही आनंदानं जगतोय. कार्बन आणि हनी दोघे (मृण्मयीनं शेतात पाळलेले श्वान) आहेत त्यांना चिकन लागतं... पण आता आम्ही त्यासाठी कोंबड्या पाळल्यानं तो खर्च कमी झाला आहे."
7/9

"कोंबड्यांमुळे आता अंडी येतील , गायपण पाहिजे आम्हाला आता शेतात. गेल्या 5 वर्षात मला आठवत नाही की, असे वारंवार कधी कपडे खरेदी केलेत.", असंही मृण्मयी म्हणाली.
8/9

मृण्मयी म्हणाली की, "माझ्या स्वतःच्या कपड्यांचा खर्च वर्षाचा 20 हजार रुपये असेल ,जो माझ्या कामानुसार आहे. या व्यतिरिक्त काही लागतच नाहीए आम्हाला."
9/9

दरम्यान, अभिनेत्री मृण्मयी देशपांडे हिनं नवरा स्वप्नील रावला सोबत घेऊन महाबळेश्वर इथे शेती घेतली आहे. या शेतीत ते घरासाठी लागणारा भाजीपाला पिकवतात आणि कार्यशाळा देखील चालवतात.
Published at : 05 Feb 2025 09:51 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























