एक्स्प्लोर

शिरीष महाराजांनी सुसाईड नोटमध्ये कर्जाचा हिशोब मांडला, तेच 32 लाख शिंदेंनी झटक्यात फेडले!

Shirish Maharaj  Suicide : संत तुकाराम महाराजांचे 11 वे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली आहे. त्यांच्यावर असलेले 32 लाखांचे कर्ज आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी फेडलं.

पुणे : आर्थिक विवंचनेतून शिरीष महाराज मोरेंनी आत्महत्या केली अन कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महाराजांच्या कुटुंबावरील कर्जाचं ओझं कमी केलं आहे. संपूर्ण आयुष्य समाजकार्यासाठी अर्पण करणाऱ्या शिरीष महाराजांसाठी एकनाथ शिंदेंनी हे पाऊल उचललं आहे. आमदार विजय शिवतारेंनी शिरीष महाराजांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करताना शिंदेंनी पाठवलेली 32 लाखांची रक्कम देऊ केली. 

देहूतील राहत्या घरी 5 फेब्रुवारीला शिरीष महाराजांनी गळफास घेत आत्महत्या केली आणि वारकरी संप्रदयात शोककळा पसरली. ही बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना समजली आणि त्यांनीही या घटनेबाबत दुःख व्यक्त केलं. ज्या कारणाने महाराजांनी आत्महत्या केली, ते कर्जाचं ओझं आज स्वतः उपमुख्यमंत्री शिंदेंनी उतरवलं.

कर्जामुळे उचललं टोकाचं पाऊल

संत तुकाराम महाराजांचे 11 वंशज शिरीष महाराज मोरे यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याची घटना घडली. डोक्यावर असलेल्या 32 लाखांच्या कर्जामुळे हे पाऊल उचलल्याचं सुसाईड नोटमध्ये शिरीष महाराज मोरे यांनी नमूद केलं होतं. या घटनेच्या आधी, 20 दिवसांपूर्वी त्यांचा साखरपुडा झाला होता तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्यांच्या टोकाच्या निर्णयामुळे त्याच्या कुटुंबीयांना, नातेवाईकांना मोठा धक्का बसला. दरम्यान, शिरीष महाराज मोरे यांनी कर्ज कशासाठी घेतलं होतं याची माहिती देखील समोर आली आहे. 

शिरीष महाराज मोरेंनी कर्ज कशासाठी घेतलं?

1. कोरोनाच्या आधी शिरीष महाराज मोरे व्यवसाय क्षेत्रात उतरले होते. कागदी पिशवी बनवणे अन् त्यावर छपाई करुन देण्याचा व्यवसाय सुरु केला. यासाठी त्यांनी कर्ज उचलले होते. मात्र कोरोनाच्या काळात हा व्यवसाय बंद पडला अन् महाराजांना पहिलं आर्थिक नुकसान झेलावं लागलं.

2. अडीच वर्षांपूर्वी हॉटेल क्षेत्रात उतरण्याचं ठरवलं. नादब्रह्म ईडलीची काही लाख रुपये मोजून फ्रेंचायजी घेतली. पिंपरी चिंचवड परिसरात हा नवा व्यवसाय सुरु केला, जो आज ही सुरु आहे. आधीचं कर्ज असताना पुन्हा या व्यवसायासाठी ही महाराजांनी कर्ज घेतलं.

3. काही महिन्यांपूर्वी एक मजली घर बनवलं, त्यासाठीही लाखांमध्ये खर्च झाला.

4. अलीकडेच महाराजांनी चार चाकी गाडीही घेतली, त्यासाठीही त्यांनी कर्ज घेतलं होतं.

वारकरी संप्रदायावर दु:खाचा डोंगर

शिरीष महाराज मोरेंनी जगाचा निरोप घेताना, आपल्या मागे प्रत्येकाने दिलेलं कर्ज फेडावं असं म्हणत कोणावर अन्याय होणार नाही, याची दक्षताही घेतली. मात्र त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केली असं म्हणत चुकीची चर्चा घडवण्यात येत असल्याचं मोरे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. 

अनेकजण किर्तनावर मोठे होत आहेत, मात्र शिरीष महाराजांनी आजवर मोफत किर्तनसेवा केली. त्यांच्या जाण्याने वारकरी संप्रदायावर दुःखाचा डोंगर कोसळला. शिरीष महाराजांनी एकवेळ आवाज दिला असता तर अख्खा महाराष्ट्र मदतीला नक्कीच धावला असता अशी खंत देहूकर व्यक्त करत आहेत. शिरीष महाराजांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठ्यांचा आधार घेत, देहूरोड पोलीस पुढील तपास करत आहेत.

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Iran Israel Conflict Affect In India: ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
ज्याची भीती होती, तेच झालं...इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश
Baramati Byelection Election Commission: मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
मोठी बातमी: बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या हालचालींना वेग, मतदान कधी, समोर आली महत्त्वाची अपडेट
Commercial gas Iran war: अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश
अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश

व्हिडीओ

Arjun Tendulkar Marriage : अर्जुनची नवी इनिंग, सेलिब्रिटी वऱ्हाडी Special Report
Nitish Kumar Rajyasabha Bihar : राज्यसभेत नितीशकुमार, भाजपसाठी मोकळं बिहार Special Report
Jyoti Waghmare Rajysabha : राज्यसभेत वाघमारे आणि नाराजीचे नगारे Special Report
Maharashtra Rajyasabha Election : सर्वांचा विजय पक्का 'बिनविरोध'वर शिक्का Special Report
Arjun Tendulkar Weds Saaniya Chandhok : अर्जुन-सानिया लग्नबंधनात ! स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vasant More: सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
सोशल मीडियावर व्हायरल वक्तव्य महागात; वसंत मोरे यांच्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण काय?
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात कोणत्या योजना जाहीर होणार? मत्स्यसंपदा योजना ते नवीकरणीय ऊर्जा धोरण, जाणून घ्या सविस्तर
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
अमेरिकेची भारताला रशियन तेल घेण्यास 30 दिवसांची 'तात्पुरती परवानगी'; अमेरिका म्हणतो, 'ट्रम्प यांच्या धोरणांमुळे आम्हाला पूर्ण खात्री, भारत आता आमच्याकडून तेल खरेदी वाढवेल'
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाडकी बहीणचा हप्ता वाढणार? लाईव्ह अपडेटस
Maharashtra Budget 2026 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सादर करणार महाराष्ट्राचा अर्थसकंल्प, लाईव्ह अपडेटस एका क्लिकवर
Su‑30MKI Crash Flt Lt Purvesh Duragkar: भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
भारतीय वायूदलाचं लढाऊ विमान कोसळलं, महाराष्ट्राचे सुपूत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर शहीद
IND vs ENG T20 World Cup Semi Final : मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
मेहनत गौतम गंभीरची, चर्चा MS धोनीची! टीम इंडिया फायनलमध्ये जाताच सगळं क्रेडिट थाला घेऊन गेला, वानखेडेवर नेमकं काय घडलं?
Laxman Hake: महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
महाराष्ट्रातील ओबीसींनो तुम्ही झोपा काढा, तुमचं आरक्षण संपलंय; राधाकृष्ण विखे पाटलांच्या निर्णयानंतर लक्ष्मण हाके संतापले
Swatantrya Veer Savarkar : स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ‘भारतरत्न’ पुरस्कार देण्याबाबतचा ठराव विधानसभेत मागे; राज्य सरकारने काय सांगितलं कारण? जाणून घ्या सविस्तर
Embed widget